एक प्रतिज्ञा असे आमुची ज्ञानाची साधना
चिरंतन ज्ञानाची साधना….२
ज्ञान हेच संजीवन साऱ्या जगताच्या जीवना ॥धृ.॥ चिरंतन…
ज्योत जागवू सुजाणतेची, सकलांच्या अंतरी
तीच निवारील पटल तमाचे, प्रभात सूर्यापरी
ज्ञानच देऊळ ज्ञानच दैवत, प्रगतीच्या पूजना ॥१॥ चिरंतन…
नव्या गुणाचा नव्या जगाचा ज्ञान धर्म आहे
त्यातच आमुच्या उजळ उद्याचे आश्वासन राहे
मुक्त करील तो परंपरेच्या, बंदीघरातून मना ॥२॥ चिरंतन…
हाच मंत्र नेईल आम्हाला, दिव्य भविष्याकडे
न्यायनीतिचे पाऊल जेथे, भेदाशी ना अडे
जे-जे मंगल, पावन त्याची येथे आराधना ॥३॥ चिरंतन…
$ads={2}
विविध प्रार्थना -
Tags
प्रार्थना