A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : शुक्रवार
आजची दिनांक : १६ / ०२ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
१९८५
लेबनॉनमध्ये हिजबोल्ला या कट्टरपंथीय शिया मुस्लिम संघटनेची स्थापना.
१९५९
फिडेल कॅस्ट्रो क्युबाचे १५ वे पंतप्रधान बनले (कार्यकाल: १६ फेब्रुवारी १९५९ ते २ डिसेंबर १९७६). यानंतर ते क्युबाचे १५ वे राष्ट्राध्यक्ष बनले. (कार्यकाल: २ डिसेंबर १९७६ ते २४ फेब्रुवारी २००८)
१९१८
लिथुएनियाने (रशिया व जर्मनीपासून) स्वातंत्र्य जाहीर केले.
१७०४
औरंगजेबाने राजगड जिंकून त्याचे नाव नबीशाहगड असे ठेवले.
१९७८
वासिम जाफर – भारतीय क्रिकेटपटू
१९६४
बेबेटो – ब्राझीलचा फुटबॉलपटू
(Image Credit: worldfootball.net)
१९५४
मायकेल होल्डिंग – ‘Whispering Death’ नावाने प्रसिद्ध असलेला वेस्ट इंडिजचा (जमैका) जलदगती गोलंदाज
(Image Credit: Sports Corner)
१८७६
रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे – भारतातील पहिले सिनिअर रँग्लर, मुंबई प्रांताचे शिक्षणमंत्री (१९२१–२३), अबकारी खात्याचे मंत्री (१९२७), इंडियन कौन्सिलचे सभासद (१९२७–३२), लखनौ व पुणे विद्यापीठांचे कुलगुरू,(अनुक्रमे १९३२–३८ व १९५६–५९) व ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्चायुक्त (१९४४–४७) यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले. पुणे नगरपालिकेचे ते काही काळ सदस्य होते. अनेक सरकारी समित्यांवर त्यांनी काम केले. ब्रिटिश सरकारने कैसर-इ-हिंद सुवर्णपदक (१९१६) व नाइटहूड (१९४२) देऊन त्यांचा गौरव केला.
(मृत्यू: ६ मे १९६६)
(Image Credit: नवाकाळ)
१७४५
माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ‘थोरले’ माधवराव पेशवे – मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा, १६ व्या वर्षी पेशवेपदावर विराजमान झालेला अत्यंत कर्तबगार पेशवा. पानिपतच्या युध्दानंतर विस्कटलेली मराठेशाहीची घडी त्यांनी बसविली.
(मृत्यू: १८ नोव्हेंबर १७७२)
२००१
रंजन साळवी – ‘पिंजरा’, ‘सवाल माझा ऐका’, ‘केला इशारा जाता जाता’ आदी मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक
२०००
बेल्लारी शामण्णा केशवन – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, स्वतंत्र भारताचे प्रमुख ग्रंथपाल (१९४७ - १९६२), ग्रंथसूचीकार, पद्मश्री, ‘इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर’चे पहिले संचालक
(जन्म: १० मे १९०९)
१९९६
आर. डी. आगा – उद्योगपती, थरमॅक्स उद्योगसमुहाचे संस्थापक
१९९४
पं. निवृत्तीबुवा सरनाईक – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक
(जन्म: ४ जुलै १९१२)
१९६८
नारायणराव सोपानराव बोरावके – कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार, पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यांत अनेक संस्था व उद्योग त्यांनी उभे केले. संशोधित फळांच्या उत्पादनास त्यांनी प्रोत्साहन दिले. १९३३ मध्ये त्यांना ‘रावसाहेब’ तर १९४६ मध्ये त्यांना ‘रावबहादूर’ हे किताब मिळाले. शेतीच्या आधुनिकीकरणावर त्यांनी भर दिला.
(जन्म: १७ आक्टोबर १८९२)
(Image Credit: The Saswad Mali Sugar Factory)
१९५६
मेघनाद साहा – खगोलभौतिकशास्त्रज्ञ व संसदसदस्य. तार्यांच्या वातावरणाचे तापमान आणि आयनीभवन यांचा संबंध स्पष्ट करणारा सिद्धांत त्यांनी मांडला. भारताचे स्वत:चे राष्ट्रीय पंचांग त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आले.
(जन्म: ६ आक्टोबर १८९३)
(Image Credit: Wikipedia)
१९४४
धुंडिराज गोविंद ऊर्फ ‘दादासाहेब’ फाळके – भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक, लेखक, छायाचित्रकार, दिग्दर्शक, संकलक, वेशभूषाकार, कलादिग्दर्शक इ. अनेक जबाबदार्या ते सांभाळत असत.
(जन्म: ३० एप्रिल १८७० - त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
खरा वेडा कोण?
एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी अनेक मानसशास्त्रीय चाचण्यांना तोंड द्यावे लागत असे. त्यातील शेवटच्या चाचणीमध्ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रूपयांचे नाणे आणि एक मळकट पन्नास रूपयांची नोट ठेवली जाई. त्यातील फक्त एकच गोष्ट त्याला उचलण्यास सांगितली जाई. वेड्याने पन्नास रूपये उचचले की त्याला डिसचार्ज दिला जाई व तसे न केल्यास त्याला पुन्हा एकदा चाचण्या पार करायला सांगितल्या जात. गरज पडल्यास पुन्हा उपचारासाठीही पाठविले जाई.
हॉस्पीटलमधील एक वेडा शेवटच्या चाचणीपर्यंत सगळ्या चाचण्या पटापट पार करत असे मात्र शेवटच्या चाचणीला मात्र नापास होत असे. अनेकदा असे घडल्यावर चाचणी घेणारे डॉक्टर कंटाळले व त्यांनी एक युक्ती केली पुढच्या वेळेला त्या वेड्यासमोर एक पाच रूपयांची जुनी नोट व पन्नास रूपयांची कोरी करकरीत नवी नोट ठेवली तरीही त्या वेड्याने पाच रूपयांचीच नोट उचचली. हे पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले व ओरडले,'' अरे मूर्खा, सगळ्या चाचण्या आरामात पार करतोस आणि शेवटच्या चाचणीत मात्र कायम चुकतोस. तुला पाच आणि पन्नास यातील फरक कळत नाही काय'' वेडा शांतपणे म्हणाला,'' ते मला चांगलं कळतं डॉक्टरसाहेब, पण इथून बाहेर पडलो की, मला रोजचा खर्च स्वत:लाच करावा लागणार आहे. त्यापेक्षा पाच रूपयांचे नाणे उचचले की, मला इथून बाहेर पडावे लागत नाही, पाच रूपयेही मिळतात आणि खाणेपिणेराहणे सगळे काही फुकटात होते. मग मी पन्नास रूपयांची नोट उचलून स्वत:च्या पायावर धोंडा पाडून का म्हणून घेऊ''
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.