A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : शुक्रवार
आजची दिनांक : १७ / ०१ / २०२५
आजचा सुविचार : समुद्रातल्या वादळापेक्षा मनातले वादळ खूप मोठे असते.
G दिनविशेष
दिनविशेष
२००१
अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील ‘सूर्या पुरस्कार’ शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांना जाहीर.
२००१
कथ्थक नृत्यांगना डॉ. रोहिणी भाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘कालिदास सन्मान’ जाहीर
१९५६
बेळगाव – कारवार आणि बिदर या जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा
१९४६
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली.
१९४५
दुसरे महायुद्ध – रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.
१८७४
चँग आणि एंग (बंकर) या प्रसिद्ध सयामी जुळ्यांचा एका चिनी दांपत्याच्या पोटी जन्म. या दोघांचेही लग्न होऊन त्यांना एकूण २१ अपत्ये झाली (चँग १० आणि एंग ११)!
(जन्म: ११ मे १८११)
(Image Credit: Wikipedia)
१९४२
मुहम्मद अली ऊर्फ कॅशिअस क्ले – अमेरिकन मुष्टियोद्धा. अमेरिकन वर्णभेदाचा निषेध म्हणून त्याने धर्मांतर करुन मुहम्मद अली हे नाव स्वीकारले.
(मृत्यू: ३ जून २०१६)
१९३२
मधुकर केचे – साहित्यिक
(मृत्यू: २५ मार्च १९९३)
१९१८
रुसी मोदी – टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पद्मभूषण (१९८९)
(मृत्यू: १६ मे २०१४)
१९१८
सईद अमीर हैदर कमाल नक्वी ऊर्फ ‘कमाल अमरोही’ – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी
(मृत्यू: ११ फेब्रुवारी १९९३)
१९१७
मरुथर गोपाल तथा एम. जी. रामचंद्रन – अभिनेते, ए. आय. ए. डी. एम. के. या राजकीय पक्षाचे संस्थापक व तामिळनाडूचे तिसरे मुख्यमंत्री, भारतरत्न (१९८८)
(मृत्यू: २४ डिसेंबर १९८७)
(Image Credit: Wikipedia)
१९०८
अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ ‘एल. व्ही. प्रसाद’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
(मृत्यू: २२ जून १९९४)
१९०६
शकुंतला परांजपे – कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात अनन्यसाधारण कार्य केलेल्या समाजसेविका
(मृत्यू: ३ मे २०००)
१९०५
दत्तात्रय रामचंद्र कापरेकर – गणितज्ञ
(मृत्यू: ? ? १९८६)
१८९५
विठ्ठल दत्तात्रय तथा वि. द. घाटे – लेखक व शिक्षणतज्ञ, रविकिरण मंडळातील एक कवी
(मृत्यू: ३ मे १९७८)
१७०६
बेंजामिन फ्रँकलिन – अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी
(मृत्यू: १७ एप्रिल १७९०)
२०२०
रामचंद्र गंगाराम तथा ‘बापू’ नाडकर्णी – डावखुरे मंदगती गोलंदाज
(जन्म: ४ एप्रिल १९३३ - नाशिक)
२०१४
रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री. उत्तमकुमारबरोबर त्यांची जोडी बंगाली चित्रपटांत चांगलीच गाजली.
(जन्म: ६ एप्रिल १९३१ - पाबना, पाबना, बांगला देश)
२०१३
ज्योत्स्ना देवधर – मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या
(जन्म: २७ फेब्रुवारी १९२६)
२०१०
ज्योति बसू – प. बंगालचे ७ वे मुख्यमंत्री (कार्यकाल: २१ जून १९७७ ते २८ ऑक्टोबर २०००), भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे [CPI(M)] सहसंस्थापक व पॉलिट ब्यूरो सदस्य
(जन्म: ८ जुलै १९१४)
२००८
रॉबर्ट जेम्स तथा ‘बॉबी’ फिशर – अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर
(जन्म: ९ मार्च १९४३)
२०००
सुरेश हळदणकर – गायक आणि अभिनेते
१९९५
डॉ. व्ही. टी. पाटील – शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, तिसऱ्या लोकसभेतील खासदार (१९६२ - १९६७), ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक
(जन्म: ३१ जुलै १९०० - शिगाव, जि. सांगली)
१९८८
लीला मिश्रा – अभिनेत्री
(जन्म: ? ? १९०८)
१९७१
बॅ. पंढरीनाथ बापू तथा नाथ पै – स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ, प्रजा समाजवादी पक्षाचे नेते, दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या लोकसभेतील खासदार (राजापूर), त्यांची लोकसभेतील भाषणे अत्यंत प्रभावी आहेत. मराठी, संस्कृत व इंग्लिश तसेच फ्रेंच व जर्मन भाषांवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते.
