A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : मंगळवार
आजची दिनांक : ०९ / ०४ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
१९९५
लता मंगेशकर यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल मोतीलाल व्होरा यांच्या हस्ते ‘अवधरत्न’ व ‘साहू सूरसम्मान’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
१९९४
सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना ‘आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
१९६७
बोइंग-७६७ ने पहिले उड्डाण केले.
१९४०
दुसरे महायुद्ध – जर्मनीने नॉर्वे व डेन्मार्क पादाक्रांत केले.
१८६७
रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत ‘एक’ मताने मंजुरी मिळाली.
१९४८
जया भादुरी – अभिनेत्री, राज्यसभा खासदार
१९२५
लिंडा गुडमन – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका
(मृत्यू: २१ आक्टोबर १९९५)
१८९३
राहूल सांकृतायन – इतिहासकार
(मृत्यू: १४ एप्रिल १९६३)
१८८७
विष्णू गंगाधर तथा ‘दादासाहेब’ केतकर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक
(मृत्यू: १९ आक्टोबर १९५०)
(Image Credit: PVG Vidya Bhavan)
१८२८
गणेश वासुदेव जोशी उर्फ ‘सार्वजनिक काका’ – समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक
(मृत्यू: २५ जुलै १८८०)
१३३६
शुजा-उद-दिन तैमूर उर्फ तैमूरलंग – मंगोल सरदार
(मृत्यू: १८ फेब्रुवारी १४०५)
२००९
शक्ती सामंत – हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते
(जन्म: १३ जानेवारी १९२६)
२००९
अशोकजी परांजपे – गीतकार
(जन्म: ? ? ????)
२००१
बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ ‘बिझी बी’ – पत्रकार व स्तंभलेखक, ‘आफ्टरनून डिस्पॅच अँड कुरियर’ या सायंदैनिकाचे संपादक
(जन्म: ११ आक्टोबर १९३०)
(Image Credit: Alchetron)
२००१
शंकरराव रामचंद्र खरात – दलित साहित्यिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
(जन्म: ११ जुलै १९२१)
(Image Credit: विवेक: महाराष्ट्र नायक)
१९९८
डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते – महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू
(जन्म: २२ जून १९०८)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
ऋषी अष्टावक्र
हिंदू धर्मशास्त्रामध्ये अष्टावक्र नावाचे एक विचारवंत होऊन गेले. असे म्हणतात की अष्टावक्र हे केवळ कुरुपच नव्हते तर त्यांचे शरीरही बेढब होते. त्यांचे शरीर आठ ठिकाणी वाकडे होते म्हणून त्यांना अष्टावक्र हे म्हटले जात होते. ही एक प्रसिद्ध कथा आहे. अष्टावक्र ऋषी एकदा राजा जनक यांच्या दरबारात गेले. दोन्ही बाजूंनी उंच आसनावर सभासद, ज्ञानी, पंडीत, ज्ञानकर्मी बसले आणि राजा जनकाचे सिंहासन होते. अष्टावक्र ऋषींना द्वारपालाने रोखले नाही. अष्टावक्र त्यावेळी किशोरवयीन होते. अष्टावक्राने जेव्हा राजा जनकाच्या मुख्य सभामंडपात प्रवेश केला तेव्हा त्याच्यावर नजर पडताच सर्वजण एकमेकांकडे पाहून हसू लागले होते. इतकेच नाही तर त्यांचे हसू थांबत नव्हते. हे पाहून अष्टावक्राला प्रथम काहीच समजले नाही, मात्र त्यानंतर त्याला आपल्यावर हे सर्वजण हसतात म्हणून लक्षात आले. हे पाहून तोही जोरजोरात हसू लागला. जनक राजाने सभेला शांत होण्याचे आवाहन केले, सभा शांत होताच राजा जनकाने अष्टावक्राला विचारले,'' हे साधू, हे लोक तुमच्यावर हसतात हे माझ्या लक्षात आले पण तुम्ही का हसता आहात हे समजले नाही'' अष्टवक्राने उत्तर दिले,'' महाराज, मला वाटले की राजा जनक जो ज्ञानी, विचारवंत आहे त्याच्या सभेत ज्ञानी, विचारवंत, हुशार लोक असतील पण इथे तर सर्वच जण कातडीकडे व बाह्य स्वरूपाकडे पाहणारे लोक आहेत. माझ्या रूपाकडे पाहून हे लोक मला हसत होते हे पाहून मला यांच्या बुद्धीची कीव आली व हसू फुटले.'' जनक राजासह सर्व सभा अष्टावक्र ऋषींच्या या उत्तराने शरमिंदी झाली.
तात्पर्य- माणसाचे महत्व त्याच्या शरीरावर नाही तर त्याचे ज्ञान, परिश्रम आणि कर्मावर आहे.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.