19 फेब्रुवारी शिव जयंती निमित्त उपयुक्त मराठी निबंध /भाषण दिलेले आहे. आपण त्याचा सराव करून शिव जयंती दिवशी ऑनलाईन/ ऑफलाईन सादरीकरण करू शकता. त्याचा व्हिडिओ शेअर करू शकता.
शिव जयंती भाषण/निबंध -5 | छत्रपती शिवाजी महाराज | Shiv Jayanti Bhashan / Nibandh
शिव जयंती भाषण/निबंध -5 | छत्रपती शिवाजी महाराज | Shiv Jayanti Bhashan / Nibandh
शिव जयंती भाषण/निबंध -5 | छत्रपती शिवाजी महाराज | Shiv Jayanti Bhashan / Nibandh
शिव जयंती भाषण/निबंध -5
सह्याद्रीच्या कड्या-कपारांनाही पाझर फुटेल, डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल, झाडेझुडपे ही शहरतील आणि विशाल नभाला ही त्यांच्या समोर झुकावे वाटेल, असा लोक कल्याणकारी रयतेचा राजा, मावळ्यांचा सखा, बहुजनांचा कैवारी, अशी छत्रपती शिवाजी महाराजांना कितीही विशेषणे लावले तरीही ते कमी पडतील.
“इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर..एक एक किल्ला नेहाळावा आठवा शिवरायांचा कारभार”“दिली उभारी मनाला, झाल्या तलवारी वाऱ्यावरती स्वार.हर हर महादेव गर्जले ते चार मावळ्यांच्या जोरावर..!
अवघ्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी आभाळभर शौर्य गाजवले. असे राजे श्री शिवछत्रपती यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० या मंगल दिनी शिवनेरीवर झाला. तोफांचा कडकडाट झाला, सनई चौघडे वाजले आणि साऱ्या आस्मानात आनंदाची उधळण झाली. या दिवशी थोर माता जिजाऊंच्या पोटी दिन दलितांचा कैवारी, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला.
शिवबांवर आई जिजाऊंनी लहानपणा पासून उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडविले आणि अवघ्या १४ व्या वर्षी स्वराज्य निर्माण करण्याचे धाडसी स्वप्न पाहिले आणि त्या दृष्टीने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवून प्रत्यक्षात उतरविले. स्वराज्यनिर्मीतीच्या या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले पण ते किंचितही कधी डगमगले नाही त्यांनी स्वराज्य निर्मितीचे आपले कार्य अविरत सुरू ठेवले.
त्यांनी तानाजी, सूर्याजी, बाजीप्रभू, जिवा महाला असे जीवाला जीव देणारे मावळे जमविले. स्वराज्यनिर्मीतीची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडाचा पराक्रम, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या अजोड कार्याची महती पटवून देतात.
शिवाजी महाराज नुसते राजेच नव्हे तर एक युगपुरुष होते त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला. नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले, शक्ती पेक्षा युक्तीने कार्य केले, संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले.
शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते नेहमी झटले. सर्वधर्म समभाव, स्त्रियांप्रती आदर भाव या न्यायाने ते वागले. मित्रहो असे शिवछत्रपतींचे त्यांचे विचार व कार्य आजही आपल्याला प्रेरणा व ऊर्जा निर्माण करतात म्हणून अशा कर्तुत्ववान व पराक्रमी राजांविषयी व्यक्त होताना शब्दही कमी पडतात..
इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर… आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय.. ! एवढे बोलून माझे भाषण संपवतो/संपवते.. जय भवानी.. जय शिवराय..
शिव जयंती भाषण/निबंध -5 | छत्रपती शिवाजी महाराज | Shiv Jayanti Bhashan / Nibandh
छत्रपती शिवाजी महाराज भाषण
शिवाजी महाराज भाषण
राजा छत्रपती शिवाजी महाराज भाषण
Chhatrapati shivaji maharaj speech
Chhatrapati shivaji maharaj marathi speech
shiv jayanti maharaj speech
शिवाजी महाराज भाषण मराठी शायरी
राजा शिवछत्रपती