A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : रविवार
आजची दिनांक : १२ / ०१ / २०२५
आजचा सुविचार : प्रामाणिकपणाच नसेल तर ज्ञान असूनहीं काही उपयोग नाही.
G दिनविशेष
दिनविशेष
२००६
हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३६२ यात्रेकरुंचा मृत्यू
२००५
राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना
१९९७
सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला ‘बाया कर्वे पुरस्कार’ प्रदान
१९३६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा
१९३१
सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी
१९१५
महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.
१७०५
सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.
१९१८
सी. रामचंद्र – संगीतकार
(मृत्यू: ५ जानेवारी १९८२)
१९१७
महर्षी महेश योगी
(मृत्यू: ५ फेब्रुवारी २००८)
१९०६
पं. महादेवशास्त्री जोशी – साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक
(मृत्यू: १२ डिसेंबर १९९२)
१९०२
महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद – तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक
(मृत्यू: १३ जुलै १९६९)
१८९९
पॉल हर्मन म्युलर – डी. डी. टी. या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९४८) मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ
(मृत्यू: १२ आक्टोबर १९६५ - बेसल, स्वित्झर्लंड)
१८९३
हर्मन गोअरिंग – जर्मन नाझी
(मृत्यू: १५ आक्टोबर १९४६)
१८६३
स्वामी विवेकानंद – भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी ‘रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली.
(मृत्यू: ४ जुलै १९०२)
१८५४
‘विज्ञान यात्री’ व्यंकटेश बापूजी केतकर – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद. नेपच्युन ग्रहापलीकडे परिक्रमा करीत असलेला ग्रह आणि त्याची परिक्रमा याचे भाकीत केतकर यांनी केले होते.
(मृत्यू: ३ ऑगस्ट १९३०)
१५९८
राजमाता जिजाबाई
(मृत्यू: १७ जून १६७४)
२००५
अमरीश पुरी – आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार
(जन्म: २२ जून १९३२ - लाहोर, पंजाब, पाकिस्तान)
१९९७
ओ. पी. रल्हन – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते. ‘तलाश’, ‘फूल और पत्थर’, ‘हलचल’, ‘पापी, ‘शालिमार’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.
(जन्म: ? ? १९२५)
१९९२
शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ ‘कुमार गंधर्व’
(जन्म: ८ एप्रिल १९२४)
१९७६
अॅगाथा ख्रिस्ती – इंग्लिश रहस्यकथालेखिका, पहिल्या महायुद्धाच्या काळात त्या रेडक्रॉस इस्पितळात काम करत होत्या. त्यावेळेस त्यांनी ‘मिस्टिरियस अफेअर्स अँड स्टाइल्स’ ही पहिली रहस्यकथा लिहिली. ६८ कादंबर्या, १०० हून अधिक कथा, १७ नाटके अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. त्यांचे साहित्य १०३ भाषांत अनुवादित झाले आहे.
(जन्म: १५ सप्टेंबर १८९०)
१९६६
नरहर विष्णू तथा ‘काकासाहेब’ गाडगीळ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल
(जन्म: १० जानेवारी १८९६)
१९४४
वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी – लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्वस्त
(जन्म: २८ एप्रिल १८५४)
१८९७
सर आयझॅक पिटमॅन – शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक
(जन्म: ४ जानेवारी १८१३)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
संघर्षच खरे जीवन
एका गावात एक म्हातारी राहत होती. तिला मुलेबाळे नव्हती. ती आणि तिचा नवरा दोघेच होती. पती कसल्यातरी आजाराने ग्रस्त होता. ती रात्रंदिवस मोलमजुरी करून दिवस काढत होती. या म्हातारीबद्दल संपूर्ण गावात सहानुभूती होती. पण म्हातारी स्वाभिमानी असल्याने ती कोणाकडून कसलीच मदत घेत नसे. एकेदिवशी ती जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेली होती. दिवसभर लाकडे तोडून ती दमली होती. लाकडांची मोळी बांधली पण ती मोळी झालेल्या श्रमामुळे तिला काही उचलली जाईना. त्याने ती वैतागली व मोठमोठ्याने बडबडू लागली,''देवा, आता या उतारवयात ही मोळी जर माझ्याचने उचलली जात नसेल तर मला तरी उचल बाबा.'' तिने तसे म्हणायला आणि मृत्युदेव तिकडून जायला एकच गाठ पडली. त्यांनी ते ऐकले व लगेच तेथे येवून ते म्हणाले, मी तुझा आवाज ऐकला आहे मी तुला घेऊन जायला तयार आहे.'' साक्षात मृत्यु समोर पाहून म्हातारी घाबरली आणि म्हणू लागली,'' मला आताच मरायचे नाही, मी जर मेले तर माझ्या आजारी पतीची सेवा कोण करील?. मी काही इतकीच काही म्हातारी नाही की मला ही मोळी उचलता येत नाही. मी उगीच गंमत करत होते. पण मला काय माहिती लगेच मला उचलायला तू लगेच येशील देवा. मला सोड बाबा एकटीला, जा तुझा तू.'' हे ऐकताच मृत्यूदेव निघून गेले आणि म्हातारीने पूर्ण ताकतीने लाकडाचा भारा उचलला व घरी गेली.
तात्पर्य- जीवनापासून पळ काढणे म्हणजे समस्येचे निरसन नाही. संघर्षाला सामोरे जाणे, संघर्ष करत राहणे, आपले नित्यकर्म करत राहणे यातच मानवी जीवनाचे सूत्र बांधले आहे.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.