A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : शनिवार
आजची दिनांक : ०९ / ०३ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
१९९२
कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्चन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला ‘सरस्वती पुरस्कार’ उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.
१९९१
युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड निदर्शने
१९५९
‘बार्बी’ या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.
१९४५
दुसरे महायुद्ध – अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
१९५६
शशी थरूर – केन्द्रीय मंत्री, लेखक व मुत्सदी
१९५१
उस्ताद झाकिर हुसेन – पंजाब घराण्याचे जगप्रसिद्ध तबलावादक
१९४३
रॉबर्ट जेम्स ऊर्फ ‘बॉबी’ फिशर – अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर
(मृत्यू: १७ जानेवारी २००८)
१९३४
युरी गागारीन – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर
(मृत्यू: २७ मार्च १९६८)
१९३०
सोली जहांगीर सोराबजी – ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया (७ एप्रिल १९९८ ते ४ जून २००४), सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया (१९७७ ते १९८०), पद्मविभूषण (२००२), ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ चे अध्यक्ष
(मृत्यू: ३० एप्रिल २०२१ - नवी दिल्ली)
(Image Credit: Financial Express)
१९१७
ओम प्रकाश भंडारी उर्फ क़मर जलालाबादी – गीतकार व कवी
(मृत्यू: ९ जानेवारी २००३ - मुंबई )
१८९९
‘राजकवी’ यशवंत दिनकर पेंढारकर – रविकिरण मंडळातील एक कवी, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्यांना ‘महाराष्ट्र कवी’ म्हणून गौरविण्यात आले.
(मृत्यू: २६ नोव्हेंबर १९८५)
२०१७
विश्वनाथ भालचंद्र तथा वि. भा. देशपांडे – नाट्यसमीक्षक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी. त्यांचे बहुतांशी लिखाण मराठी नाट्यसृष्टीबद्दल आहे. त्यांनी मराठी नाट्यकोश या जवळजवळ १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी कोशवाङ्मयात एक मोलाची भर टाकली आहे. वि.भा. देशपांडे यांची इ.स. २०१५ सालापर्यंत जवळपास ५१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पैकी नाट्यविषयक लेखनाची एकूण २५ पुस्तके आहेत. ‘नाटकातली माणसं’, ‘गाजलेल्या भूमिका’, ‘नाटक नावाचं बेट’, ‘निळू फुले’, ‘नाट्यभ्रमणगाथा’, ‘निवडक नाट्यप्रवेश’, ‘वारसा रंगभूमीचा’, ‘आचार्य अत्रे: प्रतिभा आणि प्रतिमा’ ही त्यांनी लिहिलेली काही प्रसिद्ध पुस्तके आहेत.
(मृत्यू: ३१ मे १९३८)
(Image Credit: नवा काळ)
२०१२
जॉय मुकर्जी – चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक
(जन्म: २४ फेब्रुवारी १९३९)
२०००
उषा मराठे - खेर ऊर्फ ‘उषा किरण’ – शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर भूमिका साकारलेली अभिनेत्री, मुंबईच्या नगरपाल (Sheriff)
(जन्म: २२ एप्रिल १९२९)
(Image Credit: Word Disk)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
लालसा
एका गावात चोर चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता. इकडे तिकडे फिरत असता गावकऱ्यांनी त्याला पकडला आणि झाडाला बांधून घातले. मग गावकरी विचार करू लागले याला काय शिक्षा द्यावी का गावातील मुख्य माणसाला विचारावे? या विचारातून असे ठरले कि मुख्य माणसाला बोलावून आणायचे आणि चोराला शिक्षा करायची. सगळे गावकरी त्या चोराला एकटे त्या झाडाला बांधून मुख्य माणसाला बोलावण्यास गेले. काही वेळ गेल्यावर त्या रस्त्याने एक मेंढपाळ जात होता, त्याने त्या चोराला झाडाला बांधलेले पाहिले, त्याला उत्सुकता वाटली त्याने त्या चोराला विचारले,"तू कोण आहेस? तुला असे कोणी बांधून ठेवले आहे? तू काय गुन्हा केला आहेस?" चोराने विचार केला हि सुटायची चांगली संधी चालून आली आहे. चोर म्हणाला, "अरे काय सांगू मित्रा ! मी आहे एक फकीर ! इथे काही चोर आले होते. लोकांची लुट करून ते धन मिळवतात आणि त्याचे पाप लागायला नको म्हणून त्यातील काही धन दान करतात.गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना कुणी फकीर दानासाठी गाठ पडला नव्हता.
ते धन घ्या म्हणत होते पण कुणी त्यांचे धन घेतच नव्हते. अशातच त्यांनी त्यांनी मला दान घ्यावे म्हंटले पण मी नकार देताच त्यांनी मला मारहाण केली व या झाडाला बांधून ठेवले आहे व ते परत येथे येवून मला धनदान करूनच मग पुढे जाणार आहेत." हे ऐकताच मेंढपाळाच्या मनात धनाच्या बाबतीत लोभ निर्माण झाला. तो चोराला म्हणाला,"भाऊ! तू फकीर ! तुला धनाचा काय फायदा! तू ते घेणारही नाहीस, त्यापेक्षा आता अंधाराची वेळ झाली आहे तू त्याचा फायदा घे आणि पळून जा. तुझ्या जागेवर मला बांधून ठेव. अंधार असल्याने ते तू समजून मला धन देतील आणि माझी गरिबीपण हटेल." चोराने तसेच केले. आपल्या जागी मेंढपाळाला बांधून तो पळून गेला. तिकडे गावकरी मुख्य माणसाकडून चोराला समुद्रात फेकून देण्याचा आदेश घेवून आले. त्यांनी चोराची शहानिशा न करता व अंधार असल्याने चोराचा चेहरासुद्धा न पाहता त्याला समुद्रात फेकून दिले. अशा त-हेने धनलोभाने एका गरीबाचा जीव गेला.
तात्पर्य- कोणत्याही गोष्टीचा लोभ चांगला नाही, लोभामुळे आत्मघात होण्याची शक्यता असते. त्यापासून दूर राहणे हेच बरे.! बरोबर आहे ना !
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.