A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : शनिवार
आजची दिनांक : १८ / ०१ / २०२५
आजचा सुविचार : अचूकता पाहिजे असेल तर सराव महत्त्वाचा आहे.
G दिनविशेष
दिनविशेष
२००५
एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.
१९९९
नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
१९९८
मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९७
नोर्वेच्या बोर्ग आऊसलंडने एकट्याने व कोणाच्याही मदतीशिवाय अटलांटिक महासागर पार केला.
१९७४
इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या.
१९५६
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार
१९११
युजीन बी. इलायने सानफ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
१७७८
कॅप्टन जेम्स कूक हा हवाई बेटांवर पोचणारा पहिला युरोपियन बनला.
१९७२
विनोद कांबळी – भारतीय क्रिकेटपटू
(Image Credit: Wisden)
१९६६
अलेक्झांडर खलिफमान – रशियन बुद्धिबळपटू
(Image Credit: Chess Federation of Russia)
१९५२
कुसे मुनीस्वामी वीरप्पन – चंदन व हस्तिदंत तस्कर. आपल्या ४० वर्षांच्या ‘कारकिर्दीत’ खंडणीसाठी त्याने अनेक राजकीय नेत्यांचे अपहरण केले. ९७ पोलीस आणि वनाधिकाऱ्यांसह सुमारे १८४ व्यक्ती आणि ९०० हत्तींच्या हत्येस तो कारणीभूत आहे. मात्र मानवतेवर अगाध विश्वास असणारी वीरप्पनची मुलगी विद्या वीरप्पन ही प्रखर राष्ट्रभक्तीने प्रेरित झाली आहे आणि ती सध्या तामिळनाडू भाजपाची कार्यकर्ती आहे!
(मृत्यू: १८ आक्टोबर २००४)
(Image Credit: Wikipedia)
१९३३
जगदीश शरण वर्मा – भारताचे २७ वे सरन्यायाधीश
(मृत्यू: २२ एप्रिल २०१३)
१८८९
शंकर काशिनाथ गर्गे तथा ‘दिवाकर’ – नाट्यछटाकार
(मृत्यू: १ आक्टोबर १९३१)
१८८९
देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. – कन्नड कवी व विचारवंत
(मृत्यू: ७ आक्टोबर १९७५ - बंगळुरू, कर्नाटक)
(Image Credit: Wikipedia)
१८४२
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश
(मृत्यू: १६ जानेवारी १९०९)
१७९३
महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले (मराठा साम्राज्याचे आठवे छत्रपती) यांचे निधन. छत्रपती शाहू (दुसरे) यांचे ते थोरले चिरंजीव होत. पेशवाईच्या अस्तानंतर माऊंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी पुन: त्यांना छत्रपतींच्या गादीवर बसवले. पाठशाळा आणि संस्कॄत व मराठीबरोबरच इंग्रजी भाषेच्या अध्यापनाला त्यांनी उत्तेजन दिले.
(मृत्यू: ४ आक्टोबर १८४७ - वाराणसी, उत्तर प्रदेश)
(Image Credit: Wikipedia)
२०१५
शकुंतला महाजन तथा ‘बेबी शकुंतला’ – लोभसवाणे रूप, शालीन सौंदर्य आणि कसदार अभिनयाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत अमीट अशी मुद्रा उमटविणाऱ्या अभिनेत्री. प्रभात फिल्म कंपनीचा ‘दहा वाजता’ (१९४२) हा त्यांचा पहिला सिनेमा. पुढे ‘प्रभात’च्या ‘रामशास्त्री प्रभुणे’ सिनेमातील त्यांची भूमिका गाजली. बालकलाकार म्हणून अभिनयात ठसा उमटविलेल्या शकुंतला यांनी पुढील काळात हिंदी आणि मराठीतील दिग्गज कलावंतांसोबत काम केले आणि अनेक भूमिका उत्कृष्टपणे वठवल्या. परदेस, कमल के फूल, शिकायत, भाग्यवान, बिंदिया, बचपन, बच्चों का खेल, मोती, पूजा, नन्हे मुन्हे, सपना अशा अनेक हिंदी सिनेमांतून त्यांची कारकीर्द बहरली. १९५० मध्ये ‘परदेस’ हा सिनेमा लागला. मधुबाला आणि बेबी शकुंतला यांच्या अभिनयासोबतच सौंदर्यामुळेही हा सिनेमा गाजला. हिंदीतील प्रख्यात दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या ‘बिराज बहू’ सिनेमातील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले. गायक-कलाकार किशोरकुमार यांच्यासोबत फरेब, लहेरे या सिनेमातील भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत. छत्रपती शिवाजी, सीता स्वयंवर, मोठी माणसं, श्रीकृष्ण दर्शन, मी दारू सोडली, अखेर जमलं, चिमणी पाखरे, मूठभर चणे, मालती माधव, संत बहिणाबाई, तोतयाचे बंड, तारामती या मराठी सिनेमातील भूमिका प्रामुख्याने गाजल्या. सिनेकारकीर्द बहरात असताना १९५४ मध्ये त्यांचा गडहिंग्लज येथील इनामदार घराण्यातील श्रीमंत बाबासाहेब नाडगौंडे यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर त्यांनी सिनेमात काम करायचे बंद करून संसाराला वाहून घेतले. राज्य सरकाने त्यांचा १९९६ मध्ये विशेष सन्मान केला होता. कोल्हापूर भूषण, करवीरभूषण, कलाभूषण, जीवनगौरव हे पुरस्कार त्यांच्याकडे चालत आले. प्रभात फिल्म कंपनीत बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर चमकलेल्या बेबी शकुंतला यांनी सहजसुंदर अभिनयाने आपला स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला. कारकीर्द बहरात असताना त्यांनी १९५४ मध्ये सिनेसृष्टीचा निरोप घेतला. मात्र, त्यांची प्रेक्षक आणि सिनेमाशी नाळ शेवटपर्यंत कायम राहिली. या अभिनेत्रीची मोहिनी शेवटपर्यंत प्रेक्षकांवर राहिली. वयाच्या ८२ व्या वर्षी ही ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली. आणि त्यांच्या रूपाने सिनेमाचा चालता बोलता इतिहासच लुप्त झाला. बेबी शकुंतला यांनी मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवला.
