बालिका दिन - प्रश्नमंजुषा (३ जानेवारी ते १२ जानेवारी)
A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : रविवार
आजची दिनांक : ०७ / ०१ / २०२४
आजचा सुविचार : यशस्वी होण्यासाठी शिकणं आणि चुकणं दोन्हीही महत्वाचं आहे.
G दिनविशेष
दिनविशेष
१९७८
एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्यांसह होनोलुलूजवळील महासागरात बेपत्ता झाली.
१९७२
कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.
१९५९
क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.
१९३५
कोलकाता येथे ‘इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमी’चे (INSA) उद्घाटन झाले. पुढे १९५१ मधे तिचे मुख्यालय दिल्लीला हलवण्यात आले.
१९२७
न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.
१९२२
पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.
१७८९
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची पहिली निवडणूक होऊन त्यान जॉर्ज वॉशिंग्टन विजयी झाले.
१६८०
मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.
१९७९
बिपाशा बासू – अभिनेत्री व मॉडेल
१९६७
इरफान खान – भारतीय, ब्रिटिश तसेच अमेरिकन चित्रपटांत भूमिका साकारलेले अभिनेते, पद्मश्री (२०११) पुरस्काराने सन्मानित
(मृत्यू: २९ एप्रिल २०२०)
(Image Credit: विकिपीडिया)
१९६१
सुप्रिया पाठक – अभिनेत्री
१९४८
शोभा डे – विदुषी व लेखिका
१९२८
विजय तेंडुलकर – नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक
(मृत्यू: १९ मे २००८ - पुणे, महाराष्ट्र)
१९२५
‘प्रभात’ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या
१९२१
चंद्रकांत गोखले – अभिनेते
(मृत्यू: २० जून २००८)
१९२०
डॉ. सरोजिनी बाबर – लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी
(मृत्यू: १९ एप्रिल २००८)
१८९३
जानकीदेवी बजाज – स्वातंत्र्य वीरांगना, १९३२ च्या असहकार आंदोलनातील सक्रिय कार्यकर्त्या, पदमविभूषण (१९५६), अखिल भारतीय गौसेवा संघाच्या अध्यक्षा. स्वातंत्र्यानंतर त्यांनी स्वतःला विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत झोकून दिले. विनोबा भावे यांचा वर्ध्याजवळील सेवाग्राम आश्रम हा बजाज कुटुंबीयांनी दान केलेल्या ३००० एकर जमिनीवर उभा आहे.
(मृत्यू: २१ मे १९७९)
(Image Credit: Jamnalal Bajaj Foundation)
२०००
डॉ. अच्युतराव आपटे – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची व त्याद्वारे सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आयुष्य वेचलेले, विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक
(जन्म: ८ नोव्हेंबर १९१९)
१९८९
मिचेनोमिया हिरोहितो – दुसर्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट
(जन्म: २९ एप्रिल १९०१)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
हे ही दिवस जातील
एकदा एक राजा आपल्या महालात बसला होता. तेवढ्यात त्याला प्रधान येताना दिसला. प्रधान राजाजवळ आला, त्याने राजाला प्रणाम केला व राज्याच्या कारभाराविषयी दोघेही चर्चा करू लागले. थोड्यावेळाने एक द्वारपाल तेथे आला व म्हणाला,’’महाराज, द्वारावर एक संन्याशी आला आहे व तो आपल्या भेटीची वेळमागत आहे.’’ राजा संत, महात्मे, फकीर यांची कदर करणारा होता. राजाने द्वारपालाला संन्याशीमहाराजांना घेवून येण्यास सांगितले. द्वारपाल संन्याशी महात्म्याला घेऊन राजाकडे आला. महात्मा येताच राजाने स्वत: उठून त्यांना नमस्कार केला. आस्थेने विचारपूस केली. त्यांचा यथायोग्य सत्कार केला व त्यांना उपदेश करण्याविषयी सांगितले. संन्याशी महाराज म्हणाले,’’राजन, तुम्ही तुमचे राज्य अतिशय उत्तम पद्धतीने चालवित आहात, सर्व प्रजा सुस्थितीत आहे, सुखी आहे, कोणाचे कोणाशी भांडणतंटा नाही, सर्वधर्माचे लोक आनंदाने राहत आहेत, अन्नधान्य, पशूपक्षी सगळयात बरकत आहे. हे पाहून मला आनंद वाटतो’’ राजा म्हणाला,’’ महाराज ही स्तुती माझी एकटयाची नसून माझ्या सर्व सहका-यांची पण आहे. महाराज, ही स्तुती बाजूला ठेवून आपण मला भविष्यकाळासाठी काही उपदेश करावा अशी विनंती आहे.’’ संन्याशी महाराज म्हणाले,’’राजा, सदासर्वकाळ एकच परिस्थिती राहत नसते, त्यामुळे तुला फक्त एकच वाक्याचा मी उपदेश करतो. तो म्हणजे ‘’ हे ही दिवस जातील’’ एवढेच तु लक्षात ठेव’’ एवढे बोलून ते तेथून निघून गेले. राजा विचारात पडला, प्रधानाने हे पाहिले व तो म्हणाला,’’ महाराज, अहो संन्याशीमहाराजांनी केलेला उपदेश आपण फक्त लक्षात ठेवा म्हणजे झाले.’’ पण राजाची तगमग काही थांबेना, कारण एवढी सुबत्ता, समृद्धी असताना संन्याशाने आपल्याला हे ही दिवस जातील असे का म्हटले याचा त्याला उलगडा होईना. राजा रात्रंदिवस याच विचारात गढून गेला.
काही दिवसातच दुस-या राजाने या राजाच्या राज्यावर स्वारी केली. राजा युद्धाच्या तयारीत कमी पडल्याने व परक्या राजाचे सैन्य आक्रमणावर आक्रमणे करीत राहिल्याने हा राजा हरला व त्याला बंदीवान करून त्या राजापुढे नेण्यात आले. तेथील राजाने या राजाला कारागृहात टाकले. कारागृहात अंधार कोठडीत कोणीच नसे. राजा एकटा निराश, हताश बसून राहत असे व आपल्या पूर्वीचे वैभव आठवित असे. त्यातच त्याला एक दिवशी संन्यासी बाबाबरोबर झालेली भेट आठविली व उपदेशही. झाले, त्या उपदेशाने राजाला आशा दाखविली, हे ही दिवस जातील, राजा निराशेकडून आशेकडे वळला आणि त्या दिवसापासून तो आनंदी राहू लागला. कारागृहाच्या सैनिकांना याचे कारण कळेना की कारागृहात कैदी म्हणून राहणारा राजा आनंदी कसा काय राहतो, त्यांनी त्यांच्या राजाला कळविले, तो राजाही विचारात पडला हे कसे काय साध्य झाले. त्याने या राजाला विचारले असता या राजाने संन्याशी महाराजांशी झालेली भेट व ‘हे ही दिवस जातील हा उपदेश सांगितला. त्याने हा उपदेश ऐकताच त्याला ही जाणीव झाली की आपणही एक राजा आहोत व आपल्यावरही ही वेळ येऊ शकते. हे जाणून त्याने राजाची मुक्तता केली, तसेच त्याचे राज्य त्याला परत दिले व मोठ्या सन्मानाने त्याला परत पाठविले.
तात्पर्य- विचारांमध्ये ताकद असते, एखादा विचार मानवाचे आयुष्य बदलून टाकू शकतो.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.