गेले कित्येक महिने आपण कोरोनामुळे प्रभावित झालेलो आहोत. याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरही झालेला आहे. काही मुले येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होतील, पण प्रत्यक्षात त्यांना अंगणवाडी किंवा बालवाडीचा अनुभवच घेता आलेला नाही. या मुलांची व्यवस्थितपणे शाळापूर्व तयारी होणे फार आवश्यक आहे, ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना वाचन-लेखन शिकताना कोणतेही अडथळे येणार नाहीत आणि ते व्यवस्थितपणे शिकू शकतील. यासाठी मार्च-मे 2022 मध्ये आपण सर्वांनी मिळून शाळापूर्व तयारी अभियान महाराष्ट्रभर चालवायचे आहे. या अभियानात गाव पातळीवरील मुलांचे पालक, ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा आणि स्वयंसेवक (volunteers) यांची मुख्य भूमिका असेल.
शाळापूर्व तयारी या संदर्भात महत्वपूर्ण Mp3 संवाद ऐका -
विकासपत्र कसे भरायचे? क्षमता कशा तपासायच्या? सविस्तर माहिती पहा-
Tags
शाळापूर्व तयारी