A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : रविवार
आजची दिनांक : २३ / ०४ / २०२३
G दिनविशेष
दिनविशेष
२०१३
IPL 2013: धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याने पुणे वॉरियर्स विरुद्ध खेळताना ३० चेंडूत शतक नोंदवण्याचा विक्रम केला.
(Image Credit: onthisday.com)
२००५
You Tube चा सहसंस्थापक जावेद करीम याने 'Me at the Zoo' हा You Tube वरील ‘पहिला’ व्हिडीओ upload केला.
२००३
SARS विषाणूच्या संसर्गामुळे बिंजिंग (चीन) मधील सर्व शाळा दोन आठवड्यांसाठी बंद करण्यात आल्या.
(Image Credit: onthisday.com)
१९९०
नामिबियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश होऊन तो १६० वा सदस्य देश बनला.
१९३८
एस. जानकी – शास्त्रीय गायिका
(Image Credit: Indian Express)
१८९७
लेस्टर बी. पिअर्सन – कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि १९५७ चे नोबेल शांति पुरस्कार विजेते
(मृत्यू: २७ डिसेंबर १९७२)
(Image Credit: nobelprize.org)
१८७३
महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक
(मृत्यू: २ जानेवारी १९४४)
(Image Credit: MPSC Today)
१८५८
पंडिता रमाबाई – विधवा, परिक्त्यक्ता आणि स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारक आणि ‘आर्य महिला समाज’ च्या संस्थापिका, संस्कृत पंडित
(मृत्यू: ५ एप्रिल १९२२)
१८५८
मॅक्स प्लँक – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ
(मृत्यू: ४ आक्टोबर १९४७)
(Image Credit: विकिपीडिया)
२०२१
निरंजन भाकरे – भारूडरत्न, लोककलावंत. ‘बये तुला बुरगुंडा होईल गं’ या भारुड सादरीकरणाने राज्यभर प्रसिद्ध झाले होते. भारुडाच्या माध्यमातून ते अवयवदानाविषयी जनजागृती करत असत.
(जन्म: ? ? १९५९)
(Image Credit: महाराष्ट्र टाइम्स)
२०१३
शमशाद बेगम – पार्श्वगायिका
(जन्म: १४ एप्रिल १९१९)
(Image Credit: India Today)
२००७
बोरिस येलत्सिन – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष
(जन्म: १ फेब्रुवारी १९३१)
(Image Credit: विकिपीडिया)
२००१
जयंत श्रीधर तथा ‘जयंतराव’ टिळक – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते, गोवा मुक्ती संग्रामातील एक झुंजार सेनापती, लोकमान्य टिळकांचे नातू, राजकारण, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, तत्त्वज्ञान, विज्ञान, निसर्ग आणि शिकार इ. विविध क्षेत्रांमधे दीर्घकाळ सक्रिय असणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष व केसरीचे संपादक
(जन्म: १२ आक्टोबर १९२१)
(Image Credit: बुक गंगा)
२०००
मराठी चित्रपटांना आधार मिळावा या ध्येयाने प्रेरित होऊन गेली ४० वर्षे लालबागमधील ‘भारतमाता’ चित्रपटगृह चालवणारे यशवंत सदाशिव ऊर्फ बाबासाहेब भोपटकर यांचे निधन
(जन्म: ? ? ????)
(Image Credit: @bombaywallah)
H पंचांग
पंचांग
आजचा वार : रविवार
आजची दिनांक : २३ / ०४ / २०२३
तिथी : शु.तृतीया
नक्षत्र : रोहिणी
योग : सौभाग्य
करण : वणीज
चंद्रराशी : वृषभ
सूर्योदय : सकाळी ०६ वाजून १८ मिनिटांनी झाला.
सूर्यास्त : सायंकाळी ०६ वाजून ५६ मिनिटांनी होईल.
