A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : बुधवार
आजची दिनांक : १३ / ०३ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००७
वेस्ट इंडीजमधे ९ व्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचे उद्घाटन झाले.
१९९९
जलाशयाच्या तळाला भोक पाडून त्यातील पाणी बोगद्याच्या साह्याने भूमिगत जलविद्युतगृअहात नेऊन त्याद्वारे वीजनिर्मिती करणार्या (Lake Tapping) आशिया खंडातील पहिल्या प्रयोगाच्या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन
१९९७
मदर तेरेसा यांचे वारस म्हणून कोलकात्यातील ‘मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ ने सिस्टर निर्मला यांची नियुक्ती केली.
१९४०
अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.
१९३०
क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग या शास्त्रज्ञाने प्लूटो ग्रह शोधल्याचे हारवर्ड कॉलेज येथील वेधशाळेला कळवले. मात्र या ग्रहाचा शोध त्याला १८ फेब्रुवारी १९३० या दिवशीच लागला होता.
१९१०
पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.
१७८१
विल्यम हर्षेल याने युरेनस या ग्रहाचा शोध लावला.
१९२६
रविन्द्र पिंगे – ललित लेखक
(मृत्यू: १७ आक्टोबर २००८)
(Image Credit: मैत्री २०१२)
१८९३
डॉ. वासुदेव विष्णू मिराशी – महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक
(मृत्यू: ३ एप्रिल १९८५)
१७३३
जोसेफ प्रिस्टले – इंग्लिश रसायनशास्रज्ञ
(मृत्यू: ६ फेब्रुवारी १८०४)
२००४
उस्ताद विलायत खाँ – सतारवादक
(जन्म: २८ ऑगस्ट १९२८)
१९९७
शीला इराणी – राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू व संघटक
(जन्म: ? ? ????)
१९९६
शफी इनामदार – अभिनेते व नाट्यनिर्माते
(जन्म: २३ आक्टोबर १९४५ - पांगारी, दापोली, रत्नागिरी)
(Image Credit: IMDb)
१९९४
श्रीपाद यशवंत कोल्हटकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व ‘सिटू’ या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते
(जन्म: ? ? ????)
१९६७
सर फँक वॉरेल – वेस्ट इंडिजचे क्रिकेट खेळाडू
(जन्म: १ ऑगस्ट १९२४)
१९५५
वीर विक्रम शाह ‘त्रिभुवन’ – नेपाळचे राजे
(जन्म: २३ जून १९०६)
१९०१
बेंजामिन हॅरिसन – अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: २० ऑगस्ट १८३३)
१८९९
दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ‘कवी दत्त’
(जन्म: २७ जून १८७५)
१८००
बाळाजी जनार्दन भानू उर्फ ‘नाना फडणवीस’ – पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी, पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे. नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या १४ व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रूळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचं वर्चस्व टिकवून ठेवले. पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. यातील आजारपणातच त्यांचा अंत झाला. वाई जवळील मेणवली येथे नाना फडणीसांचा वाडा आजही पहायला मिळतो.
(जन्म: १२ फेब्रुवारी १७४२ - सातारा)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
देवाचा न्याय
पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता, तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि, "विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील, म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, 'देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन" त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे , पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस,काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत उभा रहा" पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला. तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले, पहिल्यांदा श्रीमंत भक्त आला व म्हणाला, "देवा मी लाखो रुपयांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये माझी भरभराट होऊ दे" (त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकीट तेथेच विसरला, पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही, त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला .......... पुढे तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले ) गरीब भक्त आला व दर्शन घेवून म्हणाला, "पांडुरंगा, हा एक रुपया मी तुला अर्पण करतो, माझी हि धनाची सेवा स्वीकार कर.
तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे....... देवा! माझी बायको व मुले २ दिवसांपासून उपाशी आहेत, घरात अन्नाचा कण नाही, माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे" ( असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकीट दिसते, तेव्हा देवाचे आभार माणू तो ते पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो........ गोकुळ काहीच न बोलता हसत उभाच असतो ) पुढे तिथे एक नावाडी येतो, देवाला उद्देशून तो म्हणतो, " हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे " (असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो........तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो ) तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, " पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस, मी काहीच नाही केले तरी मला हि शिक्षा" (हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते, तो विचार करतो कि स्वत: पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते, असे म्हणून न राहवून तो पोलीसांना सांगतो कि, " पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे" ..... त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात, तेव्हा नावाडी न श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात.) रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो "कसा होता दिवस?" गोकुळ म्हणतो , " पांडुरंगा मला वाटले होते कि इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळाले कि हे काम किती अवघड आहे ते, ह्यावरून कळते कि तुझे दिवस हे सोपे नसतात" ....... पण देवा मी आज एक चांगले काम पण केले," असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो. तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, " शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास, तुला मी सांगितले होते कि तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस, तुझा माझ्यावर (देवावर) विश्वासच नाही........ तुला काय वाटते कि मी भक्तांच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही ???" ....... गोकुळ मान खाली घालून उभा राहतो .......... पांडुरंग पुढे म्हणतो ......... अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते, आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता. त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता, तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशांचे पाकीट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे. त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता, तेथील वातावरण आज खूप खराब आहे, मोठमोठ्या लाटा जोराने वहात आहेत, ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता, म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल.पण तुला वाटले कि आपण एक दिवसाचा पांडुरंग झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस, आणि नेहमी जे होते तेच आजपण झाले ..... "देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्यच त्यावर पाणी सोडतो"
तात्पर्य :- देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे ...... फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहीजे.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.