प्रस्तुत कवितेचे सर्वाधिकार हे कवी श्री गणेश घुले सर यांचे असून हे बालगीत सर्व शाळांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने आम्ही आमच्या आवाजात mp3 व कराओके स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.
सुंदर माझी शाळा
सुंदर माझी शाळा गं
सुंदर माझी शाळा
ज्ञानाचा पावसाळा गं
सुंदर माझी शाळा...
पाऊस पडतो ज्ञानाचा
घडतो गोळा मातीचा
विद्येचा फुलतो मळा गं...
गुरु आमुच्या विद्येची दारे
वर्गात वाहती ज्ञानाचे वारे
उजेडाचा काळा फळा गं...
भिंतीवर चित्रे बोलती सारी
खेळण्या भवताली मैदान भारी
शिक्षणाचा लागे लळा गं...
भरपूर वाचू, भरपूर लिहू
विज्ञाननिष्ठेने जगाला पाहू
अज्ञानाचा फोडू डोळा गं...
मंगळावर शोधू पाण्याचे झरे
चंद्रावर जाऊन बांधूया घरे
विज्ञानाचा पडताळा गं...
घेताना उंच भरारी
पंखांना बळ देणारी
भविष्याची वेधशाळा गं...
कवी - श्री. गणेश घुले
सुंदर माझी शाळा रिंगटोन 1
सुंदर माझी शाळा रिंगटोन 2
सुंदर माझी शाळा रिंगटोन 3
सुंदर माझी शाळा- कराओके Mp3 वर गीत म्हणा.
सुंदर माझी शाळा रिंगटोन 1
कविता - कवी श्री. गणेश घुले सर,
संगीत- श्री. श्रीराम पोतदार सर
गायन- प्रविण डाकरे
संगीत संयोजक- प्रविण डाकरे, जयदिप डाकरे
@ विविध प्रार्थना @
Tags
बालगीत
फारच सुंदर .✌️✌️🙏🙏
ReplyDelete