राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
प्रतिज्ञा
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
प्रार्थना
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
सुविचार
आजचा वार : मंगळवार
आजची दिनांक : ०५/ १२ / २०२३
आजचा सुविचार : कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
दिनविशेष
for Economic and Social Development
१९५७
इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो यांनी सर्व डच नागरिकांना हद्दपार केले.
१९३२
जर्मनीत जन्मलेले स्विस भौतिकशास्त्रज अल्बर्ट आईनस्टाईन यांना अमेरिकन व्हिसा देण्यात आला.
१८४८
अमेरिकन संसदेसमोर केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष जेम्स पोल्क यांनी कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याचे सांगितले.
१९४३
प्रा. लक्ष्मण देशपांडे – ‘वर्हाड निघालंय लंडनला‘ एकपात्री प्रयोगासाठी प्रसिद्ध असलेले कलाकार, लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक
(मृत्यू: २२ फेब्रुवारी २००९)
१९३१
अॅडमिरल जयंत गणपत नाडकर्णी – भारताचे १२ वे नौसेनाप्रमुख (कार्यकाल: १ डिसेंबर १९८७ ते ३० नोव्हेंबर १९६०), गोवा मुक्त करण्यासाठी झालेली कारवाई तसेच १९६५ व १९७१ च्या भारत पाक युद्धात महत्त्वाची कामगिरी. परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, नौसेना पदक, विशिष्ट सेवा पदक अशा सन्मानांचे मानकरी.
(मृत्यू: २ जुलै २०१८)
१९२७
भुमिबोल अदुल्यतेज ऊर्फ राम (नववा) – थायलँडचा राजा
१९०५
शेख मुहम्मद अब्दुल्ला – ‘शेर - ए - कश्मीर’ भारतात विलीन झाल्यानंतरचे जम्मू काश्मीरचे पहिले निर्वाचित पंतप्रधान (कार्यकाल: ९ मार्च १९४८ ते ९ ऑगस्ट १९५३), जम्मू काश्मीरचे तिसरे मुख्यमंत्री (कार्यकाल: २५ फेब्रुवारी १९७५ ते २६ मार्च १९७७ आणि ९ जुलै १९७७ ते ८ सप्टेंबर १९८२)
(मृत्यू: ८ सप्टेंबर १९८२)
(Image Credit: Kashmir Connected)
१९०१
वेर्नर हायसेनबर्ग – ‘क्वांटम मॅकॅनिक्स‘मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९३२) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: १ फेब्रुवारी १९७६)
१९०१
वॉल्ट इलायन डिस्ने – अॅनिमेशनपटांचे प्रणेते, ‘मिकी माऊस’चे जनक
(मृत्यू: १५ डिसेंबर १९६६)
१८९४
जोश मलिहाबादी – ऊर्दू कवी
(मृत्यू: २२ फेब्रुवारी १९८२)
१८६३
पॉल पेनलीव्ह – फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ
(मृत्यू: २९ आक्टोबर १९३३)
(Image Credit: Wikipedia)
२०१६
जे. जयललिता – तामिळनाडूच्या मुख्यमंत्री, एआयएडीएमके या राजकीय पक्षाच्या नेत्या, प्रसिद्ध अभिनेत्री
(जन्म: २४ फेब्रुवारी १९४८)
२००७
मधुकर वासुदेव तथा म. वा. धोंड – समीक्षक व टीकाकार. प्रा. म. वा. धोंड यांनी आपल्या मर्मग्राही, धारदार लेखनाने गेल्या पन्नास-साठ वर्षांतील मराठी समीक्षा क्षेत्रावर स्वतंत्र ठसा उमटवला आहे. ‘काव्याची भूषणे’, ‘मऱ्हाटी लावणी’, ‘ज्ञानेश्वरी : स्वरूप, तत्त्वज्ञान आणि काव्य’, ‘चंद्र चवथिचा’, ‘ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी’, ‘जाळ्यातील चंद्र’, ‘ऐसा विटेवर देव कोठें।’, ‘तरीहि येतो वास फुलांना’ अशी धोंड यांची निर्मिती आहे.
म. वा. धोंड – टीकाकार
(जन्म: ३ आक्टोबर १९१४)
(Image Credit: लोकसत्ता)
१९९९
वसंत गणेश तथा बापूसाहेब उपाध्ये – स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते, आमदार आणि शेती व सिंचन या विषयांतील व्यासंगी मार्गदर्शक
१९९१
डॉ. वासुदेव विश्वनाथ गोखले – संस्कृततज्ञ आणि बौद्ध धर्माचे अभ्यासक
१९७३
राकेश मोहन – हिन्दी नाटककार
(जन्म: ८ जानेवारी १९२५)
१९५९
कुमार श्री दुलीपसिंहजी – इंग्लंडचे क्रिकेटपटू, यांच्या स्मरणार्थ भारतात ‘दुलीप ट्रॉफी’ खेळली जाते.
