19 फेब्रुवारी शिव जयंती निमित्त उपयुक्त मराठी निबंध /भाषण दिलेले आहे. आपण त्याचा सराव करून शिव जयंती दिवशी ऑनलाईन/ ऑफलाईन सादरीकरण करू शकता. त्याचा व्हिडिओ शेअर करू शकता.
शिव जयंती भाषण/निबंध -3 | छत्रपती शिवाजी महाराज | Shiv Jayanti Bhashan / Nibandh
शिव जयंती भाषण/निबंध -3 | छत्रपती शिवाजी महाराज | Shiv Jayanti Bhashan / Nibandh
शिव जयंती भाषण/निबंध -3 | छत्रपती शिवाजी महाराज | Shiv Jayanti Bhashan / Nibandh
शिव जयंती भाषण/निबंध -3
आदरणीय व्यासपीठ, गुरुजनवर्ग तसेच येथे उपस्थित शिवभक्तांना माझा नमस्कार..
आज १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या निमितने आपल्यासमोर दोन शब्द बोलणार आहे, ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही विनंती. सुमारे साडेतीशे वर्षानंतर ही जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला.
शिवनेरी गडावरील शिवाई या देवीमुळे माता जिजाबाई यांनी त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले आणि त्यांना आपण शिवाजीराजे, शिवबा किंवा शिवराय अशा अनेक नावांनी ओळखतो. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. शिवाजी महाराज अवघे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली आणि वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली.
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची जाणीव करून देण्यासाठी जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली, शूर वीरांच्या व रामायण महाभारतातील गोष्टी सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले अशा या संस्कारांमुळे शिवाजीराजे घडले. शिवाजी महाराज जेव्हा पुण्याचा कारभार पाहत होते तेव्हा त्यांनी राजमुद्रा तयार केली.
ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती.“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते” या राजमुद्राचा मराठीत अर्थ असा की, जोपर्यंत प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो तशीच शहाजीचा पुत्र शिवाजीची हि राजमुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.
शिस्तबद्ध लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य निर्माण केले. इ.स १६४० मध्ये शिवरायांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला. इ.स १६४५ मध्ये शिवरायांनी आदिलशहाच्या पुणे प्रदेशाच्या आजूबाजूचा कोंढाणा, तोरणा, सिंहगड, पुरंदर या किल्ल्यांचा ताबा घेतला होता.
अफझलखानाने प्रतापगडावर शिवरायांना ठार मानण्याचे षडयंत्र रचले होते पण शिवरायांनी खानाच्या डाव ओळखला आणि गनिमीकाव्याचा उपयोग करीत अफजल खानाचा शिवरायांनी वध केला. याच गनिमीकाव्याचा उपयोग करून शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या. या घटनेवरून महाराजांची दूरदृष्टी दिसून येते.
इ.स ६ जून १६७४ रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवाजी महाराज हे कुशल राज्यकर्ते होते, त्यांनी अष्टप्रधान मंडळ सुरू केले. प्रत्येक व्यक्तीस मंडळाची पदे आणि स्वराज्याची ठराविक जबाबदारी दिली, शिवाजी महाराज हे मराठी, संस्कृत भाषेचे समर्थक होते, स्रि स्वातंत्र्याला त्यांनी प्रोत्साहन दिले, स्वराज्याच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी किल्ले उभारलेले. इ.स ३ एप्रिल, १६८० रोजी आजारपणामुळे रायगडावर शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले.
प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे ते राजे होते, स्वराज्याची शपथ घेऊन स्वतंत्र स्वराज्य निर्माण करणारे ते राजे होते, महाराजांचा हा आदर्श आपण घेतला पाहिजे. शिवजयंतीला नुसता शिवरायांचा जयजयकार करण्यापेक्षा प्रत्येक दिवस शिवरायांच्या विचारांनी प्रेरित केला पाहिजे. शिवरायांचे भक्त आपण तेव्हा शोभू जेव्हा आपण एकत्र येऊन देशाच्या भल्याचे काम करू. आपल्या आयुष्याला स्फूर्ती देणाऱ्या या राजाला माझे कोटी कोटी प्रणाम जय भवानी जय शिवाजी धन्यवाद.!
शिव जयंती भाषण/निबंध -3 | छत्रपती शिवाजी महाराज | Shiv Jayanti Bhashan / Nibandh
छत्रपती शिवाजी महाराज भाषण
शिवाजी महाराज भाषण
राजा छत्रपती शिवाजी महाराज भाषण
Chhatrapati shivaji maharaj speech
Chhatrapati shivaji maharaj marathi speech
shiv jayanti maharaj speech
शिवाजी महाराज भाषण मराठी शायरी
राजा शिवछत्रपती