A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : शनिवार
आजची दिनांक : ०२ / ०३ / २०२३
G दिनविशेष
दिनविशेष
२००१
मध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यास सुरूवात केली.
१९६९
फ्रेन्च बनावटीच्या ‘कॉन्कॉर्ड’ या पहिल्या स्वनातीत (ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्या) विमानाचे यशस्वी उड्डाण
१९७८
स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.
१९७०
ब्रिटनकडून स्वातंत्र्य घेऊन र्होडेशिया प्रजासत्ताक बनले.
१९५६
मोरोक्कोला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९५२
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री (धनबाद, झारखंड) येथील खत कारखान्याचे उद्घाटन झाले. हा भारतातील पहिला खत कारखाना आहे.
१९४६
हो ची मिन्ह यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.
१९७७
अँड्र्यू स्ट्रॉस – इंग्लिश क्रिकेटपटू
१९३१
राम शेवाळकर – मराठी साहित्यिक
(मृत्यू: ३ मे २००९)
१९३१
मिखाईल गोर्बाचेव्ह – सोविएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते
१९२५
शांता जोग – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री
(मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)
(Image Credit: Cinestaan)
१७४२
विश्वासराव – पानिपतच्या ३ र्या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव
(मृत्यू: १४ जानेवारी १७६१)
१९९४
पं. श्रीपादशास्त्री जेरे – धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न
(जन्म: ? ? ????)
१९८६
डॉ. काशिनाथ घाणेकर – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते, मराठीतील पहिले सुपरस्टार, हे शिक्षणाने दंतवैद्य (Dentist) होते. तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, रायगडाला जेव्हा जाग येते, अश्रूंची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू, गारंबीचा बापू, गुंतता हृदय हे, आनंदी गोपाळ इ. नाटके तर मराठा तितुका मेळवावा, पाठलाग, दादी माँ (हिंदी), मधुचंद्र, एकटी, प्रीत शिकवा मला, देवमाणूस, गारंबीचा बापू, अजब तुझे सरकार, झेप, घर गंगेच्या काठी, हा खेळ सावल्यांचा, चंद्र होता साक्षीला हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.
(जन्म: १४ सप्टेंबर १९३२ - चिपळूण)
(Image Credit: Wikipedia)
१९४९
सरोजिनी नायडू – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी, रौलेट कायदा, मॉन्टेग्यू - चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता.
(जन्म: १३ फेब्रुवारी १८७९)
१९३०
डेविड हर्बर्ट तथा डी. एच. लॉरेन्स – इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार
(जन्म: ११ सप्टेंबर १८८५)
(Image Credit: University of Nottingham)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
मदत
वीरगडचा राजा सूर्यप्रताप दयाळू आणि परोपकारी होता. त्याच्या राज्यातील एका गावात एकेवर्षी पाऊस पडला नाही. दुष्काळाची स्थिती निर्माण झाली. त्या गावात रामचरण नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. दुष्काळामुळे त्याच्या घरात खाण्यासाठी काहीही शिल्लक नव्हते, राजाने मदत पाठविली पण गावातील मुखियाने आपल्याच लोंकाना त्या मदतीचा लाभ दिला. जेंव्हा रामचरण मदत मागण्यासाठी गेला तेंव्हा मुखिया त्याला रागावला, आणि त्याला हाकलून दिले. रामचरणची पत्नी आणि मुलाने भुकेने तडफडून जीव टाकला. तेंव्हा रामचरणने वैराग्य स्वीकारले आणि एका साधूच्या दलासोबत तो निघून गेला. साधू दिवसभर भिक्षा मागत असत आणि रात्री मादक पदार्थ खावूनपिवून चोऱ्या करीत असत. चुकीच्या संगतीमुळे रामचरणही नकली ज्योतिषी बनून पैसा जमा करीत असे. त्याने दिवसभर फिरून लोकांविषयी माहिती गोळा करत असे व त्या माहितीचा वापर करत रात्री ज्योतिषाचा वेष धारण करून लोंकाना मूर्ख बनवीत असे.
जेंव्हा तो ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध झाला तेंव्हा राजा सूर्यप्रताप त्याला भेटण्यासाठी आला. परंतु त्याने येण्याआधी त्याची सत्यता पडताळून पाहिली, रामचरणचे खरे रूप राजाला समजले, सैनिकांनी रामचरणला पकडून राजापुढे उभे केले, राजाने त्याला या त्याच्या खोट्या वागण्याचे कारण विचारले, तेंव्हा रामचरण म्हणाला,"महाराज ! गावाच्या मुखीयाने तुमच्या पाठविलेल्या मदतीतून जर फक्त दोन भाकरी आणि पाणी जर मला दिले असते तर माझी बायको आणि मुलगा मरण्यापासून वाचले असते. तुमची मदत मिळाली नाही आणि ते दोघे भुकेने तडफडून मेले, ते दोघे जगले असते तर मी असा खोटारडेपणाने कधीच वागलो नसतो. लोकांचे ज्योतिष मी काय बघणार! मला माझे कुटुंब सांभाळता आले नाही, माझी व्यथा समजून घ्या. महाराज ! तुम्ही मदत पाठविली पण आमच्यापर्यंत ती आलीच नाही. आता तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे." त्याचे हे खरे बोलणे पाहता राजाने त्याचे गुन्हे लक्षात घेता त्याला सौम्य शिक्षा दिली व त्यानंतर त्याला त्या गावाचा मुखिया बनविले व जुन्या मुखीयाला कडक शिक्षा केली.
तात्पर्य- संकटग्रस्त व्यक्तीला योग्यवेळी पोहोचलेली मदत योग्य ते कार्य साध्य करते, अन्यथा संकटात सापडलेल्या जीवांचा जीव जाण्याची शक्यता असते. जर कुणी संकटात असेल तर आपण त्याला मदत केलीच पाहिजे.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.