सायबर सुरक्षा आणि जागृती | व्याख्याने व परिसंवाद | जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियान राबविणेबाबत | ३ ते १२ जानेवारी | बालिका दिन विशेष | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती
जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियान |
अनेक युगांपासून महिलांना सुरक्षित कसे राहायचे आणि गोपनीयता कशी पाळायची याचे शिक्षण दिले जात आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांना समोरच्या माणसातील सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी ओळखण्याची जाणीव त्यांना करून दिली जात असे. या प्रथांमुळे महिला अधिक समर्थ झाल्या आणि स्वतंत्र झाल्या. आजच्या पिढीत महिला पुरुषांच्या बरोबर समजल्या जातात. हल्ली अनेक महिला अग्रणी उद्योजक आहेत, दुसऱ्यांसाठी रोजगार निर्माण करीत आहेत, गृहिणी या नात्याने कुटुंबाला सुरक्षित ठेवत आहेत, बँक मॅनेजर्सच्या भूमिकेत माणसे आणि संसाधनांचे व्यवस्थापन करीत आहेत आणि इतर अग्रगण्य भूमिका निभावत आहेत.
जरी आधुनिक जगात ही सद्य परिस्थिती असली, तरीही बऱ्याच बाबतीत महिलावर अन्याय होत असतो आणि त्यांना खाजगी आणि जाहीर जीवनात दुःख व तोटा सहन करावे लागतात.
सायबर किंवा व्हर्च्युअल दुनियेत महिलांवर होणारे हल्ले
छळ, ब्रॅकमेल अशा स्वरूपात अजूनही जुन्या प्रथा चालू आहेत. आजच्या सायबर किंवा व्हर्च्युअल दुनियेत महिलांवर हल्ले करण्याचे नवनवीन मार्ग खुले झाले आहेत. सायबर स्पेस व त्या सोबत येणारा निनावीपणा समाजाच्या सांस्कृतिक आणि सामुदायिक पैलूंवर नकारात्मक प्रभाव पाडण्याचे काम करीत आहे.
महिलांनी सायबर दुनियेतील फायद्यांचा लाभ घेण्यासाठी अनेक सुरक्षा साधने आणि स्थाने उपलब्ध आहेत, तरीही त्यांच्यात या गोष्टी सुरक्षितपणे कशा वापराव्या या विषयी जागृतीचा अभाव असल्यामुळे महिला पुरुषांपेक्षा सायबर हल्ल्यांसाठी अधिक प्रमाणात असुरक्षित आहेत.
सायबर दुनियेत ईमेल, मॉर्फिंग, सायबर बदनामी, सोशल नेटवर्किंग, हॅकिंग, सायबर-स्टॉकिंग, सायबर बीभत्स अश्लीलता, सायबर छेडछाड आणि सायबर गुंडगिरी अशा विविध प्रकारे महिलांचा छळ केला जातो.
सायबर हल्ल्यांपासून सुरक्षितता कशी कराल?
थोडी जागृती, सर्वोत्तम पद्धती, आणि सूचना यांची मदत घेऊन महिला अशा सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित राहू शकतील आणि त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण होईल.
इन्फॉर्मेशन सुरक्षा शिक्षण आणि जागृती, या प्रकल्पाचा एक भाग म्हणून आम्ही महिलांमध्ये ही जागृती पसरवण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि इंटरनेट, स्मार्ट फोन्स आणि अन्य अनेक नव्या सायबर टेक्नॉलॉजीज् ज्यांच्यामार्फत हल्ला होण्याची दाट शक्यता असते, यांचा वापर करताना कोणत्या सर्वोत्तम पद्धती अनुसराव्या त्यासाठी मदत करतो आहोत.
तुमचे इ-मेल अकौंट आहे का?तुमचे सोशल नेटवर्किंग अकौंट आहे का (उदा. फेसबुक, ट्विटर, इ.)?तुम्ही स्मार्ट फोन वापरता का?तुमच्याकडे स्मार्ट वाशिंग मशीन किंवा स्मार्ट फ्रिज आहे का?आपण वाणसामान ऑनलाईन खरेदी करता का?आपण वस्तू ऑनलाईन खरेदी करता का?आपण व्हॉट्सॅप, इन्स्टाग्राम, व्हायबर वापरता का?
