A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : बुधवार
आजची दिनांक : १५ / ०१ / २०२५
आजचा सुविचार : जो काळानुसार बदलतो, तोच नेहमी प्रगती करतो.
G दिनविशेष
दिनविशेष
२००१
सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश ‘विकीपिडिया’ हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.
१९९६
भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.
१९७३
जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर (डोग्रा रेजिमेंट) यांनी स्वतंत्र भारताचे ८ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली.
(कार्यकाल: १६ जानेवारी १९७३ ते ३१ मे १९७५)
१९७०
मुअम्मर गडाफी लीबीयाचे सर्वेसर्वा झाले.
१९४९
जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.
१८८९
द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी सध्या ‘द कोका कोला कंपनी’ म्हणून प्रसिद्ध आहे.
१८६१
एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट मिळाले.
१७६१
पानिपतचे तिसरे युद्ध संपले.
१५५९
राणी एलिझाबेथ (पहिली) हिचा इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अॅबे येथे राज्याभिषेक झाला.
१९२९
मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते
(मृत्यू: ४ एप्रिल १९६८)
१९२३
चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते
(मृत्यू: २५ आक्टोबर २००९)
(Image Credit: IMDb)
१९२६
कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव – १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर]
(मृत्यू: १४ ऑगस्ट १९८४)
१९२१
बाबासाहेब अनंतराव भोसले – महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री
[कार्यकाल: २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३]
(मृत्यू: ६ आक्टोबर २००७)
(Image Credit: Vethi)
१९२१
सज्जनलाल पुरोहित ऊर्फ ‘सज्जन’ – जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते, कवी व गीतलेखक. काबूलीवाला (१९६१), दूर गगन की छाँव में (१९६४), सावन की घटा (१९६६), दिल दिया दर्द लिया (१९६६), राम और शाम (१९६७), फर्ज़ (१९६७), तलाश (१९६९), प्रेम पुजारी (१९७०), जॉनी मेरा नाम (१९७०), पगला कहीं का (१९७०), दुश्मन (१९७१), राजा जानी (१९७१), जहरीला इंसान (१९७४), दस नंबरी (१९७६), ईमान धरम (१९७७), दो और दो पाँच (१९८०), दोस्ताना (१९८०), कालिया (१९८१) इ. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. विक्रम और बेताल या मालिकेत त्यांनी केलेल्या बेतालच्या भूमिकेला विशेष प्रसिद्धी मिळाली.
(मृत्यू: १७ मे २०००)
(Image Credit: Wikipedia)
१९२०
डॉ. आर. सी. हिरेमठ – कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू
(मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९८)
१७७९
रॉबर्ट ग्रँट – (तत्कालीन) मुंबई इलाख्याचे राज्यपाल, मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजचे एक संस्थापक, मुंबईतील ग्रँट रोड स्टेशन (सद्ध्याचे नाव गावदेवी) हे त्यांच्याच नावाने ओळखले जात असे.
२०१४
नामदेव लक्ष्मण ढसाळ – दलित साहित्यिक
(जन्म: १५ फेब्रुवारी १९४९)
२०१३
डॉ. शरदचंद्र गोखले – समाजसेवक, ‘केसरी’चे संपादक, युनायटेड नेशन्स, युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना आणि इतर अनेक जागतिक पातळीवरील संघटनांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
(जन्म: २९ सप्टेंबर १९२५)
(Image Credit: Social Work Foot Prints)
२००२
विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर – राष्ट्रपतिपदक विजेत्या तमाशा कलावंत
१९९८
गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते
(जन्म: ४ जुलै १८९८)
१९९४
हरिलाल उपाध्याय – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी
(जन्म: २२ जानेवारी १९१६)
१९७१
दीनानाथ दलाल – अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार
(जन्म: ३० मे १९१६)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
व्यवहारज्ञानाचे धडे
एका शहरात दररोज संध्याकाळी एक महात्मा प्रवचन देत असे. त्यांची ख्याती एका धान्याच्या व्यापा-यानेही ऐकली होती. तो आपल्या मुलासोबत प्रवचन ऐकण्यास आला. प्रवचन सुरु झाल्यानंतर दोघेही लक्षपूर्वक ऐकत होते. काही ज्ञानाच्या गोष्टी सांगत असताना ते म्हणाले,’’या जगात जितके प्राणी आहेत. त्या सर्वांमध्ये आत्मा वावरत असतो.’’ ही गोष्ट व्यापा-याच्या मुलाला हृदयस्पर्शी वाटली. त्याने मनोमन हा विचार आचरणात आणण्याचा संकल्प केला. दुस-या दिवशी तो एका दुकानावर गेला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला काही वेळ दुकान सांभाळण्यास सांगितले. ते स्वत: दुस-या कामासाठी बाहेर निघून गेले. त्यानंतर काही वेळाने तेथे एक गाय आली. दुकानासमोर ठेवलेले धान्य खाऊ लागली. मुलाने त्या गायीला हाकलण्यासाठी लाकूड उचलले पण त्याच्या मनात विचार आला. गाय आणि माणूस दोघांनाही जीव आहे.मग भेदभाव का मानायचा? ती धान्य खात असेल तर खाऊ दे. तेवढयात व्यापारी तेथे आले त्याने गायीला धान्य खाताना पाहून मुलाला म्हणाले,’’ अरे तुझ्यासमोर ती गाय धान्य खाते आहे? आणि तू आंधळा झाल्यासारखा गप्प बसून का आहेस? आपले किती नुकसान होते आहे याची काही कल्पना आहे की नाही? तिला हाकलून का दिले नाहीस?’’ मुलगा म्हणाला,’’ बाबा, काल तर महाराज म्हणाले की, सगळे जीव एकसारखे आहेत, मी गायीमध्ये पण एक जीव पाहिला’’ तेव्हा व्यापारी म्हणाले, "मूर्खा, अध्यात्म आणि व्यापार यात गल्लत एकसारखे करायची नसते.’’
तात्पर्य :- सारासार बुद्धीचा वापर करून जीवन जगल्यास जीवन सुखदायी होते.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.