I बोधकथा
बोधकथा
मुर्खाशी गाठ
एकेदिवशी बादशहाने बिरबलाला बोलावले आणि म्हणाला, ''बिरबल, एक प्रश्न असा कायम मला पडतो की, तू जर इतका हुशार आहेस तर तुझे वडील किती हुशार असतील. मला एकदा त्यांना भेटायचे आहे. वडीलांइतकी हुशारी तर तुझ्यात नक्कीच नसणार तेव्हा मला त्यांची हुशारी किती आहे हे पहायचे आहे''
बिरबल म्हणाला,''महाराज, माझे वडील ग्रामीण भागात राहणारे एक अडाणी, सरळमार्गी, देवभोळे आहेत. ते कसले हुशार असणार तेव्हा त्यांच्या भेटीतून आपल्याला काय निष्पन्न होणार आहे तेव्हा त्यांच्या भेटीचा नाद सोडून द्या.'' अकबराला वाटले की बिरबल मुद्दाम वडीलांना भेटू देत नाही कारण याच्यापेक्षा याचे वडील खूप हुशार आहेत आणि वडील हुशार आहेत हे बिरबलाला ठाऊक असल्याने आपली पत कमी होईल या भितीने बिरबल त्यांना भेटू देत नाहीये. अकबराने बिरबलाला एक आदेश दिला की आठ दिवसात जर तू तुझ्या वडिलांना दरबारात घेऊन आला नाहीस तर तुला शिक्षा केली जाईल. आता बिरबलापुढे प्रश्न उभा राहिला कारण खरोख्ररीच त्याचे वडील हे सरळमार्गी होते. बिरबलाने गावाकडे निरोप पाठविला आणि वडीलांना बोलावून घेतले. त्यांना दरबारात जाण्यापूर्वी चांगला पोशाख घातला आणि त्यांना काही कानमंत्र दिला. बिरबल वडीलांना म्हणाला,'' बादशहा तुम्हाला भेटू इच्छितात, तिथे गेल्यावर तो तुम्हाला कोणतेही आडवेतिडवे प्रश्न विचारेल पण काही केल्या तुम्ही तोंड उघडू नका. एकही शब्द न बोलता गप्प बसून रहा. बादशहा चिडेल, संतापेल पण तुम्ही कोणतीच प्रतिक्रिया देऊ नका.'' झाले बिरबलाचे वडील बादशहाच्या दरबारात पोहोचले. बादशहा दरबारात येताच वडीलांनी त्यांना सलाम केला. बादशहाने त्यांना बिरबलाचे वडील म्हणून ओळखले पण बोलायला काही तरी सुरुवात करायची म्हणून त्याने विचारले,'' तुम्हीच बिरबलाचे वडील का'' वडील गप्पच. त्याने पुन्हा विचारले,'' तुम्ही कुठे राहाता, गावाचे नाव काय, शेती कशी आहे, पाऊसपाणी कसे आहे, गावातील मंडळी कशी आहेत,'' असे अनेक प्रश्न विचारले तरी बिरबलाने सांगितल्याप्रमाणे वडील गप्पच होते. शेवटी बादशहा वैतागला, चिडला आणि संतापाच्या भरात बोलून गेला, ''काय बुद्धी झाली आणि या मूर्खाला मी बोलावून घेतले. असल्या मूर्खाशी अशीकशी माझी गाठ पडली की जो साध्या प्रश्नांची सुद्धा उत्तरे देत नाहीये.'' बिरबलाचे वडील मूर्ख शब्द ऐकून मनातून संतापले होते पण बिरबलाने सांगितले होते की, काही झाले तरी तोंड उघडायचे नाही. बादशहा कंटाळून निघून गेला व वडीलसुद्धा घरी गेले. त्यांनी हा प्रकार बिरबलाच्या कानावर घातला. बिरबलाने त्यांची समजूत घातली व शांत राहाण्यास सांगितले. चार दिवसांनी जेव्हा बिरबल पुन्हा दरबारात गेला तेव्हा बादशहा बिरबलाला म्हणाला,'' बिरबल मला तुझ्याशी काही महत्वाचे बोलायचे आहे तेव्हा तू जवळ ये.'' बिरबल जवळ गेला. बादशहा हळूच त्याला म्हणाला,'' बिरबल, आपली गाठ जर मूर्खाशी पडली तर काय केले पाहिजे'' बिरबल तात्काळ उत्तरला,''महाराज आपण शांत राहिले पाहिजे, गप्प बसले पाहिजे.'' बादशहा म्हणाला, '' ते कसे काय'' बिरबल म्हणाला,'' माझे वडील नाही का तुमच्यासमोर गप्प बसले होते तसेच'' हे ऐकून बादशहाचे तोंड बघण्यासारखे झाले.
तात्पर्य- मूर्खाशी वाद घालू नका, गप्प रहा.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.