राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
प्रतिज्ञा
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
प्रार्थना
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
सुविचार
आजचा वार : गुरुवार
आजची दिनांक : २८ / १२ / २०२३
आजचा सुविचार : माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.
दिनविशेष
१८९५
ऑगस्टा व लुई या ल्युमियर बंधूंनी पॅरिस येथे चित्रपटाचा जगातील पहिला खेळ सादर केला. या खेळाचे तिकीट होते एक फ्रँक. पहिल्या खेळाचे उत्पन्न आले फक्त ३५ फ्रँक. मात्र नंतर तो खेळ एवढा लोकप्रिय झाला की आठवडाभरातच त्याचे दिवसाला २० खेळ होऊन दिवसाला २००० फ्रँक एवढे भरघोस उत्पन्न मिळू लागले.
१८८५
मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना
१८४६
आयोवा हे अमेरिकेचे २९ वे राज्य बनले.
१८३६
स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
१६१२
गॅलिलिओ गॅलिली याने प्रथमच नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. मात्र तेव्हा त्याला तो तारा आहे असे वाटले होते.
१९५२
अरुण जेटली – केंद्रीय मंत्री व वकील
(मृत्यू: २४ ऑगस्ट २०१९)
१९४५
वीरेंद्र – नेपाळचे राजे
(मृत्यू: १ जून २००१)
१९४०
ए. के. अँटनी – भारताचे परराष्ट्रमंत्री (२००६ - २०१४),
१९३७
रतन टाटा – उद्योगपती
१९३२
धीरुभाई अंबानी – उद्योगपती, रिलायन्स उद्योगसमूहाचे संस्थापक
(मृत्यू: ६ जुलै २००२)
१९२६
हुतात्मा शिरीषकुमार
(मृत्यू: १० ऑगस्ट १९४२)
१९११
फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक. दूरदर्शनवर लोकप्रिय झालेल्या ’रामायण’ या मालिकेची पटकथा त्यांनी लिहिली होती. चित्रपटसृष्टीतील सहा दशकांच्या वाटचालीत त्यांनी केवळ हिन्दीतच नव्हे तर चिनी, बंगाली, मल्याळी, उडिया व इंग्रजी चित्रपटांच्या निर्मितीत मोठे नाव कमावले.
(मृत्यू: १६ मे १९९४)
१८९९
गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार
(मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७६)
१८५६
वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल शांतता पारितोषिक (१९१९) विजेते
(मृत्यू: ३ फेब्रुवारी १९२४)
२००६
प्रभाकर पंडित – संगीतकार व व्हायोलिनवादक
(जन्म: ३० सप्टेंबर १९३३)
(Image Credit: Sudeep Audio)
२०००
मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे – तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष
(जन्म: २४ जानेवारी १९२४ - वेंगुर्ला)
१९८१
हिन्दी चित्रपटांत चार दशके चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करणारे डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले.
(जन्म: १९०९)
१९७७
सुमित्रानंदन पंत – छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी
(जन्म: २० मे १९००)
१९३१
आबालाल रहमान – चित्रकार
(जन्म: १८६०)
१६६३
फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी – इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: २ एप्रिल १६१८)
पंचांग
बोधकथा
भीमटोला
एकदा धर्मराज दरबारात बसले असता, त्यांच्याकडे एक गरीब ब्राह्मण मदत मागायला आला. धर्मराज त्याला म्हणाले, तु उद्या ये, मी तुला दान देऊन संतुष्ट करीन. 'धर्मराजांचं ते अश्वासन ऎकुन तो ब्राह्मण बाहेर पडला. त्याच वेळी धर्मराजांचं ते बोलणं ऎकलेला भीमही त्या ब्राम्हणापाठोपाठ दरबारातून बाहेर गेला.
दरबारातून बाहेर पड्ताच भिमानं त्या ब्राह्मणाला जरा एका बाजुला बसायला सांगितलं आणि स्वतः तो नगारखान्याकडे गेला.नगारखान्यात दोन प्रकारचे नगारे होते. एक नगारा कुठ्ल्याही तर्हेचं संकट आलं असता वाजवायचा होता, आणि त्याचा आवाज अंगावर काटा उभा करणारा होता. दुसरा नगारा काहीतरी आनंदाची वा आश्चर्यांची गोष्ट घडून आली असता वाजवायचा होता आणि त्याचा ध्वनी गोड होता.
नगारखान्यात जाऊन भिमानं आनंदाचा नगारा वाजवायला सूरुवात केली. तो आवाज ऎकुन ‘काय आनंददायी घडले?’ हे पहाण्यासाठी प्रत्यक्ष धर्मराज तिथे आले. स्वतः भीम तो नगारा बडवीत असल्याचं पाहुन त्यांनी विचारलं, भिमा ! असं काय आनंददायी घडलं, म्हणुन तु हा नगारा वाजवु लागलास ?' भीम म्हणाला, 'दादा, आजपर्यंत शास्त्रे व आपला अनुभव आपल्याला असं सांगत आला की, जन्माला आलेल्या कुणाही जिवाला आपल्या आयुष्याचा भरंवसा देता येत नाही. कुणाला केव्हा 'वरचं आमंत्रण ' येईल याची शाश्वती नाही. म्हणून कुठलीही आज करता येण्यासारखी चांगली गोष्ट उद्यावर ढकलु नये.
पण नूकत्याच मदत मागायला आलेल्या ब्राह्मणाला ज्या अर्थी तुम्ही उद्या यायला सागिंतले आहे, त्या अर्थी तुम्ही व तो ब्राह्मण किती जगणार आहात, हे तुम्हाला निश्चीतपणे समजलं आहे. ही नवलाची व आनंदाची गोष्ट मला कळली, म्हणून मी हा नगारा वाजवीत आहे.'या भीमटोल्यानं धर्मराजांचे डोळे उघडले. त्यांनी तिथल्या तिथे त्या ब्राम्हणाला मदत केली आणि भीमाच्या चातुर्याची प्रसंशा केली.
बातमीपत्र
स्पर्धाविश्व
समूहगीत
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.