A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : शुक्रवार
आजची दिनांक : १५ / ०३ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००३
हू जिंताओ चीनच्या अध्यक्षपदी
१९९०
सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.
१९८५
symbolics.com हे internet वरील पहिले .com संकेत स्थळ (Domain Name) नोंदले गेले. वेरिसाईनच्या २०२० अखेरच्या आकडेवारीनुसार सध्या जगात सुमारे ३६६, ३००, ००० इतक्या संकेतस्थळांची नोंदणी झालेली आहे. आणि त्यात रोज सुमारे दहा लाख संकेतस्थळांची भर पडत आहे.
१९६१
ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.
१९५६
ब्रॉडवेवरील मार्क हेलिंगर थिएटर येथे ‘माय फेअर लेडी’चा पहिला प्रयोग झाला.
१९३९
दुसरे महायुद्ध – जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले.
१९१९
हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन
१९०६
रोल्स रॉईस कंपनीची स्थापना झाली.
१८७७
इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.
१८३१
मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीस उपलब्ध झाले.
१८२७
टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली.
१८२०
मेन हे अमेरिकेचे २३ वे राज्य बनले.
१६८०
छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह
१५६४
मुघल सम्राट अकबर याने हिंदुंवरील जिझीया कर रद्द केला.
१४९३
भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.
१९०१
विजयपाल लालाराम तथा ‘गुरू हनुमान’ – पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक
(मृत्यू: २४ मे १९९९)
१८६०
डॉ. वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
(मृत्यू: २६ आक्टोबर १९३०)
१७६७
अँड्र्यू जॅक्सन – अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: ८ जून १८४५)
२०००
लेडी राणू मुखर्जी – विचारवंत आणि कलासमीक्षक, रविंद्रनाथ टागोर यांच्या जवळच्या सहकारी
१९९२
डॉ. राही मासूम रझा – हिन्दी व ऊर्दू कवी, गीतकार व शायर, ‘महाभारत’ या दूरदर्शनवरील अत्यंत गाजलेल्या मालिकेचे संवादलेखक
(जन्म: १ ऑगस्ट १९२७)
१९३७
व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर – रंगभूमीवरील अभिनेते व गायक
(जन्म: १० डिसेंबर १८९२)
ख्रिस्त पूर्व ४४
रोमन सिनेटमध्ये मर्कस जुनियस ब्रुटस, डेसिमस जुनियस ब्रुटस व इतर सेनेटरांनी रोमन सम्राट ज्यूलियस सीझर याची हत्या केली. Et tu, Brute? (You too, Brutus?, ब्रुटस तू सुद्धा?) हे त्याचे अखेरचे उद्गार प्रसिद्ध आहेत.
(जन्म: ख्रिस्त पूर्व १००)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
क्रांतिकारी उदयसिंह
सन १९१९ मध्ये जालियनवाला बागेत एक आमसभा सुरु होती. इंग्रज सरकारचा अधिकारी जनरल डायरने निर्दोष लोकांवर गोळीबार केला. शेकडो लोक मारले गेले आणि हजारो जखमी झाले. संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली, क्रांतिकारकामध्येही या घटनेने वातावरण ढवळून निघाले आणि संतापाचा उद्रेक होण्याची वेळ झाली. उधमसिंह नावाच्या क्रांतीकारकाने जनरल डायरचा बदला घेण्याचा विडा उचलला. उधमसिंहानी दिवस आणि वेळ ठरवून जनरल डायरवर गोळी झाडली. परंतु ते पकडले गेले. त्यांच्यावर खटला भरला गेला. न्यायाधीशांसमोर त्यांना उभे केले असता न्यायाधीशांनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्याचवेळी गर्दीतून वाट काढत एक इंग्रज तरुणी पुढे आली व तिने न्यायाधीशांकडे उधमसिंह यांना प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. त्यांनी तिला परवानगी दिली.
त्या मुलीने उधमसिंह यांना एकच प्रश्न विचारला," तुम्ही ज्यावेळेला गोळ्या झाडल्या त्यावेळी अजूनही तुमच्या पिस्तुलात तीन गोळ्या शिल्लक होत्या. मी पण इंग्रज आहे, मलाही इंग्रज या नात्याने तुम्ही का मारले नाही. तसे करून तुम्ही पळून जावू शकला असता पण तुम्ही गेला नाहीत. असे का केले याचे उत्तर द्या!" उधमसिंह यांनी त्या तरुणीला ओळखले, तिच्याकडे पाहून मंदस्मित केले व म्हणाले,"भगिनी! आम्ही भारतीय आहोत. महिलेवर हात उचलणे आमच्या संस्कृतीविरुद्ध आहे. त्यामुळे मी आपल्यावर गोळी झाडली नाही. तसे करणे आम्हा भारतीयांना शोभले नसते." हे उधमसिहांचे विचार ऐकून न्यायालय व ती तरुणी चकित झाले.
तात्पर्य- नीतिवान मनुष्य प्रतिकूल परिस्थितीतही संस्कृतीप्रमाणे आचरण करतो. नैतिकता हि संस्कारातून येते. संस्कारहीन माणसे हीन दर्जाचे वर्तन करतात.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.