A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : बुधवार
आजची दिनांक : २० / ०३ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
१९५६
ट्युनिशियाला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.
१९१७
महाडचा ‘चवदार तळे’ सत्याग्रह
१९१६
अल्बर्ट आइन्स्टाईनने सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला.
१८५४
रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली. या पक्षाला ‘ग्रँड ओल्ड पार्टी’ असेही म्हणण्यात येते.
१६०२
डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना
१९८७
कंगना राणावत – सिनेकलाकार
१९६६
अलका याज्ञिक – पार्श्वगायिका
१९२०
वसंत कानेटकर – नाटककार
(मृत्यू: ३१ जानेवारी २०००)
१९०८
सर मायकेल रेडग्रेव्ह – ब्रिटिश अभिनेता
(मृत्यू: २१ मार्च १९८५)
१८२८
हेन्रिक इब्सेन – नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी
(मृत्यू: २३ मे १९०६)
२०१५
कृष्णराव गणपतराव साबळे तथा ‘शाहीर‘ साबळे – महाराष्ट्र शाहीर. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या आपल्या कार्यकमातून लावणी, कोकेवाला (ग्रामीण भागात सारंगीसारखे वाद्य वाजवून देवादिकांची आख्याने गाणारा), बाल्यानृत्य (मुंबईत उपाहारगृहांत, धनिकांकडे, तसेच चाळींतील लोकांकडे कामाला असलेल्या कोकणी गड्यांचे–बाल्यांचे–नृत्य), कोळीनृत्य, गोंधळीनृत्य, मंगळागौर, वाघ्यामुरळी, वासुदेव, धनगर इत्यादींचे जिवंत दर्शन ते घडवत असत. या कार्यक्रमाला अफाट लोकप्रियता मिळाली होती
(जन्म: ३ सप्टेंबर १९२३)
(Image Credit: मराठी विश्वकोश)
१९५६
बा. सी. मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे प्रणेते
(जन्म: १ डिसेंबर १९०९)
१९२५
लॉर्ड कर्झन – ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय
(जन्म: ११ जानेवारी १८५९)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
ईश्र्वरचंद्र विद्यासागर
पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या अंतकरणात प्रत्येक प्राणीमात्राबद्दल असलेली करुणा पाहून लोक त्यांना 'विद्यासागर' च्या ऐवजी करुणा सागर असे म्हणत असत. असहाय्य प्राणीमात्रावर त्यांची करुणा आणि कर्तव्यपरायणता बघण्यासारखी होती. त्यांच्या आयुष्यात ते कोलकत्ताच्या जवळ असणाऱ्या एका छोट्याशा भागात प्राध्यापक पदावर नियुक्त होते. एके दिवशी संध्याकाळी पावसाने सुरुवात केली. पाऊस पडायला लागला तसे वातावरणही थंड होवू लागले. ईश्वरचंद्र विद्यासागर हे आपल्या कामात व्यस्त होते. ते त्यांच्या अभ्यासात मग्न असतानाच अचानक त्यांच्या दारावर कोणीतरी थाप टाकली. पंडितजी उठले व दरवाजा उघडला तर एक अनोळखी माणूस दारात भिजलेला त्यांनी पाहिला. त्यांनी त्या माणसाला घरात घेतले. अंग पुसण्यासाठी कपडे व आपले स्वतःचे नवीन कपडे त्याला घालण्यासाठी दिले. तो अनोळखी पाहुणा या अचानक झालेल्या स्वागताने अचंबित झाला आणि त्याचा त्या प्रेमाने कंठ दाटून आला. तो पाहुणा म्हणाला," मी या भागात नवीन आहे. मी माझ्या मित्राकडे पाहुणा म्हणून आलो होतो पण त्याच्या घरापाशी गेलो तर तिथे चौकशी केल्यावर मला समजले कि तो गावाला गेला आहे. आता या पावसाच्या रात्री मी खूप जणांकडे आसरा मागितला पण कुणीच मला आसरा दिला नाही.
सगळ्यांनी मला हाकलून दिले. तुम्ही पहिली अशी व्यक्ती आहात ज्यांनी मला आसरा दिला आणि मला इतके आदरातिथ्य केले. यावर ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणाले,"अरे मित्र! तुम्ही तर माझे अतिथी आहात. आणि आपल्या शास्त्रात तर अतिथीला देव मानले आहे. मी तर फक्त माझे कर्तव्य केले आहे." हे म्हणत असतानाच त्यांनी त्याच्यासाठी गरम कपडे, अन्न आणि झोपायची व्यवस्था करायला सुरुवात केली. पाहुण्याने गरम जेवण केले व झोपी गेला. सकाळी जेंव्हा तो परत निघाला तेंव्हा ईश्वरचंद्र विद्यासागर त्याला म्हणाले," अतिथी देवा ! झोप कशी झाली?" त्यावेळी त्या पाहुण्याने त्यांना मनोमन नमस्कार करत तो म्हणाला," खरे देव तर तुम्ही आहात, ज्याने संकटकाळात माझ्यासारख्या अनोळखी माणसाला घरात घेवून त्याचे एखाद्या जवळच्या माणसाप्रमाणे बडदास्त ठेवली. अशी देवमाणसे आज दुर्मिळ होत चालली आहेत. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी हे तुमच्यासोबत घालविलेले क्षण कधीच विसरणार नाही."
तात्पर्य- आपल्या हातून एखाद्या प्राणिमात्राला जर काही मदत करता येत असेल तर ते करणे आपले कर्तव्य ठरते.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.