A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : सोमवार
आजची दिनांक : १५ / ०४ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
१९९७
मक्केपासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.
१९५७
अल्बर्ट ट्रॅव्हल कंपनीने लंडन ते कोलकाता (कलकत्ता) अशी बस सेवा सुरु केली. ५ जुलै रोजी ही बस कोलकात्याला पोचली. इंग्लंडहून निघाल्यावर बेल्जीयम, पश्चिम जर्मनी, ऑस्ट्रिया, युगोस्लाव्हिया, बल्गेरिया, तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान या मार्गे ही बस भारतात येत असे आणि दिल्ली, आग्रा, अलाहाबाद, वाराणसी मार्गे कोलकात्याला पोचत असे. १९७६ पर्यंत ही सेवा सुरु होती.
(Image Credit: Fox Photos/Hulton Archive/Getty Images)
१९४०
दुसरे महायुद्ध – नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.
१८९२
जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.
१६७३
मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.
१९३२
सुरेश भट – कवी
(मृत्यू: १४ मार्च २००३)
१९२२
हसरत जयपुरी – गीतकार
(मृत्यू: १७ सप्टेंबर १९९९)
१९१२
मल्हार सदाशिव तथा ‘बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक
(मृत्यू: १३ जानेवारी १९९७)
१९१२
किम सुंग (दुसरे) – उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: ८ जुलै १९९४)
१८९४
निकिता क्रूश्चेव्ह – सोविएत युनियनच्या मंत्रिपरिषदेचे अध्यक्ष
(मृत्यू: ११ सप्टेंबर १९७१)
(Image Credit: BBC: On This Day)
१८९३
नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक – चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक
(मृत्यू: २१ डिसेंबर १९७९)
१७४१
चार्ल्स विल्सन पील – अमेरिकन चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक
(मृत्यू: २२ फेब्रुवारी १८२७)
१७०७
लिओनार्ड ऑयलर – स्विस गणितज्ञ
(मृत्यू: १८ सप्टेंबर १७८३)
२०१३
वि. रा. करंदीकर – संत साहित्याचे अभ्यासक
(जन्म: २७ ऑगस्ट १९१९)
१९९८
पॉल पॉट – कंबोडियातील २० लाख नागरिकांच्या हत्याकांडास जबाबदार असणारा ‘ख्मेर रुज’चा नेता
(जन्म: १९ मे १९२५)
१९९५
पंडित लीलाधर जोशी – तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री
(जन्म: ? ? ????)
१९९०
ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ‘ग्रेटा गार्बो’ – हॉलिवूड अभिनेत्री
(जन्म: १८ सप्टेंबर १९०५)
१९८०
जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते
(जन्म: २१ जून १९०५)
१९१२
एडवर्ड जे. स्मिथ – आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान
(जन्म: २७ जानेवारी १८५०)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
तृप्तता
प्राचीन काळी एका देशात एक राजा राज्य करत होता. त्याचा असा एक नियम होता की जोपर्यंत तो अगणित संन्याशांना दान करीत नाही तोपर्यंत तो भोजन ग्रहण करत नसे. एके दिवशी दानासाठी निश्र्चित केलेल्या वेळेच्याआधीच एक संन्याशीबुवा आपल्या हातात एक छोटेसे भिक्षापात्र घेऊन राजवाड्याच्या द्वाराशी हजर झाले. राजाला हे पाहून आश्र्चर्य वाटले. संन्याशाने राजाला पाहिले व तो म्हणाला, '' हे राजन, जर तुम्हाला शक्य असेल तर माझ्या या छोट्याशा भिक्षापात्रात काही ना काही दान टाका.'' राजाला त्याच्या बोलण्याचा रागही आला आणि आश्र्चर्यही वाटले. राग यासाठी की राजाला तो तुम्हाला शक्य नाही असे सुचवित होता आणि भिक्षापात्राचा आकार खूपच लहान होता याचे आश्र्चर्य वाटले. राजाने आपल्या सेवकांना आज्ञा केली की या भिक्षुकाचे लहानसे भिक्षापात्र आताच्या आता सोन्याच्या मोहोरांनी भरून टाकावे व सन्मानाने याचकाची बोळवणी करावी. सेवकांनी पहिल्यांदा ताट भरून सोन्याच्या मोहोरा आणल्या आणि भिक्षापात्रात टाकल्या पण भिक्षापात्र मात्र मोकळेच. परत परत सेवक ताटे भरून सोन्याच्या मोहोरा आणत होते पण भिक्षापात्रात मात्र जागा होतच होती. राजाला व सेवकांना हा प्रकार काही कळेना की हे निश्र्चित काय होते आहे की आपण टाकलेल्या मोहोरा जातात कुठे आणि हे लहानसे भिक्षापात्र अजूनही मोकळे कसे दिसते. शेवटी सोन्याच्या मोहोरा संपल्या, राजाचा खजिना रिता झाला तरी भिक्षापात्रात थोडी जागा शिल्लक होतीच. मग राजाला समजून चुकले की हा काही तरी दैवी प्रकार आहे. त्याने संन्याशापुढे लोटांगण घातले आणि माफी मागितली व म्हणाला,''हे साधूमहाराज, मला क्षमा करावी, मी संपत्ती व सत्तेच्या गर्वात तुम्हाला व तुमच्या भिक्षापात्राला लहान समजलो. मी दान करतो हा माझा गर्व आता पूर्णपणे नष्ट झाला आहे. पण या भिक्षापात्राचे रहस्य काय आहे हे कृपया मला सांगावे.'' संन्याशी उत्तरला,'' राजा, हे भिक्षापात्र म्हणजे आपल्या हृदयाचे प्रतिक आहे. या संसारातील कोणतीच वस्तू पूर्णपणे आपले हृदयात जागा बनवू शकत नाही. मनुष्याने कितीही नाव कमावले, शक्ति मिळविली, धन प्राप्ती केली, सौंदर्य पाहिले किंवा उपभोगले, सुख प्राप्त केले तरी हृदयातून कुठेतरी असे वाटत राहतेच की अजून मिळाले पाहिजे. पूर्ण तृप्तता कधीच मिळत नाही. फक्त ईश्र्वरी कृपेचा एक किरण आपल्या हृदयाला भरू शकतो पण मनुष्य तो मिळविण्याचा कधीच प्रयत्न करत नाही.
तात्पर्य- तृप्तता हि खरी मानवाची गरज आहे पण ती मिळत नाही हे एक दुःख आहे.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.