A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
प्रार्थना
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
सुविचार
आजचा वार : सोमवार
आजची दिनांक : ३० / १२ / २०२४
आजचा सुविचार : अन्न हे पूर्णब्रह्म आहे;त्याचा अनादर करू नका.
दिनविशेष
१९४३
सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला
१९२४
एडविन हबलने आकाशगंगेखेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.
१९०६
ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाक्का येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.
१९०२
डॉ. रघू वीरा – भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार, वैदिक संस्कृत, तिबेटी, चिनी, मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार
(मृत्यू: १४ मे १९६३)
१९३६
हिन्दी चित्रपट अभिनेत्री वेरा सुंदर सिंग तथा ‘प्रिया राजवंश’ यांची चेतन आनंद यांच्या मुंबईतील रुईया पार्क येथील बंगल्यात हत्या करण्यात आली. त्यांचे हसते जखम, हिन्दूस्तान की कसम, हीर रांझा, हकीकत हे चित्रपट प्रसिद्ध होते.
(मृत्यू: २७ मार्च २०००)
१८७९
वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी – भारतीय तत्त्ववेत्ते
(मृत्यू: १४ एप्रिल १९५०)
१८८७
डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि ‘भारतीय विद्याभवन’चे संस्थापक
(मृत्यू: ८ फेब्रुवारी १९७१)
१८६५
रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक
(मृत्यू: १८ जानेवारी १९३६)
३९
टायटस – रोमन सम्राट
(मृत्यू: १३ सप्टेंबर ८१)
२०१८
मृणाल सेन – दिग्दर्शक
(जन्म: १४ मे १९२३)
२०१५
कविवर्य मंगेश पाडगावकर
(जन्म: १० मार्च १९२९ - वेंगुर्ला)
२००६
इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांना फाशी
(जन्म: २८ एप्रिल १९३७)
१९९२
शाहीर पिराजीराव सरनाईक – साधी, सोपी पण अंतःकरणाला भिडणारी कवने, नादयुक्त शब्दकळा, श्रोत्यांना चेतविणारा आवेश व त्याला अनुरूप अशी देहबोली ही त्यांच्या शाहिरीची काही ठळक वैशिष्टये होत. व्यासपीठावर येताच ते ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी आरोळी देऊन श्रोत्यांच्या भावना उत्तेजित करीत. शूरवीरांचे पोवाडे रचून व आपल्या पहाडी आवाजात गाऊन त्यांनी श्रोत्यांमध्ये स्फूरण निर्माण केले. त्यांच्या गायकीला डफाच्या कडकडाटाची व तुणतुण्याच्या नादाची पार्श्वभूमी दाखल असलेली साथ वातावरणात अधिकच चैतन्य व जोश निर्माण करीत असे. त्यांची कवने जशी स्फूर्तिदायक तशीच समाज प्रबोधनपर होती. स्वातंत्र्यलढयात अनेक शाहिरांनी आपली स्फूर्तिदायक कवने गाऊन ह्या संगामाला फार मोठे बळ मिळवून दिले, अशा शाहिरांत पिराजीरावांचाही सहभाग होता. पुढे विख्यात कवी ग. दि. माडगूळकर यांच्या सहवासात ते आले. त्यातून त्यांचे कवित्व आणि सादरीकरण अधिकच प्रगल्भ होत गेले.
(जन्म: २८ जुलै १९०९)
१९८७
दत्ता नाईक ऊर्फ ‘एन. दत्ता’ – संगीतकार
(जन्म: १२ डिसेंबर १९२७)
१९८२
दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (सतीची पुण्याई, धाकटी मेहुणी, भक्त पुंडलिक, नसती उठाठेव, मुझे सीने से लगा लो, सतीचे वाण, थांब लक्ष्मी कुंकू लावते, वैशाख वणवा, सुभद्रा हरण, क्षण आला भाग्याचा, सप्तपदी इ. अनेक चित्रपट)
(जन्म: २ डिसेंबर १९१३ - कोल्हापूर)
१९७४
आचार्य शंकरराव देव – गांधीवादी कार्यकर्ते
(जन्म: २८ जानेवारी १८९५)
१९७१
डॉ. विक्रम साराभाई – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: १२ ऑगस्ट १९१९)
१९४४
रोमें रोलाँ – साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१५) विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक
(जन्म: २९ जानेवारी १८६६)
१६९१
रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ
(जन्म: २५ जानेवारी १६२७)
पंचांग
बोधकथा
सवय
एका माणसाने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्या पोपटाला चांगले खायला प्यायला मिळत असे व पोपट बोलका असल्याने घरातील लोकांकडून त्याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्य दाटून येई. अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्या माणसाने पोपटाला खाणे देण्यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्याच्याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता पोपट पिंज-याच्या बाहेर निघून गेला. पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्याने त्याला फारसे नीट उडताच येत नव्हते. एका झाडावर गेला असता त्याला इतर पोपटांशी बोलता येईना. कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्याने त्याला पोपटांची भाषा येत नव्हती म्हणून इतर पोपटही त्याला सहकारी मानत नव्हते. पिंज-यात आयते खायची सवय असल्याने त्याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्याने तो आजारी पडला व मरून गेला.
तात्पर्य : - जास्त काळ पारतंत्र्यात(गुलामगिरीत) राहिल्याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्या संस्कृतीचे चांगले काही घेताना आपल्या संस्कृतीचे विस्मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा.
बातमीपत्र
स्पर्धाविश्व
समूहगीत
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.