A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : शनिवार
आजची दिनांक : ११ / ०१ / २०२५
आजचा सुविचार : मैत्री हे नात्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे.
G दिनविशेष
दिनविशेष
२००१
सॅम पिरोज तथा एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
(कार्यकाल: १ नोव्हेंबर २००१ ते ५ मे २००२)
२०००
छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना
(Image Credit: High Court Of Chhattisgarh)
१९९९
‘कमाल जमीनधारणा कायदा’ रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी
१९८०
बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.
१९७२
पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.
१९६६
पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या आकस्मिक निधनामुळे गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून (दुसऱ्यांदा) कार्यभार स्वीकारला.
१९४२
दुसरे महायुद्ध - जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले
१९२२
मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.
१७८७
विल्यम हर्षेल याने ‘टिटानिया‘ या युरेनसच्या सर्वात मोठ्या चंद्राचा शोध लावला. त्याच दिवशी त्याने ‘ओबेरॉन‘ या युरेनसच्या दुसर्या मोठ्या चंद्राचाही शोध लावला.
(Image Credit: Wikipedia)
१९५५
आशा खाडिलकर – ख्याल, भजन, ठुमरी, तराणा, बंदिश आणि नाट्यसंगीत गायिका
(Image Credit: Wikipedia)
१९४४
शिबू सोरेन – झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री (हे एकूण ३ वेळा मुख्यमंत्री झाले),केंद्रीय कोळसा मंत्री, लोकसभा खासदार (दुमका मतदारसंघ) आणि राज्यसभा खासदार. २८ नोव्हेंबर २००६ रोजी हत्या आणि अपहरण प्रकरणात यांना १२ वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा झाली.
(Image Credit: Wikipedia)
१८५९
लॉर्ड कर्झन – ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय
(मृत्यू: २० मार्च १९२५)
१८५८
श्रीधर पाठक – हिन्दी कवी, लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
(मृत्यू: १३ सप्टेंबर १९२६)
(Image Credit: Bharat Discovery)
१८१५
जॉन ए. मॅकडोनाल्ड – कॅनडाचे पहिले पंतप्रधान
(मृत्यू: ६ जून १८९१)
२००८
य. दि. फडके – लेखक व इतिहाससंशोधक
(जन्म: ३ जानेवारी १९३१)
२००८
सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक
(जन्म: २० जुलै १९१९)
१९९७
भबतोष दत्ता – अर्थतज्ञ
(जन्म: २१ फेब्रुवारी १९११)
१९८३
घनश्यामदास बिर्ला – उद्योगपती व शिक्षण महर्षी
(जन्म: १० एप्रिल १८९४)
१९६६
स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले. त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
(जन्म: २ आक्टोबर १९०४)
१९५४
सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या ‘सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष. क्लेमंट अॅटली हे देखील या आयोगाचे एक सदस्य होते, जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले.
(जन्म: २८ फेब्रुवारी १८७३)
१९२८
थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी
(जन्म: २ जून १८४०)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
संतुलन
गौतम बुद्धाकडून राजकुमार श्रोणने दीक्षा घेतली होती. एकेदिवशी बुद्धांच्या अन्य शिष्यांनी श्रोणची तक्रार करत म्हणाले की ''श्रोण तपाच्या उच्च सीमेपर्यंत पोहोचला आहे पण चिंता वाटते की सारे भिक्षू दिवसातून एकदाच भोजन करतात पण श्रोण मात्र दोन दिवसातून एकदा भोजन करतो आहे. अन्नपाणी ग्रहण न केल्यामुळे तो फारच अशक्त झाला आहे. हाडांचा सापळा दिसायला लागला आहे.'' हे ऐकून बुद्धांनी श्रोणला बोलावले आणि म्हणाले,'' श्रोण, तू पूर्वी सितार चांगले वाजवित होता हे खरे काय? आता वाजवून दाखवू का?'' श्रोण म्हणाला,''होय मी आपल्याला सितार वाजवून दाखवू शकतो. परंतु आपण आता सितार का ऐकू इच्छित आहेत हे मला समजले नाही?'' बुद्ध म्हणाले,'' मी असे ऐकलंय की, सितारच्या जर तारा ढिल्या झाल्या असतील तर ते नीट वाजत नाही.किंवा जास्त घट्ट झाल्या तरी त्यातून चांगले संगीत निर्माण होत नाही.'' श्रोण म्हणाला,'' होय ते खरे आहे तारा ढिल्या झाल्या तर सूर बिघडणार आणि तारा घट्ट झाल्या तर तारा तुटणार तेव्हा तारा मध्यम असाव्यात'' बुद्ध म्हणाले,'' सितारप्रमाणेच मानवाचे जीवन आहे, तप करावे पण अन्नही योग्य प्रमाणात भक्षण करावे. भोग अति घेणे वाईट आहे.''
तात्पर्य- 'अति सर्वत्रं वर्जयेत' जीवनात नियम आणि तप आवश्यक आहे पण एका विशिष्ट संतुलनाने. कारण अति तेथे माती हा नियम सगळीकडेच लागू होतो.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.