(जन्म: १७ नोव्हेंबर १९३२)
२००३
हरिवंशराय बच्चन – हिन्दी कवी
(जन्म: २७ नोव्हेंबर १९०७)
(Image Credit: Wikipedia)
१९९६
नंदमुरी तारक तथा एन. टी. रामाराव – तेलगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व (अविभाजित) आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री, पद्मश्री (१९६८)
(जन्म: २८ मे १९२३)
(Image Credit: Wikipedia)
१८९३
आत्माराम रावजी भट – कृतिशील विचारवंत, ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे संस्थापक
(जन्म: १२ मे १९०५)
१९४७
कुंदनलान सैगल – गायक व अभिनेते
(जन्म: ११ एप्रिल १९०४)
१९३६
रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक
(जन्म: ३० डिसेंबर १८६५)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
मुर्ख राजा आणि बुद्धिमान ऋषी
एका राज्यात मूर्ख राजाचे शासन होते. त्याचे मंत्री, सेनापती, सरदार हे सर्वच्या सर्व मूर्ख व चालुसी करणारे होते. त्या राजाच्या राज्याात व दरबारात विद्वानांचा अनादर केला जाई. एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा हुशार आहे असे लक्षात आले त्याला राजाचे सहकारी अपमानित करत. या कारणाने कोणीही विद्वान, पंडीत, ज्ञानी मनुष्य त्या राज्यात जात नसत. त्यामुळे त्या राज्यात बौद्धिक चर्चांची परंपरा खंडीत झाली होती. एकदा राजाला माहिती समजली की, एक ऋषी तीर्थाटनासाठी निघाले आहे व ते आपल्या राज्यातून जाणार आहेत. मंत्र्यांनी सल्ला दिला की त्या ऋषींना आपल्या दरबारात बोलवावे जेणेकरून ते जर विद्वान, पंडीत असतील तर त्यांचा अपमान करून आनंद मिळविता येईल आणि जर ते ऋषी मूर्ख असतील तर त्यांचा सत्कार करावा म्हणजे जनतेचा विश्वास बसेल की राजा मूर्ख माणसांचाही सत्कार करणे जाणतो. राजा व मंत्री नगराच्या मुख्य दरवाजात जाऊन उभे राहिले.
ऋषी नगरापाशी आले. नगराबाहेर काही जीर्ण झालेल्या झोपड्या पाहून थांबले व त्यांनी विचारले, “या कुणाच्या झोपड्या आहेत?” राजाने उत्तर दिले, “या बुद्धिमान, विद्वान लोकांच्या झोपड्या आहेत. बुद्धिमान लोकांना मी हाकलून दिले कारण मला बुद्धिमान लोकांशिवायही शासन चालविता येते हे दाखवून द्यायचे होते. माझ्या राज्यातून हाकलून दिलेले विद्वान लोक येथे काही काळ घालवित होते.” हे उत्तर ऐकताच ऋषी तात्काळ राजाला म्हणाले, “हे राजा, तर मग तुझ्या राज्यात एक पाऊलही न टाकता मी येथूनच मी परत जात आहे कारण जेथे विद्वानांचा आदर केला जात नाही, बुद्धिवंतांची कदर केली जात नाही, पंडीतांचे म्हाणणे ऐकले जात नाही, बुद्धिवंतांची चर्चासत्रे घडत नाहीत अशाठिकाणी न जाणेच योग्य असते. जेथे हे सर्व घडत नाही त्याचा सर्वनाश जवळ आला आहे हे निश्र्चित समजावे.” हे सांगून ऋषी तेथून निघून गेले. कालांतरांनी मूर्खानी केलेल्यान उपदेशाने राजाचे राज्य लयाला गेले. त्याचे पूर्ण पतन झाले. ऋषींनी वर्तवलेला अंदाज खरा ठरला.
तात्पर्य:- बुद्धी कठीण समस्यांचे निराकरण करते. बुद्धिमानांचा आदर जर समाज करत असेल तर तो समाज पुढे जाऊन विकास करतो. विद्वान लोक जेथे वस्ती करतात तेथे ते विकास करतात. जेथे विद्वानांचे म्हणणे ऐकले जात नाही तेथे सर्वनाश अटळ आहे. खरे आहे ना...
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.