A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : बुधवार
आजची दिनांक : ०६ / ०३ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२०००
शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्कम करपात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब
१९९९
जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर समुहाच्या सहस्राब्दी सोहळ्याचे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते उद्घाटन
१९९८
विख्यात गझलगायक जगजितसिंग यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर
१९९७
स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड
(Image Credit: Templeton Prize)
१९९२
‘मायकेल अँजेलो’ नावाचा संगणक विषाणू (Computer Virus) पसरण्यास सुरूवात झाली.
१९७५
इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.
१९५३
जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.
१९६५
देवकी पंडीत – गायिका
१९४९
शौकत अजिझ – पाकिस्तानी राजकारणी
१४७५
मायकेल अँजेलो – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार
(मृत्यू: १८ फेब्रुवारी १५६४)
२०००
>नारायण काशिनाथ लेले – कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती
(जन्म: ? ? ????)
१९९९
सतीश वागळे – हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते
(जन्म: ? ? ????)
१९९२
रणजित देसाई – नामवंत मराठी साहित्यिक, ‘स्वामी’कार
(जन्म: ८ एप्रिल १९२८)
१९८२
रामभाऊ म्हाळगी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार, तसेच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष
(जन्म: ९ जुलै १९२१)
१९८२
अॅन रँड – जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या
(जन्म: २ फेब्रुवारी १९०५)
१९८१
गो. रा. परांजपे – मराठीतील आघाडीचे विज्ञान प्रसारक, नामवंत शास्त्रज्ञ, ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे पहिले भारतीय प्राचार्य
(जन्म: ? ? ????)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
कु-हाड आणि दांडा
एकदा कु-हाड आणि लाकडाचा दांडा यांच्यामध्ये वादविवाद सुरु झाला. दोघेही स्वत:ला अतिशय शक्तिशाली असल्याचे सांगत होते लाकडाचा दांडा नंतर शांत झाला. मात्र कु-हाडीची बडबड मात्र अखंडपणे चालूच होती. कु-हाडीला प्रचंड अहंकार होता.ती रागाच्या भरात काय वाटेल ते बोलत सुटली होती,"अरे लाकडाच्या दांडक्या ! तू स्वत:ला काय समजतोस? तुझी शक्ती माझ्यापुढे पाणी भरते, मी ठरवले तर मोठमोठे वृक्ष मी सहज कापून काढते, तुझ्यासारख्या दांड्याने माझ्याशी वैर घेणे चांगले नाही. तू माझी बरोबरी करू नको." लाकडाचा दांडा कु-हाडीचे अहंकारी सुरातील बोलणे मन लावून ऐकत होता. काही काळ बडबड केल्यावर कु-हाड शांत झाली मग लाकडाचा दांडा बोलू लागला,"तू जे म्हणते आहेस ते सर्व खरे आहे. तू झाडे तोडू शकतेस, तुझी शक्ती माझ्यापेक्षा जास्त आहे.
हे सगळे खरे आहे पण तू एका गोष्टीकडे लक्ष दिले नाहीस ते म्हणजे तू वरीलपैकी कोणतेच काम एकट्याने करू शकत नाहीस. तुला प्रत्येक गोष्टीत माझ्या सहकार्याची गरज हि लागतेच. तू कोणतेच काम एकटीच्या जीवावर कधीच करू शकणार नाही हे तुला माहित असतानासुद्धा तू नको त्या शक्तीचा गर्व बाळगून आहेस. तेंव्हा स्वत:ला यापासून वेळीच सावर अन्यथा तुला कुणी किंमत देणार नाही." कु-हाडीला तिची चूक समजली व तिने दांड्याची माफी मागितली.
तात्पर्य- सहकार्य भावना महत्वाची असते. अहंकारातून सहकार्य भावनेला जर तडा गेला तर काम करता येणे अशक्य आहे. परस्परसंबधी आदरभाव ठेवणे गरजेचे आहे.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.