गेले कित्येक महिने आपण कोरोनामुळे प्रभावित झालेलो आहोत. याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरही झालेला आहे. काही मुले येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होतील, पण प्रत्यक्षात त्यांना अंगणवाडी किंवा बालवाडीचा अनुभवच घेता आलेला नाही. या मुलांची व्यवस्थितपणे शाळापूर्व तयारी होणे फार आवश्यक आहे, ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना वाचन-लेखन शिकताना कोणतेही अडथळे येणार नाहीत आणि ते व्यवस्थितपणे शिकू शकतील. यासाठी मार्च-मे 2022 मध्ये आपण सर्वांनी मिळून शाळापूर्व तयारी अभियान महाराष्ट्रभर चालवायचे आहे. या अभियानात गाव पातळीवरील मुलांचे पालक, ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा आणि स्वयंसेवक (volunteers) यांची मुख्य भूमिका असेल.
शाळापूर्व तयारी बॅॅनर ( साईझ- ५ × ३ )
वरील बॅॅनर खालील बटणावरून PDF स्वरूपात डाऊनलोड करा.
वरील पोस्टर्स खालील बटणावरून PDF स्वरूपात डाऊनलोड करा.
हेही पहा व वाचा -
Tags
शाळापूर्व तयारी