प्रजासत्ताक दिन भाषण/निबंध-1 | २६ जानेवारी भाषण निबंध | गणतंत्र दिन | Republic Day Speech (Bhashan) / Essay (Nibandh)
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त नमुना भाषण आम्ही देत आहोत. आपण ते लिहून घेऊन निबंध अथवा दर्जेदार भाषण सादर करू शकता.
प्रजासत्ताक दिन भाषण/निबंध-1
सन्माननीय व्यासपीठ , व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, गुरुवर्य व माझ्या बालमित्रांनो...!
आज मी तुम्हाला २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त चार शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती...!
आपले भारतीय लोक सण साजरे करण्यात फार अग्रभागी आहेतच. पण सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असे काही राष्ट्रीय सणही आपण साजरे करतो. त्यापैकी एक म्हणजे 'प्रजासत्ताक दिन' हा होय. दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा 'प्रजासत्ताक दिन' साजरा केला जतो. आपला भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा 'प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला.त्या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली.
हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. भारताच्या राजधानीत या दिवशी सकाळी ध्वजारोहणा नंतर लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो.या कार्यक्रमात भारतातील सर्व घटकराज्ये भाग घेतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरांत आणि गावागावातून 'प्रजासत्ताक दिन' साजरा होतो. शाळांतून, सरकारी कार्यालयांतून व अन्यत्रही सकाळी ध्वजवंदन व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. ठिकठीकाणी प्रभातफेऱ्या, भाषणे, प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते. धाडशी मुलांचा,आणि विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजविणावऱ्यांचा या दिवशी सरकार तर्फे गौरव केला जातो. अनेक ठिकाणी रात्री रोशनाई केली जाते. प्राथमिक शाळांतून मुलांना खाऊ वाटला जातो. मुलेही आनंदित होतात. शाळांना तोरणे-पताका लावले जातात. लहान-मोठी मुले तिरंगी ध्वज मोठ्या उत्साहाने हातात घेऊन भारत मातेचा जयघोष करीत प्रभात फेरीत भाग घेतात.सर्व विद्यार्थी अध्यापक, मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले जाते. शाळेतील, एन.सी. सी. व स्काउट चे विध्यार्थी सुंदर संचलन करतात. शाळेतील वाद्य -वृंदा वरही राष्ट्रीय गाणी वाजविली जातात. तसेच मुले मुली आपापल्या आवडीची देशभक्तीपर गीते गातात. भाषणे करतात. नंतर सर्वजण राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतात. मुख्याध्यापकांकडून गुणी विध्यार्थ्यांचे कौतुक होते व त्यांना सन्मानपत्रे दिली जातात.
या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येते. पण निव्वळ उत्साहात दिवस साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही. खरे तर हा प्रतिज्ञेचा दिवस ! लोकशाहीच्या उद्घोषाचा दिवस ! प्रत्येक भारतीयाने या महत्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतिज्ञा केलीच पाहिजे, आणि त्यानुसार वागले पाहिजे. असे राष्ट्रीय दिन साजरे केल्यामुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना, राष्ट्र प्रेम अधिक उसळून, उजळून निघते.शेवटी एवढे बोलून माझे भाषण संपवतो/ संपवते... जय हिंद...!