मराठी भाषा गौरव दिन | मराठी राजभाषा दिन | भाषण / निबंध | २७ फेब्रुवारी | सविस्तर माहिती
मराठी भाषा गौरव दिन (मराठी राजभाषा दिन) हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१०मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून नमूद केलेले आहे. १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून "१ मे" दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारे वसंतराव नाईक सरकार यांनी 'मराठी राजभाषा अधिनियम १९६४' सर्वप्रथम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध केला. सन १९६६ पासून तो अंमलात आला. १ मेेे रोजी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने घोषणा करीत असतांना वसंतराव नाईक यांनी मांडलेले मराठी भाषा दिनाचे मांडलेले विचार प्रेरक होते. वसंतराव नाईक सरकारने पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदाच भाषा संचालनालयाची निर्मिती करीत प्रादेशिक स्तरावर चार केंद्राची स्थापना केली. राज्यकारभार मराठीतून चालणार असे अधिकृत जाहीर केले. 'मराठी भाषा गौरव दिवस' (२७ फेब्रुवारी) आणि 'मराठी भाषा दिवस' (१ मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे.
मराठी भाषा गौरव दिन | मराठी राजभाषा दिन | भाषण / निबंध | २७ फेब्रुवारी | सविस्तर माहिती
मराठी राजभाषा दिन का साजरा केला जातो?
27 फेब्रुवारी रोजी जागतिक मराठी राजभाषा दिवस सर्वत्र साजरा केला जातो मराठी भाषेतील जेष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपिठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस निमित्ताने ‘मराठी भाषा दिन ‘साजरा केला जातो.जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी प्रकारचे त्यांचे प्रकाशित काव्यसंग्रह आहेत. तसेच दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकूट इत्यादी त्यांची गाजलेली नाटके आहेत. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर या कांदब-या अशा अनेक साहित्यांनी कुुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा राजभाषा दिन, गौरव दिन अशा अनेक नावाने साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान अवर्णनीय आहे त्यांनी त्यांच्या साहित्याची सुरवात कवितेपासून केली. पुढे कथा, कांदब-या,ललित वाड्ःमयातील नावाजलेली साहित्य रचना यांच्या लिखानातून अवतरत गेली.
मराठी भाषा गौरव दिन | मराठी राजभाषा दिन | भाषण / निबंध | २७ फेब्रुवारी | सविस्तर माहिती
मराठी राजभाषा दिवस साजरा करण्याची पद्धत
भविष्यातील पिढीने हा मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणून मराठी राजभाषा दिन साजरा करण्याची प्रथा सूरू झाली. 27 फेब्रुवारी या दिवशी केवळ महाराष्ट्रात भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करताना मराठी गायन, वादन, वत्कृत्व स्पर्धा, मराठी निबंध स्पर्धा , शास्त्रीय संगीत यांचे आयोजन केले जाते नाटकांचे आयोजन करून मराठी भाषेला एक दिशा दिली जातेज्या मायबोलीत आपण जन्मलो आणि ज्या मायबोलीने आपल्याला घडविले त्या मायबोलीचा आपण आदर केला पाहिजे. मराठी भाषेचे संवर्धन केले पाहिजे.आणि त्यासाठीच मराठी भाषा गौरव दिवस हा आपण सर्वांनी साजरा केला पाहिजे.
“माझा मराठीची बोलू कौतुके ।
परि अमृतातेही पैजासी जिंके ।
ऐसी अक्षरे रसिके । मिळविन ।”
असे लिहून संत ज्ञानेश्वर म्हणतात की मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षा जास्त आहे.
मराठी बोलणारा माणूस नोकरी, व्यवसाय, उच्च शिक्षण या निमित्ताने जगाच्या कानाकोप-यात गेलेला आहे तिथे जाउन हिंदी -इंग्रजी सारख्या इतर भाषा अवगत करून मराठी भाषेला विसरत आहे. मायबोलीचा त्याग करून लोक इंग्रजी भाषेचा अवलंब करत आहेत. इंग्रजी ही काळाची गरज आहे. नक्कीच, याबददल दुमत नाही पण त्यासाठी मराठी भाषेला विसरणे हे योग्य नाही.
आजच्या नवीन पिढीला महाराष्ट्राचा इतिहास, मराठीचा इतिहास,आपले साहित्य वाचायला प्रवृत्त केले पाहिजे.आपण सर्वांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे.ही सुरवात आपल्या घरापासून करायला हवी.अशा गोष्टींमुळेच मराठी दिन साजरा केल्याचे खरे सार्थक होईल.
मराठी भाषा गौरव दिन | मराठी राजभाषा दिन | भाषण / निबंध | २७ फेब्रुवारी | सविस्तर माहिती
मराठी राजभाषा दिन कधी असतो?
दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी जागतिक मराठी भाषा दिवस सर्वत्र साजरा केला जातो मराठी भाषेतील जेष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपिठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस निमित्ताने ‘मराठी भाषा दिन ‘साजरा केला जातो.मराठी भाषा गौरव दिन | मराठी राजभाषा दिन | भाषण / निबंध | २७ फेब्रुवारी | सविस्तर माहिती
Tags
मराठी भाषा गौरव दिन