19 फेब्रुवारी शिव जयंती निमित्त उपयुक्त मराठी निबंध /भाषण दिलेले आहे. आपण त्याचा सराव करून शिव जयंती दिवशी ऑनलाईन/ ऑफलाईन सादरीकरण करू शकता. त्याचा व्हिडिओ शेअर करू शकता.
शिव जयंती भाषण/निबंध -6 | छत्रपती शिवाजी महाराज | Shiv Jayanti Bhashan / Nibandh
शिव जयंती भाषण/निबंध -6 | छत्रपती शिवाजी महाराज | Shiv Jayanti Bhashan / Nibandh
शिव जयंती भाषण/निबंध -6 | छत्रपती शिवाजी महाराज | Shiv Jayanti Bhashan / Nibandh
शिव जयंती भाषण/निबंध -6
जय जिजाऊ..! जय शिवराय..! छत्रपती शिवाजी महाराज कि जय ..! ( या घोषणा देऊन श्रोत्यांना उत्साहित करून आपल्या सोबत जोडून घ्या ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली या भूमीत मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली याबद्दल मी संयोजकाची/चा आभारी आहे..
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, भूपती, नृपती, पृथ्वी पति, परम प्रतापी, प्रगल्भ बुद्धिमान, विज्ञाननीष्ठ, जगविख्यात विश्व वंदनीय, राजाधिराज योगी राज, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊ लेखी चा मानाचा मुजरा मानाचा मुजरा.. ! (वक्ता स्त्री असेल तर ) “छत्रपती शिवाजी महाराज की जय” हे शब्द कानावर पडताच ज्यांच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडतो.. रक्त सळसळते.. छाती अभिमानाने फुलते.. ! आणि अंगावर सर्रकन काटा येतो अशा मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, आज मी येथे आशा एका महान महापुरुषाची गाथा आपल्याला सांगणार आहे. ज्यांचा तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे.
“विजेसारखी तलवार चालवुन गेलानिधड्या छातीने हिंदुस्तान हलवुन गेला. !वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेलास्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झुकून मुजरा केलाअसा मर्द मराठा शिवबा होऊन गेला.. शिवबा होऊन गेला..!
आज या भूमीत जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही कि, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते.. कारण जन्मताच इथली माती त्याच्या मनामध्ये शिवरायांचे नाव करून ठेवते. शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र पसरलेले आहे. कोण होते शिवाजी महाराज ? असे कोणते काम त्यांनी केले की आज साडेतीनशे वर्षे उलटून देखील त्यांच्या नावाचा जयजयकार करण्यात येतो.
मित्रांनो इथल्या लोकांना तर सोडाच पण इथल्या दऱ्या-खोऱ्यात जाऊन विचारले तरी शिवाजी महाराज कोण होते ? तर ते सांगतात रुद्राचा अवतार, तो वाघाचा ठसा होता.. विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना कसा होता माझा शिवबा..! कसा होता तो माझा शिवबा.. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की, त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगणारे व प्रेरणा देणारे आहे.
‘छ’ म्हणजे शिवरायांच्या अंगी छत्तीस हत्तीचे हत्तीचे बळ होते.‘त्र’ म्हणजे, त्रस्त मोगलांना करणारे.‘प’ म्हणजे, परत न फिरणारेआणि ‘ती’ म्हणजे तिन्ही जगात जाणणारे
शिस्तप्रिय जिजाऊचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे शिवाजी महाराज होय.
एकेकाळी आम्ही जनावरासारखे जीवन जगत होतो. आमचा आमच्या अन्नधान्यावर तर सोडाच पण आमच्या देहावर देखील आमचा अधिकार राहिला नव्हता, जनावर आणि माणसं तर दूरच पण इथल्या मंदिरातील देव देखील सुरक्षित राहिले नव्हते.. याच दरम्यान शिंदखेड्याचे राजे लखुजी जाधव यांची कन्या म्हणजेच साक्षात दुर्गा, भवानी, रणचंडी जिजाऊ यांचा विवाह हा निजामशाहीचे तोडीस तोड असलेले थोर सरदार मालोजी राजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.
त्यावेळी महाराष्ट्रात पाच सुलतानी सत्ता राज्य करत होत्या. त्यांच्या आपसात सतत लढाया व्हायच्या यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे आणि असंख्य मराठी सैनिक नाहक मारले जायचे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीत हवा होता एक पेटता अंगार.. ! अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१, १९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाऊची पुण्याई फळाला आली कारण जनतेचा पोशिंदा, राजा शिवबा जन्मला आले.
माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीन दलितांच्या कैवारी जन्मला, दुष्टांचा संहार जन्मला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाचपडणाऱ्या या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले.. शिवराय जिजामातेच्या संस्करा खाली हळू हळू वाढू लागले.. जिजाऊंनी शिवबाला लहानपणा पासून सत्यासाठी, न्यायासाठी लढायला शिकवले. शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या.
जर कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कोणी रडत असेल तर त्याला मराठ्याची जात दाखवा अशी शिकवण जिजाऊ कडून शिवरायांना मिळत गेली. भोळ्या-भाबड्या जनतेला गुलामी गिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायां समोर ठेवला.
आणि म्हणून म्हणावेसे वाटते थोर तुमचे कर्म, जिजाऊ तुझे उपकार कधी फिटणार नाही. सूर्य चंद्र असेपर्यंत नाव तुमचे कधी मिटणार नाही ..!
कसा असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा. कसे असेल ते राज्य आणि कसे असतील ते शिवछत्रपती महाराज.. छत्रपती मावळ्यांचा मेळ, शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांच्या मनगटातील बळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छाती वरचा वार, शिवछत्रपती म्हणजे मना मनातले धैर्य, शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य..!
शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र.. शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहे. व्यक्ती नष्ट होतात पण विचार नष्ट होत नाही आणि अशा विचारांना घडविण्याचे काम केले राजमाता जिजाऊंनी केले . मातेकडून मिळालेले संस्कार व स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि त्याप्रमाणे वाटचाल केली
आणि सह्याद्रीच्या कडेकपारीत भटकंती करून सवंगडी गोळा केले. तानाजी, येसाजी, नेताजी,,सूर्याजी यासारखे जीवाला जीव देणारे मावळे जमवले. रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची स्थापनेची प्रतिज्ञा घेतली.. हर हर महादेवची गर्जना आसमंतात घुमली आणि वयाच्या चौदाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेचा प्रवासास सुरुवात केली.
एक होते शिवाजी भिती नव्हती त्याना जगाचीचिंता नव्हती परिणामांचीकारण त्यांना साथ होती मावळ्यांचीआणि शिकवण होती जिजाऊंचीयांची जात होती मर्द मराठ्यांचीदेशात लाट आणली भगव्याची झेंड्याचीआणि मुहर्तमेढ रोवली स्वराज्याची
म्हणूनच म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय.. शिवरायांनी आपले शौर्य, कल्पकता, संघटन कौशल्य, राज्य धर्मपालन, स्त्रीदाक्षिण्य आदी गुणांनी गेले अनेक शतके पारतंत्र्यात बुडालेल्या या भूमीला स्वातंत्र्य मिळवून दिले.
हातात धरली तलवार.. छातीत भरले पोलाद.. हातात धरली तलवार.. छातीत भरले पोलाद.. आज साडेतीनशे वर्षे होऊ नये ही महाराजांचे कार्य, पराक्रम, विचार यांची प्रेरणादायी आहे. म्हणून म्हणतात इतिहास विसरणारी माणसं इतिहास कधी घडू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसे इतिहास कधी विसरूच शकत नाही. हा हि एक इतिहास आहे.
निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी आहे. घेऊन मुठभर मावळे आणि निधडी छाती सोडून सारे ऐश्वर्य लढला.. तूच आमचे मंदिर ..तूच आमची मूर्ती..
मित्रांनो आजच्या युगात खरी गरज आहे ते शिवरायांचे विचार आणि गुण अंगी करण्याची. शिवरायांचा इतिहास जपण्याची, गड-किल्ल्यांचे संरक्षण करण्याची, छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याचप्रमाणे कार्य करण्याची, परस्त्रीला मातेसमान मानून तिचे रक्षण करण्याची, जात भेद न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची, आणि हीच असेल माझ्या राजाची जयंती शिवछत्रपतींची जयंती..!
नुसते मुखात नको हृदयात हवी शिवभक्ती..! शिवशाहीचे सारे तत्व वागण्यात तुझ्या दिसुदे ..! शिवरायांच्या नावाचा जयघोष करून मी माझे छोटेसे भाषण संपवते..
छत्रपती शिवाजी महाराज की जय.. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय… स्वराज्य जननी जिजामाता की जय.. जय जिजाऊ जय शिवराय..धन्यवाद
शिव जयंती भाषण/निबंध -6 | छत्रपती शिवाजी महाराज | Shiv Jayanti Bhashan / Nibandh
छत्रपती शिवाजी महाराज भाषण
शिवाजी महाराज भाषण
राजा छत्रपती शिवाजी महाराज भाषण
Chhatrapati shivaji maharaj speech
Chhatrapati shivaji maharaj marathi speech
shiv jayanti maharaj speech
शिवाजी महाराज भाषण मराठी शायरी
राजा शिवछत्रपती