शिव जयंती भाषण/निबंध -1 | छत्रपती शिवाजी महाराज | Shiv Jayanti Bhashan / Nibandh
आदरणीय व्यासपीठ, गुरुजनवर्ग तसेच येथे उपस्थित शिवभक्तांना माझा नमस्कार..
आज मी तुम्हाला ज्यांचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे,अशा महान शूर पराक्रमी रयतेच्या राजांबद्दल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चार शब्द सांगणार आहे.
१९ फेब्रुवारी १६३० हा सोन्याचा दिवस या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊ यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला तो सिंह म्हणजे जनतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले होय. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत दुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांना जिजाऊ मातकडून चांगले संस्कार व शिकवण आणि वडील शहाजी राजांकडून शौर्याचा वारसा मिळाला तर दादोजी कोंडदेव यांनी युध्दकला शिकवली. बालवयातच त्यांनी अनेक युध्द कलांचे प्रशिक्षण घेतले. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले. रायरेश्वराच्या मंदिरात जावून जीवाला जीव देणाच्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली.त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू. स्वराज्य निर्मिती करण्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले होते. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी अशा अनेक शूर वीरांनी आपल्या शिवरायांची साथ दिली होती. शिवरायांनी मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रू अफजल खान, औरंगजेव, शाहिस्तेखान अशा अनेक शत्रूंना धूळीत पाडले.आणि राजमाता जिजाऊंने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले. शिवरायांनी अनेक गड जिंकले गुलामगिरी नष्ट केली रयतेला अंधारातून प्रकाशात आणले. स्त्रियांना आदर व सन्मान दिला, शेतकऱ्यांना मान दिला. ६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक करण्यात आला. रयतेला लोककल्याणकारी व न्यायप्रिय राजा मिळाला. अशा ह्या महापराक्रमी राजाचे शिवरायांचे ३ एप्रिल १६८० मध्ये निधन झाले.
शेवटी एवढेच म्हणेन -