बालिका दिन - प्रश्नमंजुषा (३ जानेवारी ते १२ जानेवारी)
A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : मंगळवार
आजची दिनांक : ०९ / ०१ / २०२४
आजचा सुविचार : माणसाजवळ काहीही नसलं तरी संयम असावा आणि सर्व काही असलं तरी नम्रता असावी.
G दिनविशेष
दिनविशेष
२००१
नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.
२००१
नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.
१९१५
महात्मा गांधींचे अफ्रिकेतुन भारतात आगमन
१८८०
क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन जन्मठेपेची (काळे पाणी) शिक्षा झाली. त्यांची रवानगी एडन येथील तुरुंगात करण्यात आली. तुरुंगातच त्यांचे १७ फेब्रुवारी १८८३ रोजी निधन झाले.
१७८८
कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५ वे राज्य बनले.
१७६०
बरारीघाट येथे अफगाण्यांनी मराठ्यांचा पराभव केला.
१९६५
फराह खान – नृत्यदिग्दर्शक
१९५१
पं. सत्यशील देशपांडे – ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य
१९३८
चक्रवर्ती रामानुजम – अंकशास्त्र आणि बैजिक भूमिती या क्षेत्रांत संशोधन केलेले भारतीय गणिती (श्रीनिवास रामानुजन नव्हे)
(मृत्यू: २७ आक्टोबर १९७४)
(Image Credit: indiaonline.in)
१९३४
महेंद्र कपूर – पार्श्वगायक, पद्मश्री (१९७२). आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी २५,००० हुन अधिक गाणी गायली आहेत.
(मृत्यू: २७ सप्टेंबर २००८ - मुंबई)
(Image Credit: Rekhta)
१९२७
सुंदरलाल बहुगुणा – चिपको आंदोलनाचे प्रणेते व ‘The Sentry of the Himalayas’ म्हणून ओळखले जाणारे पर्यावरणरक्षक
(मृत्यू: २१ मे २०२१ - ऋषिकेश)
(Image Credit: Twitter)
१९२६
कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार – चित्रपट अभिनेते व चित्रकार
(मृत्यू: २० सप्टेंबर १९९७ - मुंबई)
(Image Credit: Wikipedia)
१९२२
हर गोविंद खुराना – जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते
(मृत्यू: ९ नोव्हेंबर २०११)
१९१३
रिचर्ड निक्सन – अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: २२ एप्रिल १९९४)
२०१३
जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते (१९८६) अमेरिकन अर्थतज्ञ
(जन्म: ३ आक्टोबर १९१९)
(Image Credit: The New York Times)
२००४
शंकरबापू आपेगावकर – पखवाजवादक
(जन्म: ? ? १९११)
२००३
ओम प्रकाश भंडारी उर्फ क़मर जलालाबादी – गीतकार व कवी
(जन्म: ९ मार्च १९१७ - अमृतसर)
१९२३
सत्येंद्रनाथ टागोर – पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS)
(जन्म: १ जून १८४२)
१८४८
कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, ही प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेलची बहिण असून तिनेही ८ धुमकेतू व ३ तारकासमुह शोधले आहेत.
(जन्म: १६ मार्च १७५०)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
स्वताचे काम
मक्याच्या शेतात एका पक्षिणीचा खोपा होता. त्यात तिची छोटी छोटी पिलेही होती. मक्याची कापणी होईपर्यंत खोपा सुरक्षित होता. एके दिवशी शेतकरी शेतात आला. तो कुणाशी तरी बोलताना म्हणाला की, ‘उद्या मी माझ्या नातेवाइकांशी पिकाच्या कापणीबाबत बोलणार आहे.’ शेतकर्यांचे हे संभाषण पक्षिणीसह तिच्या पिलांनी ऐकले. पिले म्हणाली, ‘आई, लवकरात लवकर आपल्याला खोपा सोडावा लागेल.’ आई म्हणाली, ‘काळजी करू नका. काहीही होणार नाही.’ दुसर्या दिवशी कुणीही मदतीला आले नाही, तेव्हा शेतकरी म्हणाला की, आता मी माझ्या शेजार्यांना बोलावीन. तिसर्या दिवशीही कुणी आले नाही. चौथ्या दिवशीही असेच झाल्यावर तेव्हा शेतकरी म्हणाला, ‘इतरांच्या भरवशावर बसून काम होणार नाही. उद्या मी स्वत:च पिकाची कापणी करतो.’ हे ऐकून पक्षिणीने पिलांना सांगितले, ‘उद्या उजाडण्यापूर्वीच आपल्याला खोपा सोडावा लागेल. कारण शेतकर्याला स्वत:चे काम स्वत:च करावे लागते, याची जाणीव झाली आहे.’
तात्पर्य- आपल्या मदतीसाठी कोणीतरी येईल हि अपेक्षा न ठेवता आपले काम आपणच करावे.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.