(जन्म: १३ जून १९०५ - नवानगर, काठियावाड, गुजराथ)
१९५१
अवनींद्रनाथ टागोर – जलरंगचित्रकार
(जन्म: ७ ऑगस्ट १८७१)
१९५०
योगी अरविंद घोष – क्रांतिकारक, तत्त्वचिंतक, योगी व कवी
(जन्म: १५ ऑगस्ट १८७२ - कलकत्ता, पश्चिम बंगाल)
१७९१
वूल्फगँग मोझार्ट – ऑस्ट्रियन संगीतकार
(जन्म: २७ जानेवारी १७५६)
पंचांग
बोधकथा
एक व्यावसायिक कर्जात बुडाला होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत नव्हता. धनको त्याच्या घरी वारंवार चकरा मारीत होते आणि पुरवठादार बिलाच्या रकमेचा तगादा लावून होते. असाच तो एका बगिच्यातील बेंचावर डोके हातांनी धरून बसला होता. या कर्जाच्या सापळ्यातून वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा, असे त्याला खूप वाटत होते. अचानक एक वृद्ध त्याच्यासमोर उभा झाला. मला वाटते तू खूप अडचणीत आहेस, मला वाटते मी तुला मदत करू शकतो. वृद्धाने त्याला नाव विचारले आणि एक चेक लिहून त्याच्या हाती दिला. हे पैसे घे. आजपासून बरोबर एका वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील, असे म्हणून तो वळला आणि वेगाने दिसेनासा झाला.व्यावसायिकाने हातातील चेककडे पाहिले. तो 5 लाख डॉलर्सचा होता. खाली सही होती जॉन डी. रॉकफेलर, जगातील सर्वांत श्रीमंतापैकी एक. या रकमेतून माझे कर्ज चुटकीसरशी संपेल, व्यावसायिक पुटपुटला. परंतु त्याऐवजी व्यावसायिकाने तो चेक न वटविता तसाच ठेवून दिला. आता आपल्याजवळ 5 लाख डॉलर्सची रक्कम केव्हाही तयार आहे, या आत्मविश्वासाने तो कामाला लागला.
नव्या उमेदीने तो कारभार बघू लागला. त्याने आधीच्या करारांना पुन्हा वाटाघाटी करून फायदेशीर करून घेतले आणि पैसे देण्याची मुदतही वाढवून घेतली. काही मोठे करार रद्द केले. काही महिन्यातच, तो कर्जाच्या सापळ्यातून बाहेर आला आणि पुन्हा कमाई करू लागला.बरोबर एका वर्षानंतर तो त्याच बागेत न वटविलेला चेक घेऊन आला. ठरल्याप्रमाणे तो वृद्ध तिथे पुन्हा उपस्थित झाला. व्यावसायिक त्याला त्याचा चेक देणार आणि आपली यशाची गाथा सांगणार तेवढ्यात एक नर्स तिथे धावत धावत आली आणि तिने त्या वृद्धाला घट्ट पकडले. चला, शेवटी तुला पकडलेच, ती ओरडून व्यावसायिकाकडे बघून ती नर्स म्हणाली, याने तुम्हाला जास्त त्रास तर नाही ना दिला? हा नेहमी मनोरूग्णालयातून पळून जात असतो आणि लोकांना सांगतो की मी जॉन रॉकफेलर आहे म्हणून तिने त्या वृद्धाला ओढत नेले. व्यावसायिक थक्क होऊन हे सर्व बघत होता. त्याला काहीच कळेनासे झाले. गेले वर्षभर आपल्याजवळ ५ लाख डॉलर्स रक्कम केव्हाही तयार आहे, या थाटात तो करार करीत होता. अचानक त्याच्या लक्षात आले की, त्याचे आयुष्य बदलवून टाकणारी ही किमया खऱ्या किंवा अस्तित्वात नसलेल्या त्या रकमेची नव्हतीच. तो त्याला नव्याने गवसलेला आत्मविश्वास होता. त्यानेच त्याला कर्जाचा डोंगर उपसण्याची शक्ती दिली होती.
तात्पर्य- आत्मविश्वासाने
कोणतेही कार्य केल्यास यश हे हमखास मिळते.
बातमीपत्र
स्पर्धाविश्व
समूहगीत
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.