A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : बुधवार
आजची दिनांक : २७ / ०३ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२०००
चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे ‘राष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर
१९९२
पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘तानसेन पुरस्कार’ प्रदान
१९७७
तेनेरिफ द्वीपावरील लॉस रोडिओस विमानतळाच्या धावपट्टीवर पॅन अॅम फ्लाईट १७३६ आणि के. एल. एम. फ्लाईट ४८०५ या दोन बोईंग ७४७ प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन ५८३ जण ठार झाले. विमान-वाहतूकीच्या इतिहासातील ही सगळ्यात भीषण दुर्घटना आहे. खराब हवामान व के. एल. एम. पायलटच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडली.
१९६६
२० मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत ‘पिकल्स’ नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर हा चषक १९८३ मधे पुन्हा चोरीला गेला, तो आजतागायत सापडलेला नाही.
१९५८
निकीता क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.
१८५४
क्रिमियन युद्ध – इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
१९०१
कार्ल बार्क्स – सुमारे तीन दशके ‘डोनाल्ड डक’ची रुपरेखा चितारुन त्याला जगभर प्रचंड लोकप्रियता मिळवून देणारे हास्यचित्रकार
(मृत्यू: २५ ऑगस्ट २०००)
१८४५
विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: १० फेब्रुवारी १९२३)
१७८५
लुई (सतरावा) – फ्रान्सचा राजा
(मृत्यू: ८ जून १७९५)
२०१८
डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे – आंबेडकरवादी साहित्यिक व समीक्षक
(जन्म: २८ जून १९३७ - नागपूर)
२०००
हिन्दी चित्रपट अभिनेत्री वेरा सुंदर सिंग तथा ‘प्रिया राजवंश’ यांची चेतन आनंद यांच्या मुंबईतील रुईया पार्क येथील बंगल्यात हत्या करण्यात आली. त्यांचे हसते जखम, हिन्दूस्तान की कसम, हीर रांझा, हकीकत हे चित्रपट प्रसिद्ध होते.
(जन्म: ३० डिसेंबर १९३६ - शिमला, हिमाचल प्रदेश)
१९९७
भार्गवराम आचरेकर – संगीत नाटकातील अभिनेते व गायक
(जन्म: ? ? ????)
१९९२
प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले – साहित्यिक, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य
(जन्म: ? ? ????)
१९६८
युरी गागारीन – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर
(जन्म: ९ मार्च १९३४)
१९६७
जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की – नोबेल पारितोषिक (१९५९) विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ, ‘इलेक्ट्रो केमिकल अॅनॅलेसिस’मधे केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले.
(जन्म: २० डिसेंबर १८९०)
१९५२
काइचिरो टोयोडा – टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक
(जन्म: ११ जून १८९४)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
चंडकौशिक
एक तपस्वी जंगलात आपल्या शिष्यांना शिक्षण देत होता. परंतु तो अत्यंत क्रोधी स्वभावाचा होता. एकेदिवशी तो रागाने आपल्या शिष्याला मारायला धावला मात्र तो मार्गात असलेल्या एका खांबाला धडकला आणि त्याचा मृत्यू झाला. मृत्युनंतर तो आपल्या तपोबलाच्या जोरावर पुन्हा जिवंत झाला. त्याचे नाव होते चंडकौशिक. त्याच्या आश्रमाच्या बगिच्यात फूल तोडण्यासाठी काही लोक घुसले होते. चंडकौशिकला हे समजले तेव्हा तो तात्काळ तेथे गेला. त्याला पाहताच लोक पळून गेले. चंडकौशिकला प्रचंड राग आला होता. तो कु-हाड घेऊन त्यांना मारायला धावला मात्र रागाच्या आवेशात येऊन विहीरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला. प्रचंड रागाच्या काळात मृत्यु होण्याच्या
कारणांमुळे तो पुढच्या जन्मात तो भयानक विषारी साप बनला. भीतीपोटी लोकांनी तो ज्या वनात आहे तेथे जाणेच सोडून दिले. एकदा भगवान महावीर त्या जंगलात आले.
लोकांनी त्यांना त्या वनात न जाण्याची विनंती केली. परंतु ते निर्भिडपणे गेले. महावीरांना पाहताच सापाने फुत्कारणे सुरु केले. परंतु महावीर त्याच्या बिळापाशी उभे राहिले. क्षमा आणि क्रोधाचा संघर्ष सुरु झाला. सापाने महावीरांच्या पायाचा कडाडून चावा घेतला. तर तेथून दुधाची धार सुरु झाली. साप हरला. तेव्हा महावीरांनी त्याला समजावले, ‘’ मित्रा, आता जरा जागा हो. जरा विचार कर, प्रत्येक जन्मात तू क्रोधाने इतरांना त्रास दिला आणि त्याबरोबरच स्वत:चेही नुकसान करून घेतले. क्रोधाने तुला काहीच मिळाले नाही उलट तू जे काही पुण्याईने मिळवले होते ते सोडून तुला पुन्हा जन्म घ्यावा लागला. क्रोधाने कमाविता येत नाही तर गमाविले जाते.’’ चंडकौशिक या बोलण्याने भारावून गेला आणि त्याने महावीरांची क्षमा मागितली. त्या दिवसापासून त्याच्या वृत्तीत फरक पडला.
तात्पर्य- क्रोध ही तामसी वृत्ती आहे तर जीवनाचा आनंद सात्विकतेत आहे. रागाचा त्याग करणे हे मानवी जीवनाचे भूषण आहे.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.