जर वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर होय असे असेल, तर आपण कृपया पुढील लेख जरूर वाचा. ते खास आपल्यासठीच आहेत.
सायबर दुनियेत महिलांसाठी काही साध्या आणि झटपट सूचना पुढे दिल्या आहेत.बनावट प्रोफाइलपासून सावध रहा.आपली ऑनलाइन गोपनीयता ठेवा.आपले अकौन्टचे सेटिंग्ज नियमितपणे तपासा.इतरांना आपल्या अकौंट मध्ये डोकावू देऊ नका.चॅट रूम्समध्ये भाग घेण्याचे टाळा, त्या आपल्यासाठी नाहीत.जर कोणी ऑनलाईन आपली स्तुती केली तर हुरळून जाऊ नका.आपल्या चित्रांना मिळालेल्या लाईक्सनी प्रोत्साहित होऊ नका आणि अजून चित्रे अपलोड करू नका.
इंटरनेट सुरक्षितता ही सर्वांची जबाबदारी आहे. या मध्ये आपल्या मित्रांशी चॅट करणे, आपण बनवलेला व्हिडीओ किंवा लिहिलेले गीत पोस्ट करणे, आपल्याला ज्यात रुची आहे अशी माहिती मिळवणे, आणि जगात नवीन काय घडते आहे ते जाणणे, हे सर्व ऑनलाईन करण्याची मजा चाखणे तर आहेच पण त्या बरोबरच कोणत्याही प्रकारची दादागिरी, फसवाफसवी किंवा वितुष्ट नसणे किंवा आपल्या कल्पना व कधी कधी आयडेन्टिटीसुद्ध चोरीला जाणे अशा अनिष्ट गोष्टी नसणे हेही महत्त्वाचे आहे.
इंटरनेट सुरक्षितता म्हणजे केवळ आपल्या कॉम्प्यूटरमध्ये अद्यतन अँटि-व्हायरस आणि फायरवॉल सॉफ्टवेअर इन्स्टॉल केली असणे, या पेक्षा बरेच काही असते. आपण ऑनलाईन असताना कसे स्वतःची किती स्मार्टपणे काळजी घेतो आणि इतर लोकांना (खास करून आपल्याला ऑनलाईन भेटणारे अनोळखी लोक) कशा रीतीने सामोरे जातो आणि आपल्या अज्ञानाचा फायदा घेण्यास टपलेल्या ऑनलाईन घोटाळेबाजांच्या सापळ्यातून स्वतःचा बचाव कसा करतो, हे सगळे त्यात समाविष्ट आहे
ऑनलाईन सुरक्षित राहणे इतके महत्त्वाचे का आहे?
आपल्यापैकी बहुतेक लोक लॅपटॉप्स, मोबाईल फोन्स, टॅबलेट्स किंवा वैयक्तिक कॉम्प्यूटर यांच्यामार्फत कनेक्टेड असतात. नवीन मित्र बनवणे, जुन्यांच्या संपर्कात राहणे आणि शिक्षण प्राप्त करणे यांसाठी एक मौलिक व करमणुकीचे संसाधन म्हणून इंटरनेटची खूप मोठी क्षमता आहे. परंतु जर आपण सुरक्षितता जागृतीविना इंटरनेटचा वापर केला, तर आपण दादागिरी, फसवणूक किंवा त्याहूनही काही तरी गंभीर अशा गैरकायदेशीर गतिविधी किंवा दुरुपयोगासारख्या जोखमीत पडू शकतो. समोरा समोर भेटलेल्या व्यक्तीपेक्षा नेटवर भेटणारे लोक प्रथम दिसतात तसे नेहेमी असतातच असे नाही.
