लिंग समानता जोपासणारा समाज निबंध | जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियान राबविणेबाबत | ३ ते १२ जानेवारी | बालिका दिन विशेष | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती
सध्याच्या परिस्थितीत लिंग समानता जोपासणारा समाज प्रत्येक गावात,भागात आहे का हे जाणणे गरजेचे आहे. स्त्री व पुरुष ही संसाररथाची दोन चाके आहेत,' असे मोठ्या कौतुकाने म्हटले जाते. पण रथ नीट चालायला हवा तर ही चाके सारखी हवीत, त्यांत कोणताही लहानमोठेपणा असता कामा नये. संसारात स्त्री व पुरुष यांना समान हक्क, समान मान असतो का? फार पूर्वीपासून आपल्याकडे स्त्री घर सांभाळत असे आणि संपत्ती मिळवण्याचे काम पुरुष करीत असे. संसारगाडा चालवण्यासाठीच केलेली ही कामाची विभागणी होती. पण यांतूनच नकळत कमावणारा पुरुष प्रधान आणि अन्न शिजवणारी स्त्री ही गौण मानली जाऊ लागली. ' चूल-मूल ' सांभाळणाऱ्या स्त्रीला काय अक्कल असते, तिला काय कळतयं, हा विचारच मुळी स्त्रीला गुलाम बनवण्याच्या मनोभूमिकेतून पुढे आला. मग स्त्री झाली लाथा खाणारी पायाची दासी!
आज हे चित्र बदलले आहे. स्त्रीने आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. शहरातील स्त्री कचेरीतील बौद्धिक काम लीलया करते. अगदी प्रमुख अधिकारपदही सांभाळते. विद्यालयांत, महाविद्यालयांत अध्यापनाचे कार्य करते. तिने वैद्यकीय क्षेत्राबरोबर स्थापत्य क्षेत्राहही नावलौकिक मिळवला आहे. आजच्या युगातील ' माहिती तंत्रज्ञान ' या क्षेत्राहही ती अग्रेर आहे. ती मोटारगाडी, आगगाडी, विमान चालवते. अंतराळात झेप घेते आणि समुद्राच्या तळाशीही संशोधनासाठी जाते. कोणतेही क्षेत्रतिला असाध्य नाही. खेड्यातही स्त्रिया आज पुरुषांच्या बरोबरीने शेतात राबतात; कष्टाची कामे करतात; गुरे सांभाळणे,कुक्कुटपालन अशी कामे करतात; सरपंच, उपसरपंच अशी पदे सांभाळतात आणि गावाचे प्रश्न जिद्दीने सोडवतात. मग आता स्त्री व पुरुष यांत भेदभाव करणे योग्य आहे का?
दुर्दैवाची गोष्ट अशी की, अजूनही असा पक्षपात केला जातो. आजची स्त्री घरातील पत्नी, माता व सून या भूमिकांतील गृहिणीची जबाबदारी पार पाडतेच; शिवाय बाहेरची कामेही करते. मुलांचा अभ्यास, बँकादींशी संबंधित व्यवहार, आजारपण या जबाबदाऱ्याही ती पार पाडते. तरीपण काही घरांतून स्त्रियांच्या मताला किंमत दिली जात नाही.
काही खेड्यांत तालुक्याच्या ठिकाणी स्त्री सरपंच किंवा जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाली, तरी काही मंडळी अजूनही तिला त्रास देतात; पण आजची सक्षम स्त्री त्यांना पुरून उरत आहे. आज ग्रामीण स्त्रिया आपले बचतगट स्थापन करून स्वावलंबी होत आहेत. तेव्हा आता स्त्रीला कमी लेखणे योग्य नाही. आईवडील हे दोघेही मुलाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, हे ओळखून आता विचारपूर्वक पावले टाकली जात आहेत. आता मुलांच्या सर्टिफिकेटस्, पदवी प्रमाणपत्रे यांत वडिलांच्या नावाबरोबर आईचेही नाव छापले जाते. पुष्कळ वसाहतीत घरकुल हे घरातील स्त्रीच्या नावावर केले जाते. काळाप्रमाणे बदलणे आवश्यक आहे, हे आता आपल्या समाजाने जाणले आहे.लिंग समानता जोपासणारा समाज निर्माण होणे आवश्यक आहे.
