A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : शुक्रवार
आजची दिनांक : ०२ / ०२ / २०२४
आजचा सुविचार : आयुष्यात आपण किती वेळा हरला आहे,काही फरक पडत नाही कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे.
G दिनविशेष
दिनविशेष
१९७१
इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर ‘जागतिक पाणथळ भूमी दिन’ म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला.
१९७१
इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.
१९६२
४०० वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो यांची युति
१९५७
गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.
१९४३
दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात
१९३३
अॅडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
१८४८
कॅलिफोर्निया गोल्ड रश – सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.
१९७९
शमिता शेट्टी – बॉलीवूड अभिनेत्री
१९२३
ललित नारायण मिश्रा – केंद्रीय रेल्वे मंत्री, गृह राज्यमंत्री, अर्थ राज्यमंत्री, पहिल्या, दुसर्या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार
(मृत्यू: ३ जानेवारी १९७५ - समस्तीपूर, बिहार)
१९०५
अॅन रँड – जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या
(मृत्यू: ६ मार्च १९८२)
१८८४
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर – ज्ञानकोशकार. ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य होय.
(मृत्यू: १० एप्रिल १९३७ - पुणे)
१८५६
स्वामी श्रद्धानंद – स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक
(मृत्यू: २३ डिसेंबर १९२६)
२००७
विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता
(जन्म: २७ डिसेंबर १९४४)
१९८७
अॅलिएस्टर मॅकलिन – स्कॉटिश साहसकथा लेखक
(जन्म: २१ एप्रिल १९२२)
१९७०
बर्ट्रांड रसेल – ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार
(जन्म:१८ मे १८७२)
१९३०
वासुदेव गोविंद आपटे – लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार. त्यांनी लहान मुलांसाठी ‘आनंद’ हे मासिक सुरू केले होते.
(जन्म: १२ एप्रिल १८७१)
१९१७
महर्षी अण्णासाहेब पटवर्धन – लोकमान्य टिळकांचे स्नेही आणि विख्यात वैद्य यांनी देहत्याग केला.
(जन्म: ४ मे १८४७)
१९०७
दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज
(जन्म: ८ फेब्रुवारी १८३४)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
संत रज्जब आणि जुबेर
संत रज्जब नेहमीच सर्वोच्च शक्तीच्या स्मरणात मग्न राहत असत. ना कधी वाईट वागत न वाईट विचार करत. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकास ते समान वागणूक देत, सदाचरणाबद्दल सांगत, प्रेमळ व गोड वाणीने बोलत. रज्जब आपल्या गावातील लोकांचे श्रद्धाकेंद्र बनले होते. गावातील लोक त्यांचे विचार ऐकत असत आणि व्यवहारात आचरण करत असत. एकेदिवशी परगावचा जुबेर नावाचा एक तरुण त्या गावात कामाच्या शोधात आला होता. त्याला काम तर मिळाले परंतु पैसा हाती येताच तो दारूच्या आहारी गेला. दारू पिऊन तो लोकांना शिव्या देत असे. यामुळे एके दिवशी त्याने दारू पिऊन खूप हंगामा केला, लोकांना खूप काही बोलला आणि तोल ना सावरता आल्याने तो गटारीत जावून पडला. लोकांना वाईटसाईट बोलल्याने त्याला कुणी गटारीतून काढण्यास पुढे आले नाही.
त्याचवेळी रज्जब तिथे आले. त्यांनी त्याला उचलले, त्याचे तोंड धुतले आणि जुबेरला म्हणाले,"अरे मित्रा! ज्या तोंडातून तू देवाचे नाव घेतले पाहिजे त्या तोंडातून दारू पितो आणि त्याच तोंडातून ईश्वर स्वरूप असलेल्या अनेक माणसाना शिव्या देतो हे चांगले नाही. हा माणुसकीचा सर्वात मोठा गुन्हा आहे. पण हे कळण्यासाठी जुबेर कुठे शुद्धीत होता. त्याला हे सर्व इतर लोकांनी सांगितले तेंव्हा तो स्वत:बद्दल जास्त वाईट वाटले. लोकांनी त्याला संतांनी केलेल्या सहकार्याची जाणीव करून दिली. या गोष्टीचा जुबेरवर खूप परिणाम झाला. त्याने संकल्प केला कि ज्या तोंडाला संतानी धुतले त्या तोंडातून आयुष्यात कधीच वाईट शब्द निघणार नाहीत. त्याने सात्विक जीवनमार्ग पत्करला.
तात्पर्य-संतांचे मार्गदर्शन नेहमीच चांगले असते, फक्त त्यानुसार आचरण करणे हे आपल्या हातात आहे. चांगले आचरण हि माणसाची ओळख आहे.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.