आपण घराबाहेर पडल्यावर जशी सुरक्षिततेविषयी काळजी घेतो, तसेच ऑनलाईन सुरक्षित राहणेही महत्त्वाचे असते. हे कौशल्य आपल्या जवळ आयुष्यभर राहते.
आपण ऑनलाईन असतांना पाळावयाचे काही मौलिक नियम
- आपली वैयक्तिक माहिती उदा. आपला पत्ता किंवा फोन नंबर देऊ नका.
- स्वतढची कोणतीही चित्रे, खास करून अश्लील चित्रे कोणालाही पाठवू नका.
- अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या ईमेल्स किंवा ॲटॅचमेंट्स उघडू नका.
- अनोळखी व्यक्तीचे ऑनलाईन ‘फ्रेंड’ होऊ नका.
- ज्यांना ऑनलाईन भेटला असाल, अशा व्यक्तीला प्रत्यक्षात भेटायचे कधीही ठरवू नका.
- जर आपण ऑनलाईन पाहिलेले किंवा वाचलेले काहीही आपल्या काळजी करण्यासारखे वाटत असले, तर त्याची कोणाला तरी माहिती द्या किंवा त्यासंबंधी आपल्या आईवडिलांना कळवा.
आयएसईए-जागृती प्रोग्रामद्वारा युवा पिढी/विद्यार्थी यांना ऑनलाईन सुरक्षिततेसंबंधी नेहेमीच सूचना आणि टिपा दिल्या जातात. इंटरनेट वापरण्यापूर्वी या मार्गदर्शक सूचना/स्टेप्सचे पालन करा.
स्टेप 1: वेब ब्राऊझरचा वापर करणे
मित्र आणि कुटंबियांच्या संपर्कात राहण्याच इंटरनेट हा एक मार्ग आहे. त्या शिवाय त्याने ताज्या बातम्या, संशोधनात्मक माहिती मिळवता येते, तसेच ऑनलाईन शॉपिंग आणि पुस्तके व ॲप्लिकेशन्स ऑनलाईन डाऊनलोड करणे वगैरेही करता येते. इंटरनेट वापरून बँकिंग, बिले भरणे आणि ॲप्लिकेशन्स व फॉर्म्स पूर्ण करणे आणि सबमिट करणे हेही लोकप्रिय होत चालले आहे.
वेब ब्राऊझरचा वापर करणे, काही कामे ऑनलाईन करणे अतिशय सोपे आहे, परंतु त्यात आपण आणि आपला कॉम्प्यूटर यांना काही छुपे धोके असू शकतात. या धोक्यांमध्ये संवेदनशील वैयक्तिक माहिती जाहीर होणे आणि मालवेअरचा (यात व्हायरसेस, स्पायवेअर, आणि ॲडवेअर येतात) संसर्ग होणे यांचा समावेश आहे. सुरक्षित ब्राउझिंग म्हणजे ऑनलाईन धोक्यांची जाणीव असणे आणि ते टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे होय.
इंटरनेट ब्राऊज करताना सुरक्षित राहण्यासाठी थोडे प्रयत्न, काही साधने, आणि काही मूलभूत माहिती यांची आवश्यकता असते. आपली वैयक्तिक माहिती आणि आपला कॉम्प्यूटर यांचे ऑनलाईन संरक्षण करण्यासाठी पुढील मार्गदर्शक सूचनांचे पालन करा.
- आपल्या कॉम्प्यूटर किंवा साधनामध्ये अद्ययावत अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर इनस्टॉल आणि मेन्टेन करा.
- आपला इंटरनेट ब्राऊझर अद्ययावत ठेवा
- विचित्र कॉम्प्यूटर ॲक्टिव्हिटी किंवा समस्यांविषयी सतर्क रहा.
- आपल्या कॉम्प्यूटरमध्ये अद्ययावत फायरवॉल इनस्टॉल आणि मेन्टेन करा.
- पॉप-अप ब्लॉकर सारखा फीचर असलेला आधुनिक ब्राऊझर वापरा.