पुरूषांच्या बरोबरीने स्त्रियांना जीवनाच्या सर्व क्षेत्रांत व्यक्तिमत्त्व विकासाची समान संधी म्हणजे स्त्री – पुरूष समानता होय. पुरूषाला जशी सुखदुः ख आहेत तशीच स्त्रिला सुद्धा आहेत, याची जाणीव स्त्री-पुरूषांत जागृत करणे म्हणजे स्त्री – पुरूष समानता. स्त्री-पुरूषांना जीवनाच्या सर्व क्षेत्रांत समान हक्क आणि अधिकार मिळणे, समान वागणूक आणि समान संधी मिळणे असाही समानतेचा अर्थ होतो. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने स्त्रियांना विकासाच्या सर्व संधी समानतेत समाविष्ट आहेत. स्त्री-पुरुष समानतेसाठी घरातील दोघांनीही पुढाकार घेणे आवश्यक असून त्याची सुरुवात घरापासून करावयाची असते व केवळ पुरुषांना विरोध केल्याने ही समानता होणार नसून त्यासाठी महिलांनीही जबाबदारी ओळखली पाहिजे. मुलामुलींमध्ये भेद न करता समान वागणूक दिली तरच स्त्री-पुरुष समानता खऱ्या अर्थाने होईल.
गेल्या शतकात अनेकांच्या प्रयत्नातून स्त्री थोडी बंधनातून बाहेर पडत आहे. शिक्षणाची दारे खुली झाल्यावर तिने आपल्या प्रगतीचा वेग वाढला आहे. मानवी जीवनातील कोणते क्षेत्र तिला आता नवे राहिलेले नाही. पुरुषाच्या बरोबरीने ती प्रत्येक क्षेत्रात अगदी रणांगणावर ही आपली कर्तबगारी गाजवत आहे. स्त्रीने आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. शहरातील स्त्री कचेरीतील बौद्धिक काम लीलया करते. अगदी प्रमुख अधिकारपदही सांभाळते. विद्यालयांत, महाविद्यालयांत अध्यापनाचे कार्य करते. तिने वैद्यकीय क्षेत्राबरोबर स्थापत्य क्षेत्राहही नावलौकिक मिळवला आहे. आजच्या युगातील ‘ माहिती तंत्रज्ञान ‘ या क्षेत्राहही ती अग्रेर आहे. ती मोटारगाडी, आगगाडी, विमान चालवते. अंतराळात झेप घेते आणि समुद्राच्या तळाशीही संशोधनासाठी जाते. कोणतेही क्षेत्र तिला असाध्य नाही. लिंग समानता जोपासणारा समाज निर्माण झाला तरच स्त्रिया पुरुषांबरोबर काम करतील. अनेक क्षेत्रात चमकतील.
लिंग समानता जोपासणारा समाज निबंध | जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियान राबविणेबाबत | ३ ते १२ जानेवारी | बालिका दिन विशेष | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती
इतर निबंध व भाषणे -
२) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
३) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
४) सुजाण पालकत्व - इथे क्लिक करा
५) मुलींची सुरक्षा व सशक्तीकरण-इथे क्लिक करा
६) प्रेरणा जिजाऊंची, वसा सावित्रीचा -इथे क्लिक करा
७) लिंग समानता जोपासणारा समाज-इथे क्लिक करा
आमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या ग्रुपला Join व्हा. ग्रुप सेटिंग Only Admin असेल.
जिल्हानिहाय व्हॉट्सअप ग्रुप - इथे क्लिक करा.
टेलिग्राम ग्रुपला समाविष्ट व्हा - https://t.me/+STR7BmsY5ErbaVSV
Tags
बालिका दिन