A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : सोमवार
आजची दिनांक : ०४ / ०३ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००१
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण
१९९६
चित्रकार रवी परांजपे यांना ‘कॅग हॉल ऑफ फेम’ हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर
१९८०
प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकून रॉबर्ट मुगाबे हे झिम्बाब्वेचे पहिले कृष्ण्वर्णीय पंतप्रधान बनले.
१९६१
१९४६ मधे इंग्लंडमधे बनवलेली युद्धनौका भारतीय सैन्यदलात दाखल झाली व तिचे ‘आय. एन. एस. विक्रांत’ असे नामकरण करण्यात आले. ही भारतीय आरमारात दाखल झालेली पहिली विमानवाहू नौका होती.
१९५१
नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले. या खेळांत ११ देशांतील ४८९ महिला व पुरुष स्पर्धकांचा सहभाग होता.
१९३८
सौदी अरेबियात प्रथमच खनिज तेल सापडले.
१९२२
दीना पाठक – अभिनेत्री, आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी १३० हुन अधिक चित्रपटांत भूमिका केल्या.
(मृत्यू: ११ आक्टोबर २००२ - मुंबई)
(Image Credit: Film History Pics)
२०१६
पी. ए. संगमा – ११ व्या लोकसभेचे सभापती (कार्यकाल: २३ मे १९९६ ते २३ मार्च १९९८) आणि मेघालयचे ४ थे मुख्यमंत्री (कार्यकाल: ६ फेब्रुवारी १९८८ ते २५ मार्च १९९०), प्राध्यापक, वकील, पत्रकार
(जन्म: १ सप्टेंबर १९४७)
(Image Credit: One India)
२०११
अर्जुन सिंग – केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, ३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल
(जन्म: ५ नोव्हेंबर १९३०)
२०००
गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य
(जन्म: ८ जानेवारी १९२४)
१९९९
विठ्ठल गोविंद गाडगीळ – ‘एअर इंडिया’चे पहिले कर्मचारी, भारतीय विमानोड्डाणाचा पाया घालणारे
(जन्म: ? ? ????)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
आत्म्याचा संवाद
एकदा अकबर आणि बिरबल यांच्यात बोलणे चालू होते. बोलता बोलता बिरबल म्हणून गेला,"बादशहा! आपण जसे एकमेकांशी बोलतो तसेच आपले आत्मे एकमेकांशी बोलतात." हे ऐकून अकबर लगेच म्हणाला,"असे बोलणे तुला शोभत नाही, एकतर हे सिद्ध कर नाही तर शिक्षेला तयार हो." बिरबलाने आपले बोलणे सिद्ध करून दाखविण्याची तयारी केली. बिरबल व अकबर लगेचच वेषांतर करून ग्रामीण पोशाखात बाहेर पडले. बिरबल मालक तर अकबर बादशहा त्याचा नोकर झाला होता. काही अंतर गेल्यावर त्यांना एक जंगल लागले, समोरच एक लाकुडतोड्या झाडे तोडत होता. त्याला पाहताच बिरबलाने अकबराला विचारले,"हुजूर! या लाकुडतोड्याबद्दल आपले काय मत आहे?" बादशहा म्हणाला, "अरे याला आताच्या आता मारून टाकावेसे वाटत आहे. तुला दिसत नाही का तो फळा फुलांनी बहरलेले हिरवेगार झाड तोडत आहे ते?" बिरबलाने म्हंटले,"आपण त्याच्याजवळ जाऊ" ते त्याच्याजवळ गेले आणि बिरबल लाकूडतोड्याला म्हणाला,"भाऊ! तू हे हिरवेगार झाड का तोडत आहे?" लाकुडतोड्या म्हणाला,"मित्रा ! अरे माझे उदरनिर्वाहासाठी हि झाडे लागतात.राजधानीकडून आलेले दिसताय काय नवीन बातमी?" बिरबल म्हणतो,"अरे अकबर बादशहा या जगात राहिले नाहीत" लाकुडतोड्या म्हणतो," बरे झाले गेला तो अकबर ! बदमाश होता !" या उत्तराने अकबर हैराण झाला पण त्याने नोकराचा वेश घेतल्या कारणाने त्याला काही बोलता येईना.
बिरबलाने त्याला पुढे चालण्यास सांगितले. दोघे पुढे गेले तर काही अंतराने एक वृद्ध महिला बकऱ्या चारताना दिसली, बिरबलाने परत अकबराला विचारले,"या महिलेबद्दल तुमचे मत काय?" अकबर म्हणाला,"या म्हाताऱ्या वयात सुद्धा ती बकऱ्या चारत उन्हातान्हात फिरत आहे म्हणजे ती तिच्या कुटुंबासाठी खूप कष्ट घेत आहे." बिरबल काहीच न बोलता वृद्धेकडे अकबराला घेवून गेला. त्याने वृद्धेला विचारले,"आजी तुम्ही या वयात बकऱ्या का चारत आहात?" वृद्ध महिला म्हणाली,"माझ्या कुटुंबाचे पोट या बकऱ्यांवर चालते." त्यानंतर बिरबलाने तिलाही अकबराच्या मृत्यूची बातमी सांगितली, त्याबरोबर वृद्धा मोठ्यामोठ्याने रडू लागली. हे पाहून दोघेही तिथून पुढे गेले. मग बिरबल अकबराला म्हणाला,हुजूर, तुम्ही लाकुद्तोड्याबद्दल गैर शब्द वापरले त्यानेही तसेच शब्द तुमच्याबद्दल वापरले, याउलट वृद्धेच्या बाबतीत तुम्ही चांगले बोलला तिने तुमच्या खोट्या मृत्यूवर खरे दुःख व्यक्त केले. म्हणजेच आपल्याला हे मान्य करावेच लागेल कि तुमच्या आत्म्याने जे विचार प्रकाशित केले त्याचे प्रत्युत्तर समोरच्या अत्म्याकडून मिळाले, खरय ना !" अकबर हसला.
तात्पर्य- सदभावनेतून सदभावना वाढीस लागते. वाईटातून वाईट घडते, त्यामुळे सर्वांसाठी चांगला विचार करा, चांगलेच प्रत्युत्तर मिळेल.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.