राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
प्रतिज्ञा
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
प्रार्थना
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
सुविचार
आजचा वार : सोमवार
आजची दिनांक : २५ / १२ / २०२३
आजचा सुविचार : तारे कितीही तेजस्वी असले तरी ते काळोखातच चमकतात.
दिनविशेष
ख्रिसमस डे
१९९१
मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सोविएत संघराज्याच्या (USSR) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याच्या दुसऱ्याच दिवशी सोविएत संघराज्याचे विघटन करण्यात आले आणि जनमत चाचपणीच्या आधारे सर्वप्रथम युक्रेन हा देश सोव्हिएत संघराज्यातुन बाहेर पडला.
१९९०
वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी
१९७६
‘आय. एन. एस. विजयदुर्ग’ ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाली. ३० सप्टेंबर २००२ रोजी ही नौका सेवेतून निवृत्त करण्यात आली.
(Image Credit: militaryimages.net)
१९४९
नवाझ शरीफ – पाकिस्तानचे १२ वे पंतप्रधान
१९३२
प्रभाकर जोग – व्हायोलिनवादक, संगीत संयोजक व संगीतकार
१९२७
पं. रामनारायण – सुप्रसिद्ध सारंगीये
१९२६
डॉ. धर्मवीर भारती – हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व ‘धर्मयुग’ साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक, ‘अभ्युदय’ व ‘संगम’ या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले.
(मृत्यू: ४ सप्टेंबर १९९७ - मुंबई)
(Image Credit: Wikipedia)
१९२६
चित्त बसू – संसदपटू, ‘ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस
(मृत्यू: ५ आक्टोबर १९९७)
१९२४
अटलबिहारी बाजपेयी – भारताचे १० वे पंतप्रधान, भारतीय जनता पक्षाचे नेते, असामान्य संसदपटू, अलौकिक वक्ते व उत्तुंग प्रतिभेचे ओजस्वी कवी, पद्मविभूषण (१९९२), भारतरत्न (२०१५)
(मृत्यू: १६ ऑगस्ट २०१८)
१९१९
नौशाद अली – संगीतकार
(मृत्यू: ५ मे २००६)
१९१८
अन्वर सादात – इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते
(मृत्यू: ६ आक्टोबर १९८१)
१९११
बर्न होगार्थ – जंगलचा सम्राट टारझन याला कार्टुनद्वारे अजरामर करणारे अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ
(मृत्यू: २८ जानेवारी १९९६ - पॅरिस, फ्रान्स)
१८७६
कैद-ए-आझम बॅ. मुहम्मद अली जिना – पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल
(कैद-ए-आझम = Great Leader)
(मृत्यू: ११ सप्टेंबर १९४८)
(Image Credit: Wikipedia)
१८६१
पण्डित मदन मोहन मालवीय – बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे (BHU) एक संस्थापक
(मृत्यू: १२ नोव्हेंबर १९४६)
१६४२
सर आयझॅक न्यूटन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. गणितातील ‘कलन’ (Calculus) या शाखेचे जनक
(मृत्यू: २० मार्च १७२७)
२०१५
साधना शिवदासानी ऊर्फ ‘साधना’ – चित्रपट अभिनेत्री. १९५५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘श्री ४२०’ या सिनेमातील ‘मुड मुड के ना देख, मुड मुड के ...’ या गाण्यात ‘कोरस गर्ल’ म्हणून त्यांनी चंदेरी दुनियेत पदार्पण केले.
(जन्म: २ सप्टेंबर १९४१)
(Image Credit: Celeb Net Worth)
१९९८
दत्तात्रय गोविंद तथा दत्ता खेबुडकर – नाटककार व दिग्दर्शक
१९९५
डीन मार्टिन – अमेरिकन गायक, संगीतकार व निर्माते
(जन्म: ७ जून १९१७)
१९९४
ग्यानी झैलसिंग – भारताचे ७ वे राष्ट्रपती, पंजाबचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री
(जन्म: ५ मे १९१६)
१९७७
चार्ली चॅपलिन – अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार. त्यांच्या ‘लाईम लाईट’ या चित्रपटाला ऑस्कर पारितोषिक मिळाले होते. ‘कीड ऑटो रेसेस अॅट व्हेनिस’ या त्यांच्या दुसर्या चित्रपटातील डर्बी हॅट, घट्ट कोट ढगळ पँट, चौकोनी मिशा, बेढब जोडे आणि काठी या वेशभूषेमुळे चार्ली चॅप्लिन म्हणजे लोकांना मूर्तिमंत विनोद वाटू लागले.
(जन्म: १६ एप्रिल १८८९)
१९७२
चक्रवर्ती राजगोपालाचारी – भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक
(जन्म: १० डिसेंबर १८७८)
१९५७
प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे – साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक. १९१६ मध्ये त्यांनी दलितांसाठी रात्रशाळा काढली व वीस - पंचवीस वर्षे मोफत शिकवले.
(जन्म: २ सप्टेंबर १८८६)
(Image Credit: मराठी विश्वकोश)
पंचांग
बोधकथा
इमानदारी हीच खरी कसोटी
बातमीपत्र
स्पर्धाविश्व
समूहगीत
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.