A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : सोमवार
आजची दिनांक : १३ / ०१ / २०२५
आजचा सुविचार : अशी एखादी तरी कला शिका, जी तुमच्याकडे आहे म्हणून लोक तुमच्यासाठी वेडे होतील.
G दिनविशेष
दिनविशेष
२००७
के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९६
पुणे - मुंबई दरम्यान ‘शताब्दी एक्सप्रेस’ सुरू झाली.
१९६७
पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न.
१९६४
कोलकता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार
१९५७
हिराकूड धरणाचे पंडित नेहरूंच्या हस्ते उद्घाटन झाले.
१९५३
मार्शल टिटो युगोस्लाव्हियाच्या अध्यक्षपदी
१८९९
गोविन्द बल्लाळ देवल यांच्या ‘संगीत शारदा’ या नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.
१९८३
इम्रान खान – भारतीय चित्रपट कलाकार
१९८२
कमरान अकमल – पाकिस्तानी यष्टीरक्षक आणि फलंदाज
(Image Credit: espncricinfo.com)
१९४९
विंग कमांडर राकेश शर्मा – एकूण १३८ वा व पहिला भारतीय अंतराळवीर
(Image Credit: BBC)
१९३८
पं. शिवकुमार शर्मा – प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार
(Image Credit: punekarnews.in)
१९२६
शक्ती सामंत – हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते
(मृत्यू: ९ एप्रिल २००९)
१९१९
एम. चेन्ना रेड्डी – (अविभाजित) आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल (१९७४ - १९७७), पंजाबचे राज्यपाल (१९८२ - १९८३), राजस्थानचे राज्यपाल (१९९२ - १९९३), तामिळनाडूचे राज्यपाल (१९९३ - १९९६)
(मृत्यू: २ डिसेंबर १९९६)
२०१३
रुसी सुरती – क्रिकेटपटू
(जन्म: २५ मे १९३६)
२०११
प्रभाकर पणशीकर – ख्यातनाम अभिनेते
(जन्म: १४ मार्च १९३१)
२००१
श्रीधर गणेश दाढे – संस्कृत पंडित व लेखक. कालिदासाचे ‘मेघदूत’ कवींद्र परमानंद यांचे ‘शिवभारत’ यांचे पद्यमय अनुवाद त्यांनी केले आहेत.
१९९८
शंभू सेन – संगीत दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक
१९९७
मल्हार सदाशिव तथा ‘बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक
(जन्म: १५ एप्रिल १९१२)
१९८५
मदन पुरी – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील चरित्र अभिनेता
(जन्म: ३० सप्टेंबर १९१५ - लाहोर, पाकिस्तान )
(Image Credit: Cinestaan)
१९७६
अहमद जाँ थिरकवा – सुप्रसिद्ध तबला वादक
(जन्म: ? ? १८९२?)
१८३२
थॉमस लॉर्ड – लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक
(जन्म: २३ नोव्हेंबर १७५५)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
सत्कृत्य
एका वनात एक पारधी राहत होता. त्याने खूप वन्य प्राण्यांची हत्या केली होती. त्यामुळे तो खूप पापी झाला होता. त्याची चाहूल लागली तरी वन्यप्राणी भीतीने प्राणी थरथर कापत असत. एकेदिवशी तो आपल्या शिकारीच्या शोधात असताना एका बेलपत्राच्या झाडावर चढला. खूप वेळ झाला तरी एकही शिकार त्याच्या हाती लागली नाही. तो खूप चिडला व बेलपत्राच्या झाडाचे एक एक पान खाली टाकू लागला. बराच वेळ हा त्याचा उद्योग चालू होता. झाडाच्या बुंध्याशी बेलपत्राचा हा मोठा ढीग तयार झाला पण हे पारध्याला माहित नव्हते. त्या झाडाखाली एक महादेवाची पिंड होती. त्या पिंडीवर बेलाच्या पानांचा ढीग पाहून महादेव प्रसन्न झाले व ते पारध्याच्या समोर प्रकट झाले. त्यांना समोर पाहून पारधी आश्चर्यचकित झाला व म्हणाला,''महादेवा, मी खूप क्रूर आहे, अनेक वन्यप्राणी मारले आहेत, खूप हिंसा केली आहे, पाप खूप केले पण पुण्याचे एकही काम केलेले मला तरी आठवत नाही तरी पण आपण मला कसे बरे प्रसन्न झालात?" यावर महादेव म्हणाले,''तू हिंसक आहेस, तुझ्या नकळत का होईना तू माझी पूजा केली आहेस. पूजा-प्रार्थना हे असे काम आहे की ते चुकून जरी घडले तरी त्याचे चांगलेच फळ मिळते. जर चुकून प्रार्थनेचे फळ इतके चांगले मिळत असेल तर नेहमी तर सत्कार्य केलेस तर किती फळ मिळेल? पारध्याला आपली चूक समजली व त्याने आयुष्यभर कष्ट करून जीवन जगला.
तात्पर्य :- एका सत्कृत्यामुळेदेखील आपले आयुष्य बदलून जाऊ शकते.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.