A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : मंगळवार
आजची दिनांक : ०५ / ०३ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२०००
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कर्नाटकातील कैगा अणूवीजप्रकल्प (युनिट - २) राष्ट्राला अर्पण
१९९९
‘इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणार्या आर. डी. बिर्ला स्मृती पारितोषिकासाठी डॉ. जयंत नारळीकर व प्रा. अशोक सेन यांची निवड
१९९८
नेहमीच्या अस्त्रांबरोबरच कमी पल्ल्याची विमानभेदी क्षेपणास्त्रे सोडू शकणार्या, रशियाकडुन घेतलेल्या ‘सिंधुरक्षक’ या पाणबुडीचे मुंबई येथे आगमन
१९९७
ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असणार्या टपाल तिकिटाचे प्रकाशन
१९६६
मैसूरचे माजी संस्थानिक जयचामराजेन्द्र वडियार यांचा बंगळूर येथील राजवाडा व त्यासभोवतालची जागा राज्य सरकारच्या ताब्यात घेण्याची परवानगी देणारे विधेयक कर्नाटक विधानसभेत संमत
१९३३
भयानक मंदीमुळे आदल्या दिवशीच कार्यभार सांभाळलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.
१९३१
दुसर्या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.
१६६६
छत्रपती शिवाजीमहाराजांनी राजगडावरून आग्र्यास प्रयाण केले.
१९१६
बिजू पटनायक – ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री
(मृत्यू: १७ एप्रिल १९९७)
१९१३
गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका
(मृत्यू: २१ जुलै २००९)
१९१०
श्रीपाद वामन काळे – अर्थतज्ञ व लेखक, मराठी भाषेतील पहिल्या अर्थविषयक नियतकालिकाचे संपादक. ‘तुमचे स्थान कोणते’, ‘कौटुंबिक हितगुज’, ‘दाणे आणि खडे’, ‘नवी घडी नवे जीवन’, ‘नव्या जीवनाची छानदार घडी’ इत्यादि पुस्तकाचे लेखन त्यांनी केले.
(मृत्यू: २६ मे २०००)
१९०८
सर रेक्स हॅरिसन – ब्रिटिश तसेच अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते. त्यांनी ‘शालीमार’ या एका हिंदी चित्रपटातही भूमिका केली होती.
(मृत्यू: २ जून १९९०)
१८९८
चाऊ एन लाय – चीनचे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: ८ जानेवारी १९७६)
१५१२
गेरहार्ट मरकेटर – नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ
(मृत्यू: २ डिसेंबर १५९४)
२०१३
ह्युगो चावेझ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: २८ जुलै १९५४)
१९९५
जलाल आगा – चरित्र अभिनेता
(जन्म: ११ जुलै १९४५)
१९८९
बाबा पृथ्वीसिंह आज़ाद – क्रान्तिकारी स्वातंत्र्यसैनिक, गदर पार्टीचे एक संस्थापक
(जन्म: ? ? ????)
१९८५
डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे – ‘महाराष्ट्र संस्कृती’कार
(जन्म: १० जून १९८५)
१९६८
नारायण गोविंद चाफेकर – भाषातज्ज्ञ, संशोधक, लेखक, समीक्षक, समाजशास्त्रज्ञ, ग्रंथकार व कोशकार
(जन्म: ५ ऑगस्ट १८६९)
१९६६
शंकरराव शांताराम मोरे – समाजवादी व साम्यवादी विचाराचे व्यासंगी नेते, पुणे जिल्हा स्कूल बोर्डाचे अध्यक्ष, तिसऱ्या लोकसभेतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार (पुणे मतदारसंघ)
(जन्म: ? ? ????)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
विनियोग
एका गावात एक श्रीमंत माणूस राहत होता. रात्रंदिवस तो या धनाची वाढ कशी होईल याचा विचार करीत असे. आपल्या या अपार संपत्तीची माहिती लोकांना तर होणार नाही याची त्याला काळजी व भीती वाटत असे. या हेतूने तो संत रोहीदासांकडे गेला आणि म्हणाला,"महाराज! आपण परमज्ञानी आहात. कृपया मला संपत्ती वाढविण्याचे रहस्य सांगा." संत रोहीदासानी त्याला शेंगाचे बी देत म्हणाले,"हे चमत्कारी बीज तू आपल्या घराच्या अंगणात लाव. तुझ्या धनाची वृद्धी निश्चित होईल." त्या श्रीमंताने प्रसन्न होवून ते बी आपल्या घराच्या अंगणात लावले. दोन तीन महिन्यात ते बी वेलीच्या रुपात सर्वत्र पसरले. आणि त्याला शेंगाचा बहर आला.
मात्र त्याच्या संपत्तीत काही वाढ झाली नाही. तो परत रोहीदासांकडे जाऊन म्हणाला,"महाराज बी उगवले, वेल सर्वत्र पसरली, शेंगाचा बहर हि सुंदरपणे सुरु झाला पण माझ्या संपत्तीत तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही वाढ झाली नाही." तेंव्हा संत म्हणाले,"अरे भाऊ! मी तुला ते बी भाजून खायला सांगितले असते आणि त्याने तुझे पोट भरेल असा दावा केला असता तर ते अशक्य होते. पण तू त्याचा योग्य वापर केला आहेस. आता ते एकटे बी तुझ्या एकट्याचे पोट न भरता अनेकांचे पोट भरेल इतके बी त्याने त्याने तयार केले आहे. अनेक लोक त्याची भाजी बनवून खातील अशाप्रकारे तुझ्या जवळची संपत्ती तू अशी गुंतव कि त्यात वृद्धी होईल. तिजोरीत ठेवण्याने संपत्ती कधीच वाढणार नाही. उलट चोरापासून तुला भीती वाटेल संपत्तीचा योग्य प्रकारे विनियोग होणे गरजेचे आहे असे मला वाटते." श्रीमंताला योग्य मार्गदर्शन मिळाले व त्याप्रमाणे तो आयुष्यभर जगला.
तात्पर्य-संपत्तीचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास त्यात वाढ होते. कष्टाने वाढविल्यास वाढते, आळसाने त्यात वाढ होत नाही.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.