A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : रविवार
आजची दिनांक : ०५ / ०१ / २०२५
आजचा सुविचार : द्वेषाचा चष्मा काढला की, सर्व जग प्रेमळ दिसायला लागतं.
G दिनविशेष
दिनविशेष
२००४
‘संभाजी ब्रिगेड’ या संघटनेच्या समाजसेवकांनी केलेल्या हल्ल्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटचे अतोनात नुकसान झाले. समाजसेवकांनी अनेक अमोल व दुर्मिळ ग्रंथ जाळण्यात व फाडण्यात आले.
१९९८
ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते ‘महात्मा गांधी शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
१९९७
रशियाने चेचेन्यातुन सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.
१९७४
अंटार्क्टिकामधील सर्वोच्च तापमानाची (१५° सेल्सिअस) नोंद
१९५७
भारतात विक्रीकर कायदा सुरू झाला.
१९४८
जगातील पहिला रंगीत माहितीपट (News Reel) ‘वॉर्नर ब्रदर्स’ तर्फे चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला. ‘रोझ बाऊल फुटबॉल’ स्पर्धांवर हा माहितीपट होता.
१९३३
सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट ब्रिजच्या बांधकामाला सुरूवात झाली.
१९१९
द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले.
१६७१
मराठ्यांनी मुघलांबरोबर साल्हेरची लढाई जिंकली.
१६६४
छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर पोहोचले. त्यांनी सुरतेचा सुभेदार इनायत खान याला खंडणी देण्यासाठी निरोप पाठविला.
१९८६
दीपिका पदुकोण – कन्नड, हिन्दी आणि तामिळ चित्रपट कलाकार
१९५५
ममता बॅनर्जी – केंद्रीय मंत्री, पश्चिम बंगालच्या ८ व्या व पहिल्याच महिला मुख्यमंत्री
१९४८
फैय्याज – अभिनेत्री व गायिका
१९४८
मन्सूर अली खान पतौडी – भारतीय क्रिकेट कप्तान, पतौडी संस्थानचे ९ वे आणि शेवटचे नबाब (१९५२ - १९७१). अर्जुन अवॉर्ड (१९६४), पद्मश्री (१९६७)
(मृत्यू: २२ सप्टेंबर २०११)
(Image Credit: ESPN CricInfo)
१९४८
पार्थसारथी शर्मा – क्रिकेटपटू
(मृत्यू: २० ऑक्टोबर २०१०)
(Image Credit: Cricket Country)
१९२८
झुल्फिकार अली भुट्टो – पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान
(मृत्यू: ४ एप्रिल १९७९)
१९२२
मोहम्मद उमर ‘मुक्री’ – आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते
(मृत्यू: ४ सप्टेंबर २०००)
(Image Credit: Movies N Memories)
१९०९
श्रीपाद नारायण पेंडसे – मराठी कथालेखक व कादंबरीकार
(मृत्यू: २४ मार्च २००७)
१८९२
कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी – लेखक व मराठी भाषातज्ञ
(मृत्यू: १२ जून १९६४ - मुंबई)
१८५५
किंग कँप जिलेट – अमेरिकन संशोधक व उद्योजक
(मृत्यू: ९ जुलै १९३२)
१५९२
शहाजहान – ५ वा मुघल सम्राट
(मृत्यू: २२ जानेवारी १६६६)
२००३
गोपालदास पानसे – पखवाजवादक
(जन्म: ? ? ????)
१९९२
दत्तात्रय गणेश गोडसे – इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार
(जन्म: ३ जुलै १९१४)
१९९०
रमेश बहल – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
(जन्म: ? ? ????)
१९८२
सी. रामचंद्र – संगीतकार
(जन्म: १२ जानेवारी १९१८)
१९६१
नारायण धोंडोपंत तथा ना. धों. ताम्हनकर – लेखक
(जन्म: ३१ ऑगस्ट १८९३)
१९४३
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ
(जन्म: १ फेब्रुवारी १८६४)
१९३३
काल्व्हिन कूलिज – अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: ४ जुलै १८७२)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
व्यवस्थापन
एकदा धर्मपुर नगराचा राजा सोमसेन शिकारीवरून परतत असताना काही कारणाने आपल्या सर्व साथीदारापासून रस्ता चुकला आणि वेगळ्याच रस्त्याला लागला. जंगलातून रस्ता काढत काढत तो नगराच्या दिशेने वाटचाल करू लागला. रस्त्याने चालत असताना त्याला एक माणूस खांद्यावर कु-हाड घेवून व तोंडाने बासरी वाजवत चाललेला दिसून आला. तो माणूस हि नगराच्या दिशेने चाललेला होता तेंव्हा राजाने त्याच्यासोबत जाण्याचे ठरविले. दोघांनी एकमेकांशी संभाषण सुरु केले. राजाने त्या माणसाला विचारले,"तू कोण आहे?, तुझा व्यवसाय काय? आणि तू जे काही मिळवतो त्यात तू खुश आहे आहे काय?" त्या माणसाने उत्तर दिले,"महाराज! मी एक लाकुडतोड्या असून लाकडे तोडण्याचे काम करतो. रोज मला चार रुपये मिळतात. त्यापैकी पहिला रुपया मी पाण्यात टाकून देतो, दुसरा रुपया मी कर्ज चुकविण्यासाठी वापरतो, तिसरा रुपया मी उधार देण्यासाठी उपयोग करतो तर चौथा रुपया मी जमिनीत गाडून टाकतो."
या म्हणण्याचा अर्थ राजाला काही समजण्याच्या आतच राजाचे सैनिक शोधत तेथे आले व राजा त्यांच्यासोबत निघून गेला. राजाला त्या लाकुडतोड्याचे म्हणणे शांत बसू देईना, त्याने भर दरबारात हा प्रश्न उपस्थित केला,"तो लाकुडतोड्या जे चार रुपये खर्च करतो, ते कसे ते मला सांगा?" कोणालाच या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. मग राजाने निर्णय घेतला कि त्या लाकुडतोड्याला दरबारात बोलवायचे. राजाने तसा आदेश दिला व दुसऱ्या दिवशी लाकुडतोड्याला घेवून सैनिक हजर झाले. लाकुडतोड्या आलेला दिसताच राजा सोमसेन त्याला म्हणाला,"तुझ्या धनाचे तू जे व्यवस्थापन करतो ते कसे ते मला सांग? मला काल काहीच कळले नाही." लाकुडतोड्या हसून म्हणाला, "महाराज! पहिला रुपया मी पाण्यात टाकून देतो म्हणजे मी माझ्या परिवाराचे पोषण करतो., दुसरा रुपया मी कर्ज चुकविण्यासाठी वापरतो म्हणजे म्हाताऱ्या आईवडिलांच्यासाठी खर्च करतो., तिसरा रुपया मी उधार देण्यासाठी उपयोग करतो म्हणजे म्हणजे मी माझ्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करतो जेणे करून ते शिकून माझ्या म्हातारपणी मला सांभाळतील.तर चौथा रुपया मी जमिनीत गाडून टाकतो म्हणजे धर्म, दक्षिणा, दान यात खर्च करतो म्हणजे जेंव्हा मी मरेन त्याचे पुण्य मला मिळेल." राजाने हे उत्तर ऐकताच आनंदित होवून लाकुडतोड्याचा मोठा सन्मान केला आणि मोठे इनाम देवून त्याला त्याच्या घरी पाठविले.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.