A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : रविवार
आजची दिनांक : १९ / ०१ / २०२५
आजचा सुविचार : अचूकता पाहिजे असेल तर सराव महत्त्वाचा आहे.
G दिनविशेष
दिनविशेष
१९९६
उस्ताद अल्लारखा खाँ यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड
१९९६
प्रसिध्द मल्याळी लेखक एम. टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड
१९८६
(c)brain नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली.
१९६८
पहिली यशस्वी हृदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.
१९५६
देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम
१९५४
कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन झाले.
१९४९
पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन ‘पुणे महानगरपालिका’ स्थापन झाली.
१९४९
क्यूबाने इस्त्रायला मान्यता दिली.
१९४२
दुसरे महायुद्ध – जपानने ब्रह्मदेशवर आक्रमण केले.
१९०३
अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता.
१८३९
ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला.
१९३६
झिया उर रहमान – बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: ३० मे १९८१)
१९२०
झेवियर पेरेझ द कुइयार – संयुक्त राष्ट्रांचे पाचवे सरचिटणीस
१९०६
विनायक दामोदर कर्नाटकी ऊर्फ ‘मास्टर विनायक’ – अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते. त्यांनी २२ चित्रपटातून भूमिका केल्या तर २९ चित्रपट दिग्दर्शित केले.
(मृत्यू: १९ ऑगस्ट १९४७)
१८९८
गणेश आत्माराम तथा विष्णू सखाराम तथा ‘वि. स.’ खांडेकर – मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक, १९४१ मध्ये सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पद्मभूषण (१९६८), साहित्य अकादमी फेलोशिप विजेते (१९७०), त्यांनी ‘कुमार’ या टोपणनावाने कविता लेखन तर ‘आदर्श’ या टोपणनावाने विनोदी लेखनही केले आहे. त्यांच्या ‘ययाति‘ या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) मिळाला आहे.
(मृत्यू: २ सप्टेंबर १९७६)
(Image Credit: विकिपीडिया)
१८९२
चिं. वि. जोशी – विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक
(मृत्यू: २१ नोव्हेंबर १९६३)
१८८६
रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा ‘सवाई गंधर्व’ – किराणा घराण्याचे हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, खाँसाहेब अब्दुल करीम खाँ यांचे शिष्य, पं. भीमसेन जोशी आणि गंगुबाई हनगळ यांचे गुरू. ख्याल, ठुमरी, भजन, नाट्यगीत असे अनेक प्रकार त्यांनी हाताळले. दादासाहेब खापर्डे यांनी त्यांना ‘सवाई गंधर्व’ ही पदवी दिली.
(मृत्यू: १२ सप्टेंबर १९५२)
(Image Credit: Wikipedia)
१८०९
एडगर अॅलन पो – अमेरिकन (गूढ व भयकथांचा) लेखक, कवी, संपादक व समीक्षक
(मृत्यू: ७ आक्टोबर १८४९)
(Image Credit: Wikipedia)
१७३६
जेम्स वॉट – स्कॉटिश संशोधक व यंत्र अभियंता
(मृत्यू: २५ ऑगस्ट १८१९)
२०००
मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम – उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, ‘बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया’ (BCCI) चे अध्यक्ष; उपाध्यक्ष व खजिनदार, तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, चेन्नईचे महापौर (१९५५), चेन्नईतील ‘चेपॉक’ स्टेडियमला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
(जन्म: १२ आक्टोबर १९१८)
१९९०
भगवान श्री रजनीश – आध्यात्मिक गुरू
(जन्म: ११ डिसेंबर १९३१)
१९६०
रामचंद्र गोपाळ ऊर्फ ‘दादासाहेब तोरणे’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक, मराठी चित्रपटसृष्टीचे आद्य प्रवर्तक
(जन्म: १३ एप्रिल १८९०)
१९५६
प्रबोध चंद्र बागची – इतिहासकार
(जन्म: १८ नोव्हेंबर १८९८)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
दळणाचे जाते आणि खजिना
राजा भीमसेन याला आपल्या दौलतीबद्दल प्रचंड घमेंड होती. एके दिवशी त्याला त्यााचा मित्र समशेर भेटण्यासाठी म्हणून आला. मित्राचे राजाने मनापासून स्वागत केले. त्याचा यथायोग्य पाहुणचार केला. विश्रांतीनंतर राजाने त्यााला आपला महाल पाहण्यासाठी आमंत्रण दिले. दोघेहीजण महालातून फिरत असताना राजाने आपल्या श्रीमंतीचा थाट मित्राला दाखविण्यास सुरुवात केली. सर्वत्र त्याच्या श्रीमंतीचे कोंदण कसे आहे याबद्दल राजा मोठ्या गर्वाने सर्व माहिती देत होता. सर्व ठिकाणी फिरून झाल्या्वर राजाने शेवट त्याला आपल्या खजिन्याच्या खोलीकडे नेले. राजाचा प्रचंड मोठा खजिना पाहून समशेरचे डोळे दिपून गेले. तो अचंबित होऊन खजिना पाहतच बसला. राजा खजिन्याबद्दल माहिती सांगतच होता की हा खजिना किती किंमती आहे. अनेक दुर्मिळ रत्ने , अलंकार, जडजवाहिर, मोती, सोने, चांदी, अनमोल अशा वस्तू कशा मी जमा केल्या आहेत. या खजिन्याच्या सुरक्षेसाठी काहीशे सैनिक चोवीस तास पहारा देत असतात. अशी सर्व माहिती राजा देत असतानाच समशेर ऐकत होता पण त्याचे राजाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष होत होते. काही वेळाने समशेर शेवटी राजाला म्ह्णाला, “मित्रा हे इतके धन तू जमा केलेले आहेस पण याचा दुस-यांनाही काही फायदा होतो की नाही” राजा म्हणाला, “अरे मित्रा, इतक्या बहुमूल्य अशा खजिन्याचा माझ्याशिवाय दुस-या कोणाला फायदा होणार आहे.” यानंतर समशेर राजाला बरोबर घेऊन एका झोपडीकडे गेला. तिथे एक वृद्ध महिला जात्याावर धान्य दळत बसली होती. समशेरने राजाला ते दळणाचे जाते दाखवून म्होणाला, “राजा हे जातेही दगडाचे आहे आणि तुझ्या खजिन्यात तू जी रत्ने ठेवली आहेत ती पण दगडाचीच आहेत. फरक इतकाच आहे की त्या रत्नांचा तुझ्याशिवाय कुणालाच फायदा नाही आणि या दगडाच्या जात्याचा मात्र सगळ्या गावाला फायदा होतो. गावकरी मंडळी येथे येतात व धान्य दळून घेऊन जातात. तू ज्यांना रत्नांच्याा पहा-याला सैनिक उभे केले आहेत त्यांच्या अंगी शक्ती येते ती सुद्धा या जात्यातून निघणा-या पीठामधून. म्हणून राजन मला तुझ्या सर्व खजिन्यापेक्षा, राज्यातील सर्व श्रीमंतीपेक्षा ही दगडाची जाती मला सर्वश्रेष्ठे वाटली.” राजाला आपली चूक कळाली व त्याची घमेंड पूर्ण उतरून गेली.
तात्पर्य :- ज्या गोष्टीने मानव समाजाचे कल्यााण होत असेल अशा गोष्टी करणे हितकर असते. मनुष्य जन्मात येऊन जर इतरांचे हित पाहता येत नसेल तर असा मनुष्य जन्म काय कामाचा.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.