- आपल्या कॉम्प्यूटरवर संवेदनाशील साहित्य अनिश्चित काळापर्यंत ठेवण्याचे टाळा.
- आपले पासवर्ड वारंवार बदला.
- इन्स्टंट मेसेजिंग आणि ई-मेल ॲटॅचमेंट्स मार्फत पाठवलेल्या मेसेजपासून सावध रहा.
स्टेप 2: ‘फ्रेंड्स’ बनवणे
आपल्या सर्वांना हे चांगले माहिती आहे की तासन् तास कॉम्प्यूटरच्या स्क्रीनसमोर घालवणे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. परंतु सोशल नेटवर्किंगमधील अजून एक समस्या ही आहे की आपल्याला भरपूर ‘फ्रेंड्स’ असले पाहिजेत असे वाटण्यामुळे आपल्याला वाटू शकणारा दबाव. पण या बाबतीत लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी पुढे दिल्या आहेतः
ऑनलाईन होणारी फ्रेंडशिप किंवा दोस्ती ही केवळ एक बटन क्लिक करून केली जाते. त्यात कोणतेही संभाषण आणि एकत्रपणे अनुभवलेले क्षण नसतात.
कोणाबरोबर ऑनलाईन ‘फ्रेंड्स’ असणे हे प्रत्यक्ष मैत्रीपेक्षा कमी अर्थपूर्ण असते.
एखाद्या टिप्पणीबाबतीत झालेल्या गैरसमजामुळे आपण ऑनलाईन ‘फ्रेंड’ बरोबरचे नाते सहजपणे तोडू शकतो.
आपण जेव्हा कोणाशी प्रत्यक्ष समोरासमोर बोलत असतो, तेव्हा वाद आणि प्रश्नांचे निराकरण सहज आणि उमदेपणाने करता येते.
त्यामुळे आपल्या माहितीत माझे सोशल नेटवर्किंग साईटवर ‘फ्रेंड्स’ आहेत असे गर्वाने सांगणारे कोणी असले, तरी हे लक्षात असू द्या की मैत्री कॉम्प्यूटरद्वारे होत नसते.
हे होण्याचे मी कसे टाळू शकेन?
त्यात भाग घेण्यासाठी आपण योग्य वयाचे आहोत का याची खात्री करून घ्या.
आपल्या प्रोफाईलवर बनावटी नाव किंवा टोपण नावाचा वापर करा.
ज्यांना आपण वैयक्तिकरीत्या ओळखत नाही अशा लोकांना आपले फ्रेंड बनवू नका.
ज्यात आपले नाव नसेल असा ईमेल ॲड्रेस वापरा.
आपली प्रोफाईल बनवतांना अतिशय कठीण गोपनीयता सेटिंगचा वापर करा. असे केल्याने केवळ आपल्या फ्रेंड्सनाच आपली माहिती पाहता येईल.
इंटरनेटवर चित्रे व व्हिडिओ सहजपणे शेअर करता येतात, त्यामुळे ते अपलोड करताना काळजी घ्या - जरी आपण ते फक्त आपल्या फ्रेंड्स बरोबर शेअर केले असले, तरीही ते सहजपणे लांबवर पसरू शकतात
ऑनलाईन कंटेंट शेअर करताना काळजी घ्या – खास करून जर तो आपला नसेल तर. गैरकायदेशीर डाऊनलोड करणे निश्चितपणे टाळले पाहिजे.
स्टेप 3: स्मार्ट फोन सुरक्षा
आता आपल्या फोनचा उपयोग फक्त मित्र व कुटुंबियांशी बोलण्यासाठी केला जात नाही. आधुनिक स्मार्टफोन्स वापरून आपण विस्तृत प्रकारची कामे करू शकतो- इंटरनेट ब्राउझिंग आणि आपली बिले भरणे या पासून आपल्या बँकची स्टेटमेंट्स पाहणे आणि कामावरील ईमेल्स ॲक्सेस करणे इथपर्यंत. स्मार्टफोन्स इतके आधुनिक असल्यामुळे कॉम्प्यूटर्स वापरताना ज्या सुरक्षा समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते, त्यापैकी बऱ्याच आता स्मार्टफोन्सवर सुद्धा येतात.