(२५ सप्टेंबर १९२२)
(Image Credit: बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण)
१९६१
पॅट्रिक लुमूंबा – काँगोचे पहिले पंतप्रधान
(जन्म: २ जुलै १९२५)
१९३०
अँजेलिना येओवार्ड ऊर्फ ‘गौहर जान’ – गायिका व नर्तिका
(जन्म: २६ जून १८७३)
१८९३
रुदरफोर्ड हेस – अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष (कार्यकाल: ४ मार्च १८७७ ते ४ मार्च १८८१)
(जन्म: ४ आक्टोबर १८२२)
(Image Credit: Wikipedia)
१७७१
गोपाळराव पटवर्धन – पेशव्यांचे सरदार
१५५६
हुमायून – दुसरा मुघल सम्राट
(जन्म: ७ मार्च १५०८)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
सदाचरण व नैतिकता
फार वर्षापूर्वी वाराणसी येथे देवमित्र नावाचे राजपुरोहित राहत होते. राजाला राजपुरोहितांच्या विद्वत्तेचा व योग्यतेचा यथायोग्य आदर होता. म्हणूनच तो त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकत असे. प्रजेमध्ये सुद्धा राजपुरोहितांबद्दल सन्मानपूर्वक आदर होता. एक दिवस राजपुरोहितांना वाटले की राजा आणि इतर सर्व प्रजा आपल्याला इतक्या आदरपूर्वक का वागवतात याचे कारण जाणून घ्यावे. राजपुरोहितांनी हे जाणून घेण्यासाठी एक गुप्त योजना बनविली. दुस-या दिवशी त्यानी दरबारातून परतताना राजाच्या खजिन्यातून एक सुवर्णमुद्रा गुपचुप उचलून घेतली. हे खजिनदाराने पाहिले पण ते पाहून त्याने न पाहिल्यासारखे केले. हा प्रकार परत दुस-या दिवशीही घडला. राजपुरोहितांनी पुन्हा दुस-या दिवशी हळूच एक सुवर्णमुद्रा उचलली व स्व्त:जवळ ठेवली. तिस-या दिवशी त्यांनी एक मुठभर सुवर्णमुद्रा उचलल्या व खिशात भरल्या. यावेळी मात्र खजिनदाराने सैनिकांना बोलावले व राजपुरोहितांना कैद करण्यास सांगितले. राजपुरोहितांना कैद झाली ही गोष्ट राजाच्या कानावर गेली. न्यायदान करताना राजाने आपला निर्णय दिला की राजपुरोहितांकडून घडलेल्या या चुकीबद्दल त्यांना तीन महिने सक्त कारावासाची सजा देण्यात यावी. तीनवेळेला त्यांनी कोषातून धन चोरले म्हणून तीन महिने सजा देण्यात आली आहे जेणेकरून ते पुन्हाच असा अपराध करण्यात यशस्वी होणार नाही. या न्यायावर राजाने राजपुरोहितांची प्रतिक्रिया विचारली. राजपुरोहितांनी राजाला यामागील कारण सांगताना, “राजन, मी काही अट्टल चोर नाही. मी फक्त जाणून घेण्यास इच्छुक होतो की लोक कशामुळे मला सन्माान देतात, वैयक्तिक माझा सन्मान करतात की मी करत असलेल्या सदाचरणाचा लोक सन्मान करतात. पण आता माझ्या लक्षात आले आले आहे की लोक हे माझ्या विद्वत्तेपेक्षा माझ्या सदाचरणाला महत्व देतात. गैरवर्तणूक करताच मी दंडास प्राप्त झालो आणि त्या्वेळेला माझी विद्वत्ता, संपत्ती, मानमरातब हे काहीही मदतीला आले नाही. माझे सद आचरण हेच माझ्या सन्मानाचे कारण आहे हे मला समजून चुकले आहे. मी माझ्या गैरवर्तणुकीबद्दल आपली क्षमा मागतो.” राजाने यावर सांगितले, “राजपुरोहित महाराज, तुम्हीर कोणत्याही भावनेतून जरी हे कार्य केले असले तरी तुम्हाला दंड होणे क्रमप्राप्त आहे तरी तुम्ही शिक्षेस तयार राहा.” राजपुरोहितांनी राजाचे म्हणणे ऐकले व स्वत:ला सैनिकांच्या स्वाधीन केले.
तात्पर्य :- सदाचरण हेच मनुष्याचे धन आहे. नैतिकता पाळणे आणि ती आचरणात आणणे यातच मनुष्याजन्माचे सार्थक आहे.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.