A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : रविवार
आजची दिनांक : २१ / ०१ / २०२४
आजचा सुविचार : जीवनात आव्हाने टाळण्याचा कोणताही पर्याय नाही, म्हणून एकतर त्यांचा सामना करण्यास शिका किंवा हार मानू नका.
G दिनविशेष
दिनविशेष
२०००
‘फायर अँड फरगेट‘ या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.
१९७२
मणिपूर आणि मेघालय यांना राज्याचा दर्जा मिळाला.
१९६१
इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिंबरो यांची पहिली भारतभेट
१८०५
होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.
१७९३
राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा १६ वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला.
१७६१
थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.
१९५३
पॉल अॅलन – मायक्रोसॉफ्टचा एक संस्थापक
१९२४
प्रा. मधू दंडवते – रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ
(मृत्यू: १२ नोव्हेंबर २००५)
१९१०
शांताराम आठवले – चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार. ‘भाग्यरेखा’, ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘शेवग्याच्या शेंगा’ वगैरे अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. ‘संत तुकाराम’ चित्रपटातील ‘आधी बीज एकले’ हा अभंग त्यांनी रचला आहे. परंतु लोकांना हा अभंग तुकारामांचाच आहे असे वाटते.
(मृत्यू : २ मे १९७५)
(Image Credit: shantaramathavale.com)
१८९४
माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ ‘माधव जूलियन’ – कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते
(मृत्यू: २९ नोव्हेंबर १९३९)
१८८२
वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक
(मृत्यू: २० जुलै १९४३)
१९९८
सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख
(जन्म: २१ जून १९१६)
१९६५
हरिकीर्तन कौर ऊर्फ ‘गीता बाली’ – अभिनेत्री
(जन्म: ? ? १९३०)
१९५९
सेसिल डी मिल – अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक
(जन्म: १२ ऑगस्ट १८८१)
१९५०
एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल – इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार
(जन्म: २५ जून १९०३)
१९४५
रास बिहारी घोष – क्रांतिकारक. १९४२ मध्ये टोकियो येथे त्यांनी घेतलेल्या एका परिषदेत ‘इंडियन इंडिपेडन्स लीग’ ची स्थापना केली. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र दल उभारण्याची गरज आहे अशी त्यांची भूमिका होती. यातूनच पुढे ‘इंडियन नॅशनल आर्मी’ उदयास आली.
(जन्म: २५ मे १८८६ - सुबलदाहा, पूर्व बर्धमान, पश्चिम बंगाल)
१९४३
क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली.
(जन्म: २३ मार्च १९२३)
१९२४
ब्लादिमिर लेनिन – रशियन क्रांतिकारक
(जन्म: २२ एप्रिल १८७०)
१९०१
एलीशा ग्रे – वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक
(जन्म: २ ऑगस्ट १८३५)
१७९३
लुई (सोळावा) – फ्रान्सचा राजा
(जन्म: २३ ऑगस्ट १७५४)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
समस्या पूर्ती
माळव्याचा राजा भोज अज 'धारानगरी' या आपल्या राज्याच्या राजधानीत रहात होता. राजा असा प्रजाहितदक्ष व विद्वान होता, तसाच रसिक होता. त्यामुळे त्याच्या पदरी कालीदासासारखे कवी व महापंडित होते.
एकदा भोजराजाच्या राजवाड्यात पहिल्या मजल्यावरील आपल्या शयनमंदिरात राणीची वाट पहात बसला होता. त्याच वेळी राणी तळमजल्यावरून शयनमंदिराकडे जाण्यासाठी जिन्याच्या पायऱ्या चढू लागली. पायऱ्या चढत असता, पतीबद्दलच्या विचारांच्या तंद्रीत तिचं एक पाऊल चुकीचं पडून, तिचा तोल गेला, आणि तिच्या हातातील-चंदनलेप असलेली सोन्याची वाटी पडून तो 'ठण ठण ठण ठण' असा आवाज करीत गडगडत जिन्याच्या तळापर्यंत गेली.
भोजराजानं ही घटना लक्षात घेऊन दुसऱ्या दिवशी ‘नवरत्नांनी’ म्हणजे नऊ कवी-पंडितांनी भरलेल्या आपल्या दरबारात एक 'समस्या' पूर्ण करण्यासाठी मांडली. तो म्हणाला, 'असा एक अर्थपूर्ण श्लोक बनवा की ज्यात ‘ठाठं ठठं ठं, ठठठं ठठं ठम’ ही ध्वनीवाचक अक्षरांची ओळ चपलखपणे बसेल.'
इतर सर्वांनी मेंदू शिणवले, पण कुणालाच ती समस्या पूर्ण करणे जमेना, तेव्हा महान प्रतिभासंपन्न कवी कालिदास उभा राहिला व म्हणाला -
श्लोकभोजस्य भार्या मदविव्हला या कराच्च्युतं चंदनहेमपात्रम ।
सोपानमार्गे प्रकरोति शब्दम ।
ठाठं ठठं ठं ठठठं ठठं ठम ॥
अभिप्रेत अर्थ - कामविव्हल झालेली भोजराजाची पत्नी चंदनलेपाने भरलेले भांडे घेऊन जिन्याच्या मार्गाने जात असता, तिच्या हातातील भांडे पडले व जिन्यातून गडगडत खाली जाताना त्यानी 'ठाठं ठठं ठं ठठठं ठठं ठम' असा आवाज केला.कालिदासाने केलेल्या समस्यापूर्तीमुळे राजसभेप्रमाणेच भोजराजाही थक्क झाला आणि त्याने त्याला एक हजार सुवर्ण मोहरा देऊन त्याचा गौरव केला.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.