यात काय जोखीम आहे?
साधन हरवणे किंवा चोरीला जाणे. एखादे साधन चोरी किंवा अपघाताने आपल्या हातून गेल्यामुळे आपल्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. यात डेटा हरवणे, आणि डेटा-संरक्षण कायद्या अंतर्गत संभाव्य दायित्व येऊ शकते.
संवेदनशील डेटा हरवणे. अनेक मोबाईल साधनांमध्ये संवेदनशील किंवा गोपनीय माहिती असू शकते, उदाहरणार्थ, वैयक्तिक छायाचित्रे आणि व्हिडिओज्, ईमेल संदेश, टेक्स्ट संदेश आणि फाईल्स.
नेटवर्कमध्ये अनधिकृत शिरकाव. अनेक मोबाईल साधनांमध्ये नेटवर्क कनेक्टिव्हिटीचे विविध ऑप्शन्स दिलेले असतात, त्यामुळे संरक्षित कॉर्पोरेट सिस्टिम्सवर हल्ला करण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो.
इंटरसेप्ट केलेला किंवा करप्ट डेटा. मोबाईल साधनांवर हल्ली इतके व्यावसायिक व्यवहार होत असतात, की महत्त्वपूर्ण डेटा फोन लाईन्स किंवा मायक्रोवेव्ह ट्रान्समिशन टॅप करून इंटरसेप्ट केला जाईल अशी नेहेमीच काळजी असते.
घातक सॉफ्टवेअर. व्हायरसेस, ट्रोजन हॉर्सेस, आणि वर्मस हे मोबाईल साधनांसाठी असणारे परिचित धोके आहेत. ही साधने त्यांचे लक्ष्य बनली आहेत.
हे होण्याचे मी कसे टाळू शकेन?
मोबाईल साधनाची निवड करतांना त्याच्या सुरक्षा फीचर्सचा विचार करा आणि ते एनेबल केले असल्याची खात्री करा.
आपल्या स्मार्ट साधनामध्ये अद्ययावत अँटी-व्हायरस ॲप्लिकेशन इनस्टॉल आणि मेन्टेन करा.
संशयास्पद ईमेल किंवा टेक्स्ट संदेशातील लिंकचे अनुसरण करू नका.
आपल्या साधनावर कोणती माहिती संग्रहित करायची याचा काळजीपूर्वक विचार करा
ॲप्लिकेशन्स निवडतांना व इनस्टॉल करतांना काळजी घ्या
ब्ल्यूटूथ, इन्फ्रारेड किंवा वाय-फाय अशासारखे इंटरफेसेस जेव्हा वापरात नसतील तेव्हा डिसेबर करा.
अनोळखी वाय-फाय नेटवर्क्सशी जोडले जाणे आणि असुरक्षित वाय-फाय हॉटस्पॉट्स वापरण्याचे टाळा.
साधन फेकून देण्याआधी त्यातील सर्व माहिती डिलीट करा.
सायबर सुरक्षा आणि जागृती | व्याख्याने व परिसंवाद | जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियान राबविणेबाबत | ३ ते १२ जानेवारी | बालिका दिन विशेष | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती
इतर निबंध व भाषणे -
२) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
३) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
४) सुजाण पालकत्व - इथे क्लिक करा
५) मुलींची सुरक्षा व सशक्तीकरण-इथे क्लिक करा
६) प्रेरणा जिजाऊंची, वसा सावित्रीचा -इथे क्लिक करा
७) लिंग समानता जोपासणारा समाज-इथे क्लिक करा
आमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या ग्रुपला Join व्हा. ग्रुप सेटिंग Only Admin असेल.
जिल्हानिहाय व्हॉट्सअप ग्रुप - इथे क्लिक करा.
टेलिग्राम ग्रुपला समाविष्ट व्हा - https://t.me/+STR7BmsY5ErbaVSV
Tags
बालिका दिन