A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : शनिवार
आजची दिनांक : २० / ०१ / २०२४
आजचा सुविचार : दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे. तो नेहमी विचारच परावर्तित करतो.
G दिनविशेष
दिनविशेष
२००९
अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून बराक ओबामा यांनी पदभार स्वीकारला. ते अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष आहेत.
[कार्यकाल: २० जानेवारी २००९ ते २० जानेवारी २०१७]
१९९९
गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
१९९८
संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा ‘पोलार संगीत पुरस्कार’ विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर
१९६३
चीन व नेपाळ या देशांत सीमा करार झाला.
१९४८
महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्न झाला. याआधी १९३४ मध्ये एकदा आणि १९४४ मध्ये दोनदा त्यांची हत्या करण्याचे प्रयत्न झाले होते.
१९४४
दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने बर्लिनवर २३०० टन बॉम्बवर्षाव केला.
१९३७
फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी २० जानेवारी या दिवशी करण्याची प्रथा पडली.
[कार्यकाल: ४ मार्च १९३३ ते १२ एप्रिल १९४५]
१८४१
ब्रिटिशांनी हाँगकाँग बेटाचा ताबा घेतला.
१७८८
इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनार्यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.
१९६०
आपा शेर्पा – १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक
१८९८
कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ‘मास्टर कृष्णराव’ – प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार, त्यांच्या गायनात ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर घराण्यांचा संगम दिसून येई. ‘वंदे मातरम’ला त्यांनी दिलेली चाल लोकप्रिय ठरली.
(मृत्यू: २० आक्टोबर १९७४)
(Image Credit: Jaipur Guni Jan Khana)
१८७१
सर रतनजी जमसेटजी टाटा – टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ति
(मृत्यू: ५ सप्टेंबर १९१८)
१७७५
आंद्रे अॅम्पिअर – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: १० जून १८३६)
२००२
रामेश्वरनाथ काओ – रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. काओ यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अध्वर्यू मानण्यात येते.
(जन्म: १० मे १९१८)
१९९३
ऑड्रे हेपबर्न – ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी, ’रोमन हॉलिडे’ या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला.
(जन्म: ४ मे १९२९)
(Image Credit: Wikimedia Commons)
१९८८
खान अब्दुल गफार खान उर्फ ‘सरहद गांधी’ उर्फ ‘बादशाह खान’ उर्फ ‘बच्चा खान’ – वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्यसेनानी, त्यांनी १९२९ मध्ये ‘खुदाई खिदमतगार’ (अर्थ: ईश्वराचे सेवक) या संघटनेची स्थापना केली. हे वायव्य प्रांतातील स्वातंत्र्यासाठी केलेले अहिंसक आंदोलन होते. भारतरत्न (१९८७) पुरस्काराने गौरव झालेले ते पहिले अभारतीय होत.
(जन्म: ३ जून १८९०)
१९८०
कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण (१९६९), रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक (१९३७ - १९४९). अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले. आपल्या गिरण्य़ांत त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या.
(जन्म: १९ डिसेंबर १८९४)
१९५१
अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ‘ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक
(जन्म: २९ नोव्हेंबर १८६९)
१९३६
जॉर्ज (पाचवा) – इंग्लंडचा राजा
(जन्म: ३ जून १८६५)
१८९१
डेविड कालाकौआ – हवाईचा राजा
(जन्म: १६ नोव्हेंबर १८३६)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
हा श्र्लोक मात्र नवीन आहे
'नवा श्लोक ऎकविणाऱ्या कवीला एक हजार सुवर्ण मोहोरा इनाम' हे राजा भोज याने दिलेले आव्हान मणिपूरच्या एका विद्वान व अंगी काव्यरचनेची शक्ती असलेल्या ब्राम्हणाच्या कानी गेले. तो माळव्याची राजधानी धारानगरी येथे मोठया उत्साहाने आला.
परंतू राजधानी आल्यावर त्याच्या कानी पडलेल्या हकीकतीमुळे निरुत्साही होऊन, तो कालीदासाकडे गेला व त्याला म्हणाला, 'कवीराज ! मी भोजमहाराजांचे आव्हान स्वीकारण्याच्या हेतूनं, त्यांना ऎकविण्यासाठी एक श्लोक घेऊन मुद्दाम मणिपूरहून इथे आलो आहे. परंतू इथे आल्यावर मला असं कळल की, भोजराजांच्या राजसभेत कुणी एखाद्यानं अगदी नवा श्लोक जरी म्हणून दाखवला, तरी दरबारात असलेला एकपाठी पंडित तो श्लोक जसाच्या तसा म्हणून दाखवितो. त्याच्यानंतर द्विपाठी पंडित त्याचापुनरुच्चार करतो. शेवटी त्रिपाठी पंडितानेही तो श्लोक जसाच्या तसा म्हणून दाखविल्यावर भोज महाराज श्लोक कर्त्याला म्हणतात, 'ज्या अर्थी तुम्ही म्हटलेला श्लोक आमच्या राजसभेतील तीन पंडितांनी जसाच्या तशा म्हणून दाखविला, त्या अर्थी तो जुना आहे सिध्दच होते, ' तेव्हा कवीराज ! दरबारात नवा श्लोक घेऊन येणार्यांना असेच जर बनवून परत पाठविले जात असेल, तर मी तरी तिथे कशाला जाऊ?'
कालीदासाने त्या ब्राम्हणाला एक युक्ती सांगितली. त्याप्रमाणॆ त्याने एक नवा श्लोक रचला व भोज राजाच्या दरबारात जाऊन ऎकविला. त्या श्लोकाचा अर्थ होता, भोज महाराजांचे वडिल अत्यंत दानशूर. अखंड दानधर्म करीत राहिल्याने त्यांना एकदा धनाचा तोटा पडला. त्यामुळे त्यांनी तेव्हा माझ्या वडिलांकडून एक लाख सुवर्ण मोहोरा कर्जाऊ घेतल्या. परंतू कर्जफेडीला सुरुवात करण्यापूर्वीच त्यांना मृत्यु आल्याने, भोज महाराज माझे एक लाख सुवर्ण मोहोरा देणे लागतात.'
'हा श्लोक नविन नाही' असं म्हणावं, तर आपले वडिल या ब्राम्हणांच्या वडिलांचे एक लाख सुवर्ण मोहोरा देणे लागत होते असे मान्य केल्यासारखे होऊन तेवढ्या मोहोरा याला द्याव्या लागतील; त्यापेक्षा 'हा श्लोक एकदम नविन आहे.' असे म्हणणे पत्करले,' असा विचार करुन भोज राजाने त्या ब्राम्हणाचे नवीन श्लोक ऎकविल्याबद्दल तोंडभरून कौतुक केले व त्याला एक हजार सुवर्ण मोहोरा देऊन वाटेला लावले.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.