A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : मंगळवार
आजची दिनांक : १२ / ०३ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००१
राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये, सामाजिक आणि आर्थिक विकास या क्षेत्रांतील बहुमोल कामगिरीबद्दल देण्यात येणारा ‘यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना प्रदान करण्यात आला.
१९९९
सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.
१९९९
चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड ‘नाटो’ (NATO) मधे सामील झाले.
१९९३
मुंबई येथे झालेल्या १२ स्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिकजण ठार तर हजारो लोक जखमी.
१९९२
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले.
१९९१
जेजुरी येथील खंडोबा मंदिरात चोरी
१९६८
मॉरिशस (इंग्लंडपासून) स्वतंत्र झाला.
१९३०
ब्रिटिश सरकारने भारतात तयार केलेल्या मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे महात्मा गांधी यांनी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरूवात केली.
१९१८
रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलविण्यात आली.
१९१२
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहीलेल्या ‘संगीत मानापमान’ या नाटकाचा पहिला प्रयोग किर्लोस्कर नाटक मंडळीने मुंबईतील रिपन नाट्यगृहात केला.
१९१३
यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
(मृत्यू: २५ नोव्हेंबर १९८४)
१९११
दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ‘भाऊसाहेब‘ बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती आणि दानशूर
(जन्म: १२ ऑगस्ट १९७३)
१८९१
चिंतामण गणेश तथा ‘नटवर्य‘ चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते
(मृत्यू: २३ नोव्हेंबर १९५९
१८२४
गुस्ताव्ह रॉबर्ट किरचॉफ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: १७ आक्टोबर १८८७)
(Image Credit: Wikipedia)
२००१
रॉबर्ट लुडलुम – अमेरिकन लेखक
(जन्म: २५ मे १९२७)
१९९९
यहुदी मेनुहिन – प्रसिद्ध व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक
(जन्म: २२ एप्रिल १९१६)
(Image Credit: Wikimedia Commons)
१९४२
रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक
(जन्म: २३ सप्टेंबर १८६१)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
क्रोधावर नियंत्रण
एक १०-१२ वर्षाचा मुलगा होता. लहानपणापासूनच खूप हट्टी आणि संतापी होता. जेंव्हा त्याच्या मनाविरुद्ध घडे तेंव्हा त्याच्या रागाचा पारा प्रचंड चढे. रागाने तो वेडापिसा होत असे. त्याच्या वडिलांनी यावर एक उपाय शोधला, वडील बाजारात गेले आणि त्याच्यासाठी खिळे घेवून आले. मुलाने विचारले,"बाबा! हे खिळे कशासाठी?" वडिलांनी उत्तर दिले,"अरे ! तुला जेंव्हा कधी राग येईल तेंव्हा यातील एक खिळा घे आणि समोरच्या झाडावर ठोक". खिळे आणलेल्या पहिल्या दिवशी मुलाला खूप राग आला, त्याने एकूण ३० खिळे झाडाला ठोकले. असेच तो प्रत्येक वेळी करत गेला. पुढील काही आठवड्यात त्याला ते खिळे ठोकण्याचा कंटाळा आला व त्यामुळे त्याला क्रोधावर नियंत्रण करण्यात यश आले.
आता तो झाडावर एखाददुसरा खिळाच ठोकत असे. त्याच्या हे लक्षात आले कि झाडाला खिळे ठोकण्याऐवजी क्रोधावर नियंत्रण करणे कधीही सोपे आहे. शेवट एक दिवस तर असा उजाडला कि त्याने त्या पूर्ण दिवसात झाडाला एकही खिळा ठोकला नाही. जेंव्हा त्याने त्याच्या वडिलांना याबद्दल सांगितले तेंव्हा त्याच्या वडिल म्हणाले," तू जसे ते खिळे ठोकले तसे ते सर्व खिळे झाडावरून काढून टाक" मुलाने खिळे काढायला सुरुवात केली तसे त्याच्या लक्षात आले कि खिळे मारणे सोपे आहे पण खिळे काढणे खूप अवघड काम आहे. त्याने खूप मेहनत घेवून ते खिळे काढले व ते दाखवण्यासाठी वडिलांना झाडापाशी घेवून आला. वडिलांनी झाडाकडे पाहत त्याला म्हणाले," तू काम तर चांगले केले. पण तुझ्या एक लक्षात आले कि नाही, बघ हे सुंदर झाड तुझ्या रागाने तू किती खराब करून टाकले आहेस. तू जेंव्हा जेंव्हा रागाला येत होता त्याचे वाईट परिणाम या बिचाऱ्या झाडाला भोगावे लागत होते. तसेच आपल्या वागण्याचेही तसेच असते असेच कि आपण जेंव्हा रागात येतो तेंव्हा आपल्या रागाचे दुष्परिणाम समोरच्याच्या मनावर होतात. शस्त्राने जेवढे घाव होणार नाहीत तेवढे जास्त वार रागाच्या भरात माणूस समोरच्यावर करतो. म्हणून रागापासून दूर राहणे हेच चांगले असते.
तात्पर्य-"अति राग आणि भिक माग" हि मराठीतील म्हणच बरेचसे काही बोलून जाते. राग आवरणे हेच चांगले.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.