A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : गुरुवार
आजची दिनांक : २३ / ०१ / २०२५
आजचा सुविचार : माणूस जेवढा आजाराने थकत नाही, त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो.
G दिनविशेष
दिनविशेष
२००२
वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनिअल पर्ल याचे कराचीतुन अपहरण
१९९७
मॅडलिन ऑलब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री बनल्या.
१९६८
शीतयुद्ध – उत्तर कोरियाने अमेरिकेची यू. एस. एस. प्युएब्लो ही हेरगिरी करणारी युद्धनौका ताब्यात घेतली.
(Image Credit: Wikipedia)
१९४३
दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने त्रिपोली (लिबीयाची राजधानी) शहर जिंकले.
१९३२
‘प्रभात’चा ‘अयोध्येचा राजा’ हा बोलपट मुंबईच्या ‘कृष्णा’ या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.या चित्रपटाची हिंदी आवृत्ती ‘अयोध्याका राजा’ ही सुद्धा त्याच वर्षी प्रदर्शित झाली.
(Image Credit: CHILOKA)
१८४९
डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर बनली.
१७०८
छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.
१५६५
विजयनगर साम्राज्याची अखेर
१९४७
मेगावती सुकार्नोपुत्री – इंडोनेशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष
(Image Credit: Alchetron)
१९३४
सर विल्यम हार्डी – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ
(मृत्यू: ६ एप्रिल १८६४)
१९२६
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
(मृत्यू: १७ नोव्हेंबर २०१२)
१९२०
श्रीपाद रघुनाथ जोशी – व्यासंगी लेखक
१९१५
कमलनयन बजाज – उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव, बजाज आटो, बजाज इलेक्ट्रिकल्स, उदयपूर सिमेंट इ. कंपन्यांचे अध्यक्ष
(मृत्यू: १ मे १९७२)
१८९८
पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक, पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य
(मृत्यू: १७ डिसेंबर १९५६)
१८९७
नेताजी सुभाषचंद्र बोस
(मृत्यू: १८ ऑगस्ट १९४५ - फोर्मोसा, तैवान)
१८१४
सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी
(मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९३)
२०१०
पं. दिनकर कैकिणी – आग्रा घराण्याचे शास्त्रीय गायक. पतियाळा घराण्याचे के. नागेश राव यांच्याकडून त्यांनी संगीत शिक्षणाची सुरुवात केली. कैकिणींनी ख्याल, ध्रुपद, धमार, ठुमरी व भजन शैलींत शेकडो नवीन रचना केल्या व अनेक नवे राग बांधले. त्यांच्या गायकीत ग्वाल्हेर व आग्रा या दोन्ही घराण्यांचा उत्तम संगम दिसून येतो.
(जन्म: २ आक्टोबर १९२७)
(Image Credit: राग श्रुति)
१९९२
ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर – भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक
१९८९
साल्वादोर दाली – स्पॅनिश चित्रकार. विसाव्या शतकात पिकासोच्या खालोखाल प्रसिद्धी व लोकप्रियता मिळवलेले चित्रकार म्हणून ते ओळखले जातात.
(जन्म: ११ मे १९०४)
१९५९
विठ्ठल नारायण चंदावरकर – शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित
(जन्म: ? ? ????)
१९३१
अॅना पाव्हलोव्हा – ‘द डाइंग स्वान’ म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना
(जन्म: १२ फेब्रुवारी१८८१)
१९१९
राम गणेश गडकरी – नाटककार, कवी व विनोदी लेखक. ते ‘गोविन्दाग्रज’ या टोपणनावाने कथालेखन करीत तर ‘बाळकराम’ या नावाने विनोदी लेखन करीत. ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘राजसंन्यास’ ही त्यांची नाटके अतिशय गाजली. ‘वाङ्वैजयंती’ नावाने त्यांच्या कविता संग्रहित केलेल्या आहेत.
(जन्म: २६ मे १८८५)
१६६४
शहाजी राजे भोसले यांचे कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना घोडा अडखळून पडल्याने अपघाती निधन
(जन्म: १८ मार्च १५९४)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
गरुड आणि घुबड
एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,’ गरुड म्हणाला, ‘खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.’ घुबड म्हणाले, ‘ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.’
पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ‘किती घाणेरडी, कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.’ असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला !
आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ‘गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.’ गरुड म्हणाला, ‘मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे. तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?’
तात्पर्य - स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.