A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : बुधवार
आजची दिनांक : ०८ / ०३ / २०२३
G दिनविशेष
दिनविशेष
१९९३
दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतुक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला ‘स्पिरीट ऑफ जे. आर. डी.’ असे नाव देण्याचे ठरविले.
१९५७
घानाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९४८
फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.
१९४२
दुसरे महायुद्ध – जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली.
१९११
आंतरराष्ट्रीय महिला दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
१९७४
फरदीन खान – हिन्दी चित्रपट कलाकार
१९३१
मनोहारी सिंग – पट्टीचे सॅक्सोफोन वादक
(मृत्यू: १३ जुलै २०१०)
(Image Credit: Rewind)
१९३०
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ ‘आरती प्रभू’ – साहित्यिक
(मृत्यू: २६ एप्रिल १९७६)
१९२१
अब्दूल हयी ऊर्फ ‘साहिर लुधियानवी’ – शायर व गीतकार
(मृत्यू: २५ आक्टोबर १९८०)
१८७९
ऑटो हान – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन शात्रज्ञ
(मृत्यू: २८ जुलै १९६८)
१८६४
हरी नारायण आपटे – कादंबरीकार
(मृत्यू: ३ मार्च १९१९)
१९५७
बाळ गंगाधर तथा ‘बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त
(जन्म: २४ ऑगस्ट १८८८)
१९४२
जोस रॉल कॅपाब्लांका – क्यूबाचा बुद्धीबळपटू
(जन्म: १९ नोव्हेंबर १८८८)
१७०२
विल्यम (तिसरा) – इंग्लंडचा राजा
(जन्म: १४ नोव्हेंबर १६५०)
H पंचांग
पंचांग
आजचा वार : बुधवार
आजची दिनांक : ०८ / ०३ / २०२३
तिथी : कृ.प्रतिपदा
नक्षत्र : उ.फाल्गुनी
योग : शूल
करण : बालव
चंद्रराशी : कन्या
सूर्योदय : सकाळी ०६ वाजून ५५ मिनिटांनी झाला.
सूर्यास्त : सायंकाळी ०६ वाजून ४४ मिनिटांनी होईल.
I बोधकथा
बोधकथा
सर्वधर्मसमभाव
एकदा अकबर आणि बिरबल वेषांतर करून राज्यात फेरफटका मारण्यास निघाले, रात्रभर संपूर्ण नगरात भ्रमण करता करता कधी सकाळ झाली ते कळलेच नाही. रात्रभर फिरून दोघेही खूप थकले होते. कोठेतरी विश्रांती घेण्यासाठी ठिकाण बघत होते. तेवढ्यात एका साधूचा आश्रम त्यांच्या नजरेस पडला. थोडावेळ विश्रांती घेण्यासाठी ते आश्रमातील अंगणात असणाऱ्या एका मोठ्या झाडाखाली बसले. काही काळ विश्रांती घेतल्यावर अचानक बिरबलाचे लक्ष साधूच्या घरासमोरील तुळशी वृन्दावनाकडे गेले. ते पाहताच बिरबल झटकन उठला व तुळशी वृन्दावनाकडे गेला.तिथे जावून त्याने तुळशीला नमस्कार केला व प्रदक्षिणा घातल्या. हे अकबर बादशाहाने पाहिले आणि त्याला बिरबलाची चेष्टा करण्याची इच्छा झाली. अकबराने विचारले,"बिरबल! या छोट्याशा रोपट्याला तू नमस्कार काय करतो? त्याला प्रदक्षिणा काय घालतो? काहीतरीच तुझे असते बघ" बिरबल म्हणाला,"महाराज धर्मात तुळशीच्या रोपट्याला मातेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे आम्ही तिला नमस्कार करतो, प्रदक्षिणा करतो. आमच्या श्रीविष्णू देवाला हि प्रिय आहे. म्हणून ती आम्हाला पूज्य आहे. तुम्हीसुद्धा जर सर्वधर्मसमभाव मानत असाल तर तुम्ही पण तुळशीला वंदन करावे अशी माझी इच्छा आहे." पण बादशहाच्या डोक्यात बिरबलाची अजून कशी चेष्टा करता येईल याचा विचार चालू असल्याने त्याने बिरबलाच्या बोलण्याकडे कमी लक्ष दिले व अकबराने उठून चालायला सुरुवात केली. आपल्या छोट्याशा मागण्यासुद्धा बादशहा पूर्ण करत नाही याचे बिरबलाला वाईट वाटले.त्यामुळे बिरबल काहीच न बोलता बादशहाच्या मागे चालू लागला. बिरबल इतका शांतपणे चालताना पाहून बादशहाच्या मनात विचार आले कि याच्या धर्मावर, त्यातील परंपरावर अशी चेष्टा आपण करायला नको होती. म्हणून त्याने इतर विषय काढले पण बिरबल हुंकार भरत चालत होता.बिरबलाने विचार केला कि आता संधी मिळताच बादशाहाला धर्माच्या बाबतीत धडा शिकवायचा.
पुढे जाताच अशी एक संधी त्याला लगेच चालून आली. बिरबलाला एक जंगली वनस्पतिचे एक मोठे झुडूप दिसले. बादशाहाला थांबायला सांगून त्याने तुळशीप्रमाणेच सगळे उपचार केले पण अजून एक नवीन गोष्ट केली.ती म्हणजे, त्या झुडपाला मिठी मारण्याचा व त्याची पाने अंगाला चोळण्याचा खोटा अभिनय त्याने केला. हे बादशाहाला कळले नाही. झुडपाला नमस्कार करणे, प्रदक्षिणा करणे, मिठी मारणे आणि त्याची पाने अंगाला चोळणे ह्या क्रिया बादशाहाला हसू आणत होत्या पण त्याने केले नाही. अकबर गप्प राहिलेला पाहून बिरबल म्हणाला,"तुळस हि जशी आमची माता तसे हे जंगली झुडूप म्हणजे आमच्या धर्मानुसार आमचे पिता समान आहेत." अकबर म्हणाला,"वा रे बिरबल! तुळशीला माता म्हणता आणि फक्त नमस्कार,जंगली झुडपाला मात्र आलिंगन देता." बिरबल म्हणाला,"महाराज आई हि देविस्वरूप मानली आहे. तर पित्याला देवत्व दिले आहे. देवाला भेटण्याचा आनंद तुम्हाला काय कळणार म्हणा? तुम्ही लांबूनच नुसत्या चौकशा करता आहात. भेटायचे असेल तर माझ्या पित्याला भेटा त्यांची पाने अंगावर चोळून घ्या." बादशाहाला वाटले कि आपण सारखेच जर याची चेष्टा करीत राहिलो तर हा दरबारात आपण सर्वधर्मसमभाव पाळत नसल्याचे सांगेल आणि आपली त्यामुळे नाचक्की होईल. त्यापेक्षा आपण त्याचे म्हणणे ऐकू." बिरबलाने जे केले तेच बादशाहने केले नमस्कार केला, प्रदक्षिणा केली आणि नको ते केले ते म्हणजे त्या जंगली वनस्पतीला मिठी मारून त्याची पाने अंगावर चोळली, बिरबलाने फक्त नाटक केले होते पण बादशाहने पाने अंगाला चोळताच त्याच्या अंगाला प्रचंड खाज सुटली, आग होऊ लागली. अकबर जोरात बिरबलाला ओरडला,"अरे असले कसले पित्यासमान झुडूप ! माझ्या अंगाची त्याने आग केली. तुला मात्र काहीच केले नाही." बिरबल म्हणाला,"महाराज तुम्ही तुळशी मातेला वंदन केले नाही याचा आमच्या पित्याला राग आलेला दिसतोय. म्हणून त्याने मला काही केले नाही पण तुम्हाला मात्र ते त्रास देत आहे." अकबर मनातून काय समजायचे ते समजला. बिरबलाने अकबराला सर्वधर्मसमभावतेची चांगली अद्दल घडवली.
तात्पर्य- कोणत्याच धर्माची, त्यातील परंपरेची नकळतही थट्टा करू नये. कोणी करत असेल तर त्याला ते न करण्यास सांगावे. सगळे धर्म हे देवाला सारखेच.!
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.