शाळेतून घरी येत असताना कडगाव येथे तिरंग्याला इस्त्री करण्यासाठी गेलो होतो. श्री. दयानंद मारुती परीट (कडगाव) ता. भुदरगड यांनी आपले काम बाजूला सारून सर्वप्रथम तिरंगा इस्त्रीला घेतला. इस्त्री झाल्यानंतर माझे हात पाकिटाकडे वळले. त्या माणसाने पैसे मुळीच नको असे सांगितले. तिरंगी झेंड्याला इस्त्री करण्याचे मी पैसे कधीच घेत नाही, हे त्यांचे बोलणे ऐकल्यानंतर त्यांचा अभिमान वाटला. त्यांच्या या छोट्या कृतीतून जाणवलेला देशाभिमान पाहून धन्य वाटले. गोष्ट छोटी आहे पण त्यांच्याकडून मिळालेला संदेश हा खूप मोठा व विचार करणारा आहे.
समाजात देखील अशा विचारांची सध्या गरज असून छोट्या छोट्या कृतीतून समाजभान, देशाभिमान जागृत करणे सध्या काळाची गरज आहे. अशा व्यक्तींना मनापासून सलाम👏👏👏
© प्रविण डाकरे सर
Tags
Breaking News