A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : मंगळवार
आजची दिनांक : १६ / ०४ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
१९९५
देशातील लोकशाही टिकवुन ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना ‘ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान
१९७२
केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून ‘अपोलो-१६’ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले.
१९४८
राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना
१९२२
मुळशी सत्याग्रह सुरू झाला.
१८५३
भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे अशी प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली. ‘ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (GIP Railway) या कंपनीने ही सेवा सुरू केली. यापुढील सात वर्षांत देशात आणखी आठ रेल्वे कंपन्या स्थापन झाल्या. मात्र जी. आय. पी. हीच नव्या युगाची सुरुवात करणारी रेल्वे ठरली.
१९७८
लारा दत्ता – मॉडेल, हिन्दी चित्रपट अभिनेत्री व निर्माती, मिस युनिव्हर्स (२०००)
१९७२
कोंचिता मार्टिनेझ – स्पॅनिश लॉनटेनिस खेळाडू
१९६३
सलीम मलिक – पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९३४
रामचंद्र दामोदर तथा राम नाईक – केन्द्रीय पेट्रोलिअम मंत्री, रेल्वे राज्यमंत्री व भाजपचे नेते
१८८९
चार्ली चॅपलिन – अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार. त्यांच्या ‘लाईम लाईट’ या चित्रपटाला ऑस्कर पारितोषिक मिळाले होते. ‘कीड ऑटो रेसेस अॅट व्हेनिस’ या त्यांच्या दुसर्या चित्रपटातील डर्बी हॅट, घट्ट कोट ढगळ पँट, चौकोनी मिशा, बेढब जोडे आणि काठी या वेशभूषेमुळे चार्ली चॅप्लिन म्हणजे लोकांना मूर्तिमंत विनोद वाटू लागले.
(मृत्यू: २५ डिसेंबर १९७७)
२०००
दिनकर गोविंद तथा अप्पासाहेब पवार – ग्रामीण विकासाचा ध्यास घेतलेले कृषीतज्ञ, कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, शाहू महाराजांचे चरित्रकार
(जन्म: ? ? १९३०)
१९९५
रमेश टिळेकर – अभिनेते व वकील, ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकातील भूमिकेसाठी प्रसिद्ध
(जन्म: ? ? ????)
१९६६
जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस – श्री. बोस यांनी शांतिनिकेतनमधे सुमारे ३० वर्षाहून अधिक काळ अध्यापन करून अनेक चित्रकार तयार केले.
(जन्म: ३ डिसेंबर १८८२)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
फटकळपणा
एका गावात एक शेतकरी राहत होता. शेती करण्याशिवाय त्याने काही गायी पाळल्या होत्या. त्यांचे दूध विकून तो गुजराण करत असे. शेतकरी प्रामाणिक होता. त्यामुळे तो दुधात मुळीच भेसळ करत नसे. त्यामुळे त्याचे दूध चांगलेच असणार याची लोकांना खात्री पटली होती. गावातील बहुतांश लोक त्याचेच ग्राहक होते. त्याच्या नियमित ग्राहकांमध्ये एक महिलादेखील होती. तिचा स्वभाव रागीट होता. शेतकर्याला तिचा स्वभाव माहीत होता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत तो प्रथम तिच्या घरी दूध पोहोचवत असे. एके दिवशी त्या महिलेने घरी पूजापाठ आयोजित केला होता. बरेच नातेवाईक येणार होते. परंतु नेमके त्या दिवशी शेतकरी तिच्या घरी दूध देण्यास जाऊ शकला नाही. शेतकºयाच्या या वागण्यामुळे ती महिला प्रचंड संतापली. त्याच्या या वागण्याचा तिला खूप रागही आला. पर्यायी व्यवस्था करून तिने कार्यक्रम पार पाडला. दुसºया दिवशी शेतकरी तिच्या घरी दूध घेऊन गेला. तेव्हा तिने त्याचा बराच पाणउतारा केला. बराच वेळ तिच्या तोंडाचा पट्टा सुरू होता. शेतकरी गप्प राहिला. काही वेळाने तिच्या रागाचा पारा किंचित कमी झाला, तेव्हा धाडस करून शेतकरी बोलला, ‘माझ्यामुळे तुमची गैरसोय झाली. त्याबद्दल मी प्रथम आपली क्षमा मागतो. परंतु काल माझ्या आईचे निधन झाले. मला तिच्यावर अग्निसंस्कार करावे लागले. त्यामुळे मी दूध द्यायला येऊ शकलो नाही.’ हे ऐकताच महिलेला तिची चूक उमगली. शरमेने तिला काहीच बोलता येईना. रागाच्या भरात भलतीच चूक आपण केल्याचा तिला पश्चात्ताप झाला. तिने शेतकºयाची माफी मागितली व यापुढे मागचा-पुढचा विचार न करता कुणाशीही फटकळपणे न वागण्याची तिने शपथ घेतली.
तात्पर्य - अतिउत्साह, घाई-गडबडीत, समोरच्या व्यक्तीची अडचण जाणून न घेता अनुचित व्यवहार करणे योग्य नाही. गैरसोय झाली तर प्रथम त्याचे कारण शोधावे आणि नंतरच त्यावर प्रतिक्रिया द्यावी.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.