शासन आदेशानुसार ओमिक्रोन विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सरसकट बंद झालेल्या शाळा सोमवार दि.२४ जानेवारी २०२२ पासून सुरू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. जिथे कोरोनाची रुग्णसंख्या कमी आहे, तिथे नियमित शाळा भरतील. याबाबत शासन आदेशखालीलप्रमाणे -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शाळा सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिलीये.
राज्यातील प्री-प्रायमरी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रत्रकार परिषदेत माहिती दिली.
गेल्या दोन वर्षांपासून मुलांच्या शाळा नियमितपणे सुरू नाहीत, त्यांची अभ्यासाची सवय तुटली आहे तेव्हा शाळा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी पालक करत होते. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
आमच्या मुलांना अशिक्षित ठेवणार आहे का?
ग्रामीण भागातल्या शिक्षक आणि पालकांचं यापेक्षा वेगळं मत नाही. ग्रामीण भागात ओमयक्रॉंनचे आकडे खूप कमी आहेत. मग सरसकट सगळ्या शाळा बंद कशाला करता? असा मतप्रवाह ग्रामीण भागातील शिक्षक आणि पालकांमध्ये आहे.
शाळा सुरु होणार या बातमीमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कोविड चे नियम पाळून विद्यार्थी पुन्हा आनंदाने शाळेत येतील व शिक्षकांना देखील प्रत्यक्ष अध्यापन प्रभावी करून विद्यार्थ्यांना ज्ञान देता येईल.
शासन आदेश पहा - इथे क्लिक करा

सोमवारपासून सुरू होणार शाळा
मुंबई आणि महाराष्ट्रात ओमिक्रॉनची तिसरी लाट डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पसरण्यास सुरूवात झाली. कोरोनाचे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून उद्धव ठाकरे सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, "सोमवारपासून राज्यभरातील शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी संमती दिलीये," येत्या 24 जानेवारीपासून महाराष्ट्रातील प्री-प्रायमरी ते बारावी शाळा सुरू होतील.
कोरोना संसर्ग पसरल्यापासून राज्य सरकारने पहिल्यांदाच प्री-प्रायमरी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.
त्या पुढे सांगतात, "प्रत्येक भागातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत." एका महापालिकेने निर्णय घेतला म्हणजे सर्वांनी तो फॉलो करावा असं नाही. अधिकाऱ्यांनी त्यांच्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा.
शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने याआधीच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचना पुन्हा शाळा सुरू करताना कायम असतील.
शिक्षणमंत्री पुढे म्हणाल्या, "मुलांना शाळेत येण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असेल." कोणाचंही शिक्षण थांबू नये ही आमची भूमिका आहे.
बुधवारी शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला होता.
लहान मुलांच्या टास्सफोर्सनेही शाळा सुरू कराव्यात याबाबत हिरवा कंदिल राज्य सरकारला दिला होता.
वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या, सुरक्षेचा सर्व उपाय करूनच शाळा पुन्हा सुरू केल्या जातील.
गेल्या दोन वर्षात मुलं शाळेत गेली नाहीयेत. या मुलांच्या भविष्याचा विचार करून शाळा सुरू करण्याबाबत मागणी जोर धरू लागली होती.
गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचं शिक्षणतज्ज्ञांचं म्हणणं आहे. सातत्याने शाळा बंद असल्याने दोन पिढ्यांच नुकसान झाल्याचं देखील ते सांगतात. त्यामुळे सरसकट शाळा बंद करु नयेत असं मत शिक्षणतज्ज्ञांचं आहे.
महाराष्ट्रात ओमिक्रॉनची तिसरी लाट पसरतेय. पण ही लाट सौम्य दिसून येतेय. लहान मुलांना होणारा संसर्ग गंभीर नाहीये. त्यामुळे शाळा सुरू करण्यास हरकत नाही असं तज्ज्ञांचं मत आहे.
मुंबईतही कोरोनाचे आकडे सातत्याने कमी होताना दिसून येत आहेत.

कोणकोणते वर्ग सुरू होणार?
स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरु होणार असल्याचे मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले. राज्य सरकारच्या निर्णयानंतर 24 जानेवारीपासून शाळा सुरु होणार आहेत. जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरु होतील. पहिली ते बारावीचे सर्व वर्ग सुरु होणार आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे सरसकट शाळा सुरु होणार नसल्याचे संकेतही सरकारकडून देण्यात आले आहेत.
शिक्षकांसाठी सूचना काय?
पुढे बोलतांना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांनी दोन डोस घेतलेले असावेत. तसेच शाळेत जाऊन लसीकरण करता येईल का हे आम्ही पाहत आहोत. स्थानिक प्रशासनाला आम्ही शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. काळजी घेऊनच शाळा सुरू कराव्या अशी मी विनंती करत आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये अशी आमची भूमिका आहे असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.
शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली
गेल्या दोन वर्षात मुलं शाळेत गेली नाहीयेत. या मुलांच्या भविष्याचा विचार करून शाळा सुरू करण्याबाबत मागणी जोर धरू लागली होती.
गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचं शिक्षणतज्ज्ञांचं म्हणणं आहे. सातत्याने शाळा बंद असल्याने दोन पिढ्यांच नुकसान झाल्याचं देखील ते सांगतात. त्यामुळे सरसकट शाळा बंद करु नयेत असं मत शिक्षणतज्ज्ञांचं आहे.
महाराष्ट्रात ओमिक्रॉनची तिसरी लाट पसरतेय. पण ही लाट सौम्य दिसून येतेय. लहान मुलांना होणारा संसर्ग गंभीर नाहीये. त्यामुळे शाळा सुरू करण्यास हरकत नाही असं तज्ज्ञांचं मत आहे.
मुंबईतही कोरोनाचे आकडे सातत्याने कमी होताना दिसून येत आहेत.
आमच्या मुलांना अशिक्षित ठेवणार आहे का?
ग्रामीण भागातल्या शिक्षक आणि पालकांचं यापेक्षा वेगळं मत नाही. ग्रामीण भागात ओमयक्रॉंनचे आकडे खूप कमी आहेत. मग सरसकट सगळ्या शाळा बंद कशाला करता? असा मतप्रवाह ग्रामीण भागातील शिक्षक आणि पालकांमध्ये आहे.
शाळा सुरु होणार या बातमीमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कोविड चे नियम पाळून विद्यार्थी पुन्हा आनंदाने शाळेत येतील व शिक्षकांना देखील प्रत्यक्ष अध्यापन प्रभावी करून विद्यार्थ्यांना ज्ञान देता येईल.
Tags
Breaking News