A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : गुरुवार
आजची दिनांक : १६ / ०१ / २०२५
आजचा सुविचार : विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
G दिनविशेष
दिनविशेष
२००८
टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या ‘पीपल्स कार’चे अनावरण झाले. ही जगातील सर्वात स्वस्त कार होती. मात्र पहिल्या काही ग्राहकांनाच एक लाख रुपयांत गाडी मिळाली. कच्च्या मालाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ व इतर काही समस्यांमुळे एक लाख रुपयांत गाडी देणे कंपनीला शक्य झाले नाही. अखेर मागणीअभावी २०१८ मध्ये उत्पादन बंद करण्यात आले.
(Image Credit: Car Magazine)
१९९८
ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर
१९९६
पुण्यातील शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड
१९९५
आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले.
१९७९
शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले.
१९७८
रु. १,००० आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. रु. १,०००/- च्या नोटा आत्तापर्यंत तीन वेळा चलनातून रद्द करण्यात आल्या आहेत.
(Image Credit: india.com)
१९५५
पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न
(Image Credit: What’s Hot)
१९४१
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण
१९२०
अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या १४ कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची (League of Nations) पहिली बैठक झाली.
१९१९
अमेरिकेच्या संविधानात १८ वा बदल करण्यात आला आणि संपूर्ण देशात दारूबंदी लागू करण्यात आली.
१६८१
संभाजी राजे यांचा ‘छत्रपती’ म्हणून राज्याभिषेक झाला.
१६६६
नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डाव फसला
१६६०
रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.
१९४६
रुपेश कुमार – रुपेरी पडद्यावरील खलनायक, निर्माते व दिग्दर्शक
(मृत्यू: २९ जानेवारी १९९५)
१९४६
कबीर बेदी – चित्रपट अभिनेते
१९२६
ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर – संगीतकार
(मृत्यू: २८ जानेवारी २००७)
१९२०
नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ‘नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ
(मृत्यू: ११ डिसेंबर २००२)
१८५३
आंद्रे मिचेलिन – फ्रेन्च उद्योगपती
(मृत्यू: ४ एप्रिल १९३१)
२००५
श्रीकृष्ण हरी मेहेंदळे – संगीतकार, ‘पेटीवाले’ मेहेंदळे
२००३
रामविलास जगन्नाथ राठी – सुदर्शन केमिकल्स उद्योगसमुहाचे संस्थापक
२०००
त्रिलोकीनाथ कौल – मुरब्बी मुत्सद्दी, परराष्ट्र सचिव, रशिया, अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत
(जन्म: ? ? १९१३ - बारामुल्ला, जम्मू काश्मीर)
१९९७
कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची गोळ्या घालून हत्या
१९८८
डॉ. लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत
(जन्म: २२ नोव्हेंबर १९१३ - भागलपूर, बिहार)
१९६७
रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक
(जन्म: २० डिसेंबर १९०१)
१९६६
साधू वासवानी – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ
(जन्म: २५ नोव्हेंबर १८७९)
१९५४
बाबूराव पेंटर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि ‘कलामहर्षी’
(जन्म: ३ जून १८९०)
१९३८
शरदचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली साहित्यिक. त्यांच्या ‘देवदास’ या कादंबरीवर (विविध भाषांत) १६ चित्रपट निघाले आहेत. त्यांच्या ‘पथेर दाबी’ या कादंबरीतील क्रांतिकारक विचारांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांतही खळबळ उडवून दिली होती. पु. बा. कुलकर्णी यांनी त्या कादंबरीचे ‘भारती’ या नावाने मराठीत भाषांतर केले आहे.
(जन्म: १५ सप्टेंबर १८७६)
(Image Credit: Banglapedia)
१९०९
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश
(जन्म: १८ जानेवारी १८४२)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
संत उमर आणि भटका माणूस
सूफी संत उमर बगदादमध्येत राहत होते. त्यांच्या ख्यातीने प्रभावित होऊन मोठया संख्येाने लोक त्यांच्यांकडे येत असत. ते सर्वानाच प्रेमाने भेटायचे आणि प्रसन्न व संतुष्ट करायचे. एकदा एक भटका माणूस त्यांच्याकडे भेटण्याासाठी आला. जेव्हा तो उमर यांच्या निवासस्थाानी पोहोचला तेव्हा त्याला दिसले की, संत उमर हे एक फकीर म्हणवतात पण त्यांचे बसायचे आसन हे सोन्याचे आहे. खोलीला सगळीकडे जरीचे पडदे लावलेले आहेत आणि रेशमी दो-यांची सजावट होती. दो-यांच्या खालील बाजूस सोन्याचे घुंगरू बांधलेले होते. चहुकडे सुगंधी अत्तराचा वास दरवळत होता. थोडक्यात काय विलास आणि वैभवाची छाया या फकीराच्या घरावर पसरलेली दिसत होती. उमर काही बोलण्याच्या आधीच हा भटका माणूस त्यांना म्हणाला, "मी आपली फकीरी ख्याती ऐकून आपल्या दर्शनासाठी आलो होतो पण येथे आल्यावर माझी निराशा झाली. आपण फकीरी सोडून वैभवाचा सागर पसरलेला दिसून येतो आहे."
संत उमर हसले आणि म्हाणाले, "हे मात्र खरे आहे, पण तुझी हरकत नसेल तर हे सर्व सोडून मी तुझ्याबरोबर यावयास तयार आहे." भटका तयार होताच, उमर यांनी सर्व सोडून नेसत्या कपड्यांनिशी ते भटक्याबरोबर निघाले. काही अंतर जाताच भटका एके ठिकाणी थांबला व उमर यांना म्हूणाला,"तुम्हीं इथेच थांबा, मी माझा भिक्षेचा कटोरा तुमच्या घरी विसरलो आहे. तेवढा मी परत जाऊन घेऊन येतो." उमर मोठमोठ्याने हसू लागले आणि भटका अचंबित झाला. त्याला काही कळेना की तो असा काय वेगळे बोलला की उमर एवढे मोठ्याने हसताहेत. मग उमर म्हणाले, "अरे मित्रा, तुझ्या सांगण्या वरून मी माझे सर्व ऐश्वर्य सोडून या रानावनात हिंडायला तयार झालो मात्र तुझी त्या कटो-याची आसक्ती मात्र सुटली नाही. मनात जोपर्यंत मोह आहे तोपर्यंत मनुष्य मोठा होत नाही हे मात्र खरे" भटक्याला आपली चूक कळली व त्याने संतांची माफी मागितली.
तात्पार्य :- मोहाने लालसा वाढते आणि ती संग्रहवृत्तीला प्रोत्साहन देते.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.