उदाजीराव अध्यापक विद्यालय (D.Ed कॉलेज) गारगोटी येथे आज संगणक कार्यशाळासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून आमंत्रित केले होते.
या प्रशिक्षणात मोबाईल वरील साध्या साध्या बाबी, गुगल प्रोडक्ट ची परिपूर्ण माहिती(जीमेल अकाउंट, ड्राईव्ह,फॉर्म, शीट, मॅप, मीट, ट्रान्सलेट, डॉक्स, क्लासरूम, प्ले स्टोअर, ब्लॉग, युट्युब), व्हिडिओ एडिटिंग ॲप्स, ब्लेंड कलेज, फोटो एडिटर- इमेज डिझाईन,साईज कमी करणे, क्यू आर कोड चा वापर अशा बेसिक गोष्टींची माहिती देण्यात आली.
ज्या कॉलेजमध्ये माझे डी.एड् कम्प्लिट झाले त्याच कॉलेजमधून दोन वेळा तंत्रस्नेही प्रशिक्षण देण्याची संधी माझे मार्गदर्शक गुरुवर्य प्राध्यापक श्री.सुधीर गुरव सरांमुळे लाभली. सन्माननीय प्राचार्य डॉ. सौ.एम.व्ही.माळी मॅडम, उपप्राचार्य श्री.व्ही. आय. देसाई सर, प्रा. बी बी पाटील सर प्रा. जाधव सर सर्व टीम यांचे आभार. बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतीत देखील बदल स्वीकारणे क्रमप्राप्त असून नवनवीन छात्राध्यापकांना सध्या अशा प्रशिक्षणाची गरज असून तंत्रज्ञान ही काळाची गरज बनली आहे.
- प्रविण डाकरे सर
अध्यापक वि.मं.वेंगरुळ ता